(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
कृषीक्षेत्राचा ज्ञात इतिहास सात हजार वर्षांपासूनचा आहे. कृषीउद्योगाने आधुनिक मानवी संस्कृतीचा पाया घातला. औद्योगिक संस्कृती निर्माण होईपर्यंत कृषीक्षेत्र जागतिक व्यापाराचे पायाभूत क्षेत्र होते. आजही जगातील अनेक देशात कृषी अर्थव्यवस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील सकल देशातंर्गत उत्पादनाचा १७% वाटा असून, अजूनही ५३% लोकसंख्या कृषीक्षेत्रावर अवलंबून आहे.

कृषी विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्या असून त्यांमध्ये हवामानशास्त्र, भूविज्ञान, वनस्पतिशास्त्र, उद्यानविद्या, कृषीतंत्रज्ञान, कृषीअर्थशास्त्र, कृषीउद्योजक अशा अनेक ज्ञानशाखांचा समावेश आहे. या सर्व शाखांचा परिचयासोबतच, कृषीक्षेत्राची परंपरा प्रदीर्घ असल्यामुळे कृषीविकासाचे जे अनेक ऐतिहासिक टप्पे पडतात, त्यांचा परिचय या ज्ञानमंडळाद्वारे करून देण्यात येईल. भारताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने १९६० नंतर हरितक्रांती झाली व त्या टप्प्यात अनेक सुधारित संकरित वाणांची निर्मिती झाली. सिंचन पद्धतीत बदल झाले. नवनवे तंत्रज्ञान अंमलात आणले गेले, गेल्या काही वर्षात झालेल्या जनुकक्रांतीमुळे निर्माण झालेली प्रतिकारक्षमता, उत्पादनवाढ, त्यांतून मिळणारा आर्थिक लाभ अशा अनेक विषयांचा परिचय या ज्ञानमंडळाद्वारे वाचकांना होईल.

यासोबत कृषीक्षेत्रामध्ये ज्यांनी संशोधन/शिक्षण/विस्ताराचे भरीव काम केले आहे असे शास्त्रज्ञ, कृषी, पशुसंवर्धन व मत्स्य क्षेत्राचा प्रचार व प्रसार करणारे प्रणेते, कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक काम केले असे प्रवर्तक तसेच विविध प्रयोग करून तंत्रज्ञान विकसित करणारे प्रयोगशील शेतकरी यांची चरित्रे यांचाही समावेश असणार आहे.

कोहळा (Ash Gourd)

कोहळा

कोहळा : (भुरा कोहळा; हिं. कुम्हडा, पेठा; गु. भुरा कोळू; क. संडिगे बुडेकुंबकलाई; सं. कुष्मांड; इं. व्हाइट गोर्ड मेलॉन, ॲश ...
खरबूज (Muskmelon )

खरबूज

खरबूज : (चिबूड; हिं. काचरा; गु. चिबडू, शक्कर टेटी; क. कळंगिड; सं. मधुपाक, कर्कटी; इं. मस्क मेलॉन, स्वीट मेलॉन; लॅ ...
गळिताची पिके (Oil Seeds)

गळिताची पिके

गळिताची पिके : ज्यांच्या बियांपासून तेल काढण्यात येते अशी वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक वर्षे जगणारी) पिके. तेलांचे खाद्य ...
गिनी गवत (Guinea Grass)

गिनी गवत

गिनी गवत : (इं. गिनी ग्रास; लॅ. पॅनिकम मॅक्सिमम; कुल-ग्रॅमिनी). हे मूळचे उष्ण कटिबंधीय आफ्रिकेमधील असून १७९३ मध्ये भारतात आणले गेले ...
गूजबेरी (Gooseberry)

गूजबेरी

गूजबेरी हे एका फळाचे आणि वनस्पतीचे इंग्रजी नाव आहे. राइब्स (कुल-सॅक्सिफ्रागेसी) या वंशातील सु. सहा जातींतील फुलझाडांच्या (आवृत्तबीज, द्विदलिकित) सर्व वनस्पती ...
गेझनिया (Gazania)

गेझनिया

गेझनिया : (लॅ. गेझनिया स्प्लेंडेन्स; कुल –  कंपॉझिटी). एक सुंदर फुलझाड. याच्या ४० प्रजाती असून उगमस्थान दक्षिण आफ्रिका आहे. हे ...
ग्लॅडिओलस (Gladiolus)

ग्लॅडिओलस

ग्लॅडिओलस हे लांब दांड्याच्या फुलांमधले एक लोकप्रिय व व्यापारी फुलपीक आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये सजावट व गुच्छ बनविण्यासाठी या फुलांना ...
घेवडा (French Bean)

घेवडा

भाजी किंवा उसळ याकरिता स्वयंपाकात वापरात असलेल्या आणि शिंबावंत (शेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या) गणातील व पॅपिलिऑनेटी कुलातील काही वनस्पती किंवा त्यांच्या ...
घोसाळे (Sponge Gourd)

घोसाळे

घोसाळे : (हिं. घिया तोरी; गु. तुरिया, गिलका; क. तुप्पहिरेकाई; सं. राज कोष्टकी; इं. स्पंज गोर्ड, बाथ स्पंज; लॅ. लुफा ...
चाकवत (Goosefoot)

चाकवत

चाकवत : (हिं. बेथुसाग, बेथुआ; गु. चील, तांको; क. चक्रवति; सं. वस्तुक, चक्रवर्ति;  इं. गूजफूट, पिगवीड, वाइल्ड स्पिनॅक;  लॅ. चिनोपोडियम ...
जंबो (Rocket salad)

जंबो

जंबो : (सं. भुतघ्न, दरघर्ष; हिं. तारामिरा, सेओहा; बं. श्वेत सुर्षा; पं. जंबा, तारा, आसु; इं. रॉकेट सॅलड; लॅ. एरुका ...
जवस (Linseed Plant)

जवस

जवस हे एक गळिताचे धान्य असून रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. मराठीत याला अळशी; हिंदीत अलसी;संस्कृतमध्ये अतसी, अतसिका,हैमवती, नीलपुष्पी, उमा ...
जिरे (Cumin)

जिरे

जिरे : (गोडे जिरे;  हिं. झिरा; गु. जीरू; क. जिरिगे; सं. जीरक, दीर्घक; इं. क्यूमीन, व्हाइट जीरा; लॅ. क्युमीनम सायमियम; ...
जीवाणू खते (Biofertilizers)

जीवाणू खते

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि तिचा कस राखून ठेवण्यासाठी मुख्यत्वे खतांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि जीवाणू ...
झिनिया (Zinnia)

झिनिया

झिनिया : फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) सूर्यफुल कुलातील हा एक वंश असून त्यात एकूण वीस जाती अंतर्भूत आहेत व त्या बहुतेक  ...
झेंडू ( African Marygold )

झेंडू

झेंडू : (मखमल; हिं. गुलजाफरी, गेंद; सं. स्थूलपुष्प; इं. आफ्रिकन मॅरीगोल्ड; लॅ. टॅजेटस इरेक्टा; कुल-कंपॉझिटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ...
टरकाकडी (Snake cucumber)

टरकाकडी

टरकाकडी : (हिं. गु. म. काकडी सं. लोमशी, मूत्रला,ग्रीष्म-कर्कटी क. दोड्डसंवति इं. स्नेक कुकंबर लॅ. कुकुमिस मेलो, प्रकार युटिलिसिमस कुल-कुकर्बिटेसी).ही ...
ट्यूलिप (Tulip)

ट्यूलिप

पलांडू कुलातील ट्यूलिपा वंशातील कोणत्याही वनस्पतीला ट्यूलिप हे सर्वसाधारण नाव आहे. या वंशात सु. १६० जाती असून त्या जंगली अवस्थेत ...
डबल बीन (Double Bean)

डबल बीन

डबल बीन : (डफळ; हिं. सेम; इं. लिमा बिन, बर्मा बीन, रंगून बीन; लॅ. फॅसिओलस ल्युनॅटस ;कुल-लेग्युमिनोजी-पॅपिलिऑनेटी). मोठ्या शहरांच्या आसपास ...
डाळिंब (Pomegranate)

डाळिंब

डाळिंब हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात साधारणतः ८७,५५० हेक्टरहून अधिक क्षेत्र या फळपिकाखाली लागवडीत आहे. वर्षातून कोणताही  – ...