उत्परिवर्तन (Mutation)

सजीवांच्या एका पिढीकडून पुढील पिढ्यांकडे संक्रमित होऊ शकणाऱ्या जीनोममधील कोणत्याही बदलास उत्परिवर्तन असे म्हणतात. सर्व सजीवांच्या जीनोममध्ये बदल होणे ही नैसर्गिक क्रिया असून त्यामुळे सजीवांच्या जीनोममध्ये वैविध्य येते. उत्क्रांती होण्यासाठी…

सिरिएशन (Seriation)

सिरिएशन याचा अर्थ क्रमनिर्धारण अथवा कोणत्याही एखाद्या निश्चित गुणधर्माचा वापर करून वस्तूंची विशिष्ट क्रमाने मांडणी करणे. या तंत्राचा उपयोग कालमापनासाठी करण्यात येतो. पुरातत्त्वविद्येच्या प्रारंभिक काळात सिरिएशन ही सापेक्ष कालमापनाची एक…

झैनुद्दिन अन्सारी (Z. D. Ansari)

अन्सारी, झैनुद्दिन दाऊद : (१९२३–१८ फेब्रुवारी १९९८). डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाच्या वाढीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे व भारतातील एक अग्रगण्य क्षेत्रीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे एका विणकर कुटुंबात…

जेरोम जेकबसन (Jerome Jacobson)

जेकबसन, जेरोम : (१३ जून १९३० – २१ ऑगस्ट २०२०). दक्षिण आशियाई पुरातत्त्व आणि विशेषतः भारतीय प्रागैतिहासिक पुरातत्त्वाच्या क्षेत्रात योगदान देणारे अमेरिकन पुरातत्त्वज्ञ. जेरोम (जेरी) जेकबसन यांचा जन्म न्यूयॉर्कच्या ब्राँक्स…

Read more about the article कराड (Karad)
कराड (जि. सातारा) येथील उत्खननात मिळालेली मातीची भांडी.

कराड (Karad)

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळ. कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमावर हे स्थळ वसलेले आहे. लिखित पुराव्यांनुसार कराड हे प्राचीन काळातील करहाटक असल्याचे मत प्रचलित होते.…

जगतपती जोशी

जोशी, जगतपती : (१४ जुलै १९३२ – २७ जून २००८). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे माजी महासंचालक व सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांचे उत्खनन करणारे पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म अल्मोडा (उत्तराखंड) येथे झाला. त्यांच्या…

पुरुषोत्तम सिंह (Purushottam Singh)

सिंह, पुरुषोत्तम : (१ जानेवारी १९४० – २२ फेब्रुवारी २०२०). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील भरौली या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सिंह यांनी बनारस हिंदू…

टी. सी. शर्मा (T. C. Sharma)

शर्मा, तरुणचंद्र : (११ एप्रिल १९२९ – १७ नोव्हेंबर २०११). ईशान्य भारतात महत्त्वाचे संशोधन करणारे प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म आसाममधील नलबाडी जिल्ह्यातील दक्षिणगाव येथे झाला. शालेय शिक्षण जन्मगावात…

आत्मा प्रकाश खत्री (ए. पी. खत्री) (A.P. Khatri)

खत्री, आत्मा प्रकाश : (८ एप्रिल १९३२–१७ नोव्हेंबर २००४). विख्यात प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि पुरामानवशास्त्रज्ञ.  त्यांचा जन्म बवहाळपूर (पाकिस्तान) येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांचे सर्व शिक्षण पंजाबमध्ये झाले.…

जे. डेस्मंड क्लार्क (J. Desmond Clark)

क्लार्क, जॉन डेस्मंड : (१० एप्रिल १९१६ – १४ फेब्रुवारी २००२). विख्यात इंग्लिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांच्या कुटुंबाचा सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय होता. ब्रिस्टल आणि बाथ गावांजवळ बोर्डिंग (निवासी)…

सर ग्रॅहम क्लार्क (John Grahame Douglas Clark)

क्लार्क, सर जॉन ग्रॅहम डग्लस : (२८ जुलै १९०७ – १२ सप्टेंबर १९९५). स्टार कार या ब्रिटनमधील मध्याश्मयुगीन स्थळाच्या उत्खननासाठी विख्यात असलेले ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म ब्रॉम्ली (केंट काउंटी) येथे…

डेव्हिड क्लार्क (David L. Clarke)

क्लार्क, डेव्हिड लिओनार्ड : (३ नोव्हेंबर १९३७ – २७ जून १९७६). नवपुरातत्त्व विचारधारेचे अग्रणी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील केंट काउंटी येथे  झाला. लंडनच्या डलविच कॉलेजात शिक्षण घेतल्यावर त्यांनी दोन…

इयन हॉडर (Ian Hodder)

हॉडर, इयन रिचर्ड : (२३ नोव्हेंबर १९४८). समकालीन पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रभाव असणारे आणि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचे अग्रणी, ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. त्यांचे वडील ब्रामवेल…

जे. सी. ग्यरदाँ (Jean-Claude Gardin)

ग्यरदाँ, जाँ-क्लुड : (३ एप्रिल १९२५ – ८ एप्रिल २०१३). पुरातत्त्वीय सिद्धांतात योगदान देणारे आणि पुरातत्त्वीय संशोधनात गणित, तर्कशास्त्र आणि संगणकाचा उपयोग करण्याचा आग्रह धरणारे फ्रेंच पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये…

लुईस बिनफर्ड (Lewis Binford)

बिनफर्ड, लुईस : (२१ नोव्हेंबर १९३१–११ एप्रिल २०११). ल्यूईस बिनफोर्ड. अमेरिकन मानवशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ. पुरातत्त्वविद्येतील उद्दिष्टे, सैद्धांतिक मांडणी आणि पद्धतींमध्ये बदल घडवून नवपुरातत्त्वाला जन्म देण्यात व पुरातत्त्वविद्येकडे बघण्याच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनात…