वनस्पती उद्यान (Botanical garden)

(बोटॅनिकल गार्डन). वैज्ञानिक संशोधन आणि सर्वसामान्यांसाठी बहुविध वनस्पतींची लागवड, त्यांचा संग्रह तसेच नाव वर्णनासहित प्रदर्शन ज्या उद्यानांमध्ये केलेले असते, त्याला ‘वनस्पती उद्यान’ म्हणतात. काही वनस्पती उद्यानात विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचा संग्रह…

ज्ञानेंद्रिये (Senses)

(सेन्सेस). पर्यावरणीय बदलांचे ज्ञान व्हावे आणि त्यातून पोषण, प्रजनन व संरक्षण या कार्यांमध्ये मदत व्हावी, या उद्देशाने प्राण्यांमध्ये विकसित झालेल्या अवयवांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. शरीरांतर्गत आणि शरीरबाह्य संवेदनांचे (उद्दीपनांचे) ग्रहण करून…

हरिण (Antelope)

(अँटिलोप). एक सस्तन शाकाहारी प्राणी. स्तनी वर्गातील समखुरी गणाच्या बोव्हिडी कुलातील बोव्हिनी उपकुलात हरिणांचा समावेश केला जातो. गाय, म्हैस, मेंढी, गवे, शेळी इत्यादी प्राणी बोव्हिनी उपकुलात येतात. हरिणांच्या सु. ३१…

हत्तीरोग (Elephantiasis)

(एलिफंटॅसीस). हत्तीरोग हा गोलकृमींमुळे (नेमॅटोडांमुळे) अर्थात सूत्रकृमींमुळे होतो. हा रोग मुख्यत: उष्ण कटिबंधीय प्रदेशांत दिसून येतो. वुच्छेरेरिया बँक्रॉफ्टी नावाचे परजीवी गोलकृमी हत्तीरोगाला कारणीभूत असतात. बारीक धाग्याप्रमाणे दिसणाऱ्या या गोलकृमींना फायलेरिया…

सागरी परिसंस्था (Marine ecosystem)

(मरीन इकोसिस्टम). पृथ्वीवरील जलीय परिसंस्थांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. सागरी परिसंस्थांतील पाण्यात उच्च प्रमाणात क्षार असल्याने अन्य जलीय परिसंस्थांपेक्षा त्या वेगळ्या असतात; गोड्या पाण्याच्या परिसंस्थांमध्ये क्षार कमी प्रमाणात असतात. पृथ्वीचा सु.…

वलयांकित संघ (Phylum annelid)

(ॲनेलिडा). अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघातील प्राण्यांचे शरीर अनेक वलयांनी म्हणजेच खंडांनी बनलेले असते. शरीर लांबट असून त्यांच्या शरीरावरील खंड बाहेरून ठळकपणे दिसतात. खंडीभवन हे या प्राण्यांचे प्रमुख लक्षण…

वन्य जीव संधारण (Wild life conservation)

(वाइल्ड लाइफ काँझर्व्हेशन). वन्य प्राणी व वनस्पती यांच्या जाती आणि त्यांचे अधिवास यांचे संरक्षण करण्यासाठी केलेले योग्य नियोजन व व्यवस्थापन म्हणजे ‘वन्य जीव संधारण’. वनस्पती आणि प्राणी यांच्या काही जाती…

वनस्पतीमधील संदेशन (Plant communication)

(प्लांट कम्युनिकेशन). सामान्यपणे वनस्पतींना प्राण्यांप्रमाणे बुद्ध‍िमान समजले जात नाही. कारण वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे स्पर्श, दृष्टी, श्रवण इ. क्षमतांसाठी कोणतेही इंद्रिय नसते, तसेच चेतासंस्था नसते. असे असूनही वनस्पतीची संदेशवहन यंत्रणा प्रगत असल्याचे…

वनस्पतिविज्ञान (Botany)

(बॉटनी). जीवविज्ञानाची एक शाखा. या शाखेत वनस्पतींचा अभ्यास केला जातो. या अभ्यासात वनस्पतींची रचना, त्यांचे गुणधर्म व वर्गीकरण, त्यांच्या जैवरासायनिक प्रक्रिया, वनस्पतींचे रोग आणि सभोवतालच्या भौतिक घटकांशी त्यांची आंतरक्रिया, त्यांचे…

Read more about the article हीमोग्लोबिन (Hemoglobin)
हीमोग्लोबिनचे रचनासूत्र

हीमोग्लोबिन (Hemoglobin)

रक्तारुण. पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त (आयर्नयुक्त) प्रथिन. हीमोग्लोबिन हे फुप्फुसातील ऑक्सिजन रक्तावाटे शरीराच्या ऊतींकडे वाहून नेते आणि ऊतींमधील कार्बन डायऑक्साइड रक्तावाटे फुप्फुसाकडे आणते. सामान्यपणे प्रौढ निरोगी व्यक्तीच्या…

हंस (Goose)

(गूज). एक पाणपक्षी. हंसांचा समावेश ॲन्सरिफॉर्मिस गणाच्या ॲनॅटिडी कुलात केला जातो. त्यांच्या ॲन्सर (करडा हंस) आणि ब्रँटा (काळा हंस) अशा दोन प्रजातींमध्ये एकूण सु. १९ जाती असून काही उपजाती आहेत.…

स्थलांतरित शेती (Shifting cultivation)

(शिफ्टिंग कल्टिव्हेशन). जमिनीवरील गवत, झाडेझुडपे तोडून व जाळून ती जमीन पिकांच्या लागवडीखाली आणणे आणि त्या जमिनीची सुपीकता कमी झाल्यावर याच प्रकारे दुसरी जमीन निवडून शेती करणे, या प्रकारच्या शेतीला ‘स्थलांतरित…

सॅलॅमॅंडर (Salamander)

उभयचर वर्गाच्या युरोडेला (कॉर्डेटा) गणातील सरड्यासारखे दिसणारे प्राणी. युरोडेला गणाचे वैशिष्ट्य म्हणजे या गणातील प्राण्यांना डिंभ आणि प्रौढ दोन्ही अवस्थेत शेपटी असते. जगात सॅलॅमँडरांच्या सु. ३८० प्रजाती आढळतात. बहुतकरून ते…

सूर्यपक्षी (Sunbird)

(सनबर्ड). एक लहान व आकर्षक पक्षी. सूर्यपक्ष्यांचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या नेक्टॅरिनिइडी पक्षिकुलात केला जातो. जगात त्यांच्या १५ प्रजाती आणि १३२ जाती आहेत. भारतात त्यांच्या तीन जाती आढळून येतात. हिमालयात समुद्रसपाटीपासून…

होमिओपॅथी (Homeopathy)

निसर्गनियमांवर आधारलेली एक वैद्यकीय उपचारपद्धती किंवा वैद्यकीय शाखा. होमिओपॅथी पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हणतात. या उपचारपद्धतीचे सूत्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ म्हणजेच ‘काट्याने काटा काढणे’ (सम: समं शमयति) हे आहे. होमिओपॅथी…