शराटी आणि चमचा (Ibis and spoonbill)

(आयबिस अँड स्पूनबिल). शराटी आणि चमचा या पक्ष्यांचा समावेश पेलॅकनीफॉर्मिस गणाच्या थ्रेस्किऑर्निथिडी कुलात केला जातो. थ्रेस्किऑर्निथिडी कुलात थ्रेस्कोऑर्निथिनी आणि प्लॅटालिनी ही दोन उपकुले आहेत. थ्रेस्कोऑर्निथिनी उपकुलातील पक्ष्यांना ‘शराटी’ म्हणतात. त्यांच्या…

व्हेल (Whale)

(व्हेल). एक महाकाय सागरी सस्तन प्राणी. ‘व्हेल’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘एक मोठा जलचर’ असा आहे. व्हेल याला त्याच्या मोठ्या आकारामुळे मराठी भाषेत ‘देवमासा’ म्हणतात. परंतु तो मासा नसून एक…

हाडमोड्या ताप (Dengue)

(डेंग्यू). एक विषाणुजन्य रोग / ताप. डेंगी हा रोग डेन्व्ही (DENV) या विषाणूमुळे होणारा फ्ल्यूसारखा, तीव्र स्वरूपाचा आहे. ईडिस  प्रजातीच्या मुख्यत: ईडिस ईजिप्ताय  जातीचे डास या रोगाचे वाहक असून या…

वैद्यकीय अपशिष्ट (Medical waste)

(मेडिकल वेस्ट). जैविक तसेच वैद्यकीय स्रोत आणि कृती यांतून उत्पन्न झालेल्या अपशिष्टांना ‘वैद्यकीय अपशिष्ट’ म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था उदा., दवाखाने, सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालये, रक्तपेढ्या,…

वनश्री (Vegetation)

(व्हेजिटेशन). एखाद्या लहान किंवा मोठ्या क्षेत्रावर असलेल्या सर्व वनस्पतींच्या समूहाला ‘वनश्री’ म्हणतात. जसे, गोड्या पाण्यातील सर्व वनस्पतींच्या समूहाला क्षेत्राच्या प्रकारानुसार डबक्यातील वनश्री, तळ्यातील वनश्री, सरोवरातील वनश्री असा फरक करतात. समुद्रातील…

वन परिसंस्था (Forest ecosystem)

(फॉरेस्ट इकोसिस्टिम). पृथ्वीवरील एक व्यापक आणि प्रभावी परिसंस्था. कोणत्याही परिसंस्थेत सजीवांचा आणि अजैविक घटकांचा म्हणजेच हवा, पाणी, मृदा यांचा समुदाय असतो आणि या समुदायात सजीव-सजीव तसेच सजीव – त्यांभोवतालचे अजैविक…

हिवताप (Malaria)

(मलेरिया). सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांद्वारे प्रसार होणारा एक संक्रामक रोग. प्लास्मोडियम  प्रजातीच्या एकपेशीय, परजीवी सूक्ष्मजीवांमुळे हिवताप होतो. हिवताप मनुष्याला तसेच प्राण्यांना होतो. प्लास्मोडियमच्या पुढील पाच जाती माणसामध्ये हिवतापाची बाधा निर्माण…

वृक्क (Kidney)

(किडनी). वृक्क (मूत्रपिंड) हा मानवी मूत्र उत्सर्जन संस्थेतील प्रमुख अवयव आहे. मानवाच्या उत्सर्जन संस्थेमध्ये वृक्काची एक जोडी, दोन मूत्रवाहिनी, एक मूत्राशय आणि एक मूत्रमार्ग यांचा समावेश असतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण…

सिंह (Lion)

(लायन). अन्नसाखळीच्या शिखरावरील भक्षक प्राण्यांपैकी एक प्राणी. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या फेलिडी कुलातील पँथेरा प्रजातीत सिंहांचा समावेश केला जातो. सध्या वन्य स्थितीतील सिंह दक्षिण अफ्रिकेतील सहारा व भारताच्या गुजरात राज्यातील…

साप (Snake)

(स्नेक). सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या सर्पेंटिस उपगणात सापांचा समावेश केला जातो. साप हे दोरासारखे लांब शरीर असलेले, बिनपायाचे आणि मांसाहारी प्राणी असतात. ते उल्बी असतात, म्हणजे त्यांचे भ्रूण एका विशिष्ट…

संधिशोथ (Arthritis)

(आरथ्रायटीस). ‘सांधे दुखणे व ताठर होणे’ हे मुख्य लक्षण असलेल्या अनेक विकारांना मिळून ‘संधिशोथ’ ही संज्ञा वापरली जाते. या विकारात एक किंवा अधिक सांध्यांच्या जागी सूज येते आणि ते हळवे…

हाडे (Bones)

(बोन्स). हाडे म्हणजेच अस्थी. पृष्ठवंशी प्राण्यांच्या सांगाड्यातील हा अविभाज्य घटक असतो. हाडांमुळे शरीराला आधार आणि विशिष्ट आकार मिळतो, शरीरातील इंद्रियांचे संरक्षण होते, रक्तपेशींची निर्मिती होते; खनिजे साठली जातात आणि शरीराची…

वाळवंटी परिसंस्था (Desert ecosystem)

(डेझर्ट इकोसिस्टिम). वाळवंटी परिसंस्था ही पृथ्वीवरील एक प्रमुख परिसंस्था आहे. ती मोठ्या शुष्क क्षेत्रात पसरलेली आहे. वाळवंटी परिसंस्थेतील वनस्पती व प्राणी यांच्यात अत्यंत विषम स्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. येथे…

विंचू (Scorpion)

(स्कॉर्पिओ). एक परभक्षी प्राणी. संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेल्या प्राण्यांच्या) संघातील ॲरॅक्निडा (अष्टपाद) वर्गाच्या स्कॉर्पिओनेस गणातील प्राण्यांना विंचू म्हणतात. जगात विंचवाच्या सु. १,७५० जाती असून त्यांचे वर्गीकरण १३ कुलांमध्ये केलेले आहे.…

वनस्पतींची हालचाल (Movement of plants)

(मुव्हमेंट ऑफ प्लांट्स). सजीव आणि निर्जिव यांच्यातील मुख्य फरक म्हणजे हालचाल. वनस्पती सजीव असल्यामुळे त्यांच्यामध्येही हालचाल दिसून येते. सजीवांच्या पेशीतील जीवद्रव्य बाह्य घटकांना संवेदनशील असते. पाणी, प्रकाश, गुरुत्वाकर्षण, काही रसायने…