(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
तमिळ, ग्रीक, लॅटिन, संस्कृत, हिब्रू, चायनीज, अरेबिक या जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त अभिजात भाषा होत. त्या भाषांमधील प्राचीन साहित्य हे अभिजात वाङ्मय आहे. अभिजात ही संकल्पना तशी नवीन आहे. ‘जुने ते सोने’ हे समजून आता आपण या भाषा आणि त्यातील साहित्याकडे एक मूल्यवान ठेव म्हणून पाहात आहोत.

कला आणि साहित्यासाठी ‘अभिजात’ ही संकल्पना युरोपीय खंडात पहिल्यांदा वापरली गेली. मध्ययुगात व यूरोपीय प्रबोधनकाळात अभ्यसनीय व अक्षर अशा साहित्यकृतींना व साहित्यिकांना अभिजात मानण्यात आले. ‘अभिजात’ या संज्ञेचा उपयोग, भाषा या शब्दाचे विशेषण म्हणून, ऑल्स जेलियस यांनी इ.स.च्या दुसऱ्या शतकात प्रथम केला. इ.स.पू. सु. ८५० ते ३ रे शतक या कालखंडातील होमर, हेसिअड, पिंडर इ. कवी, नाटककार, सॉक्रेटीस, प्लेटो, अॅंरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञ व साहित्यशास्त्रकार या सर्वांनी प्राचीन ग्रीक साहित्य संपन्न केले. अभिजाततावादाला अभिप्रेत असणारे आदर्शानुकरण व संकेतपालन हे विशेष प्रथम लॅटिन साहित्यात (इ.स.पू. २४० ते इ.स. ५००) दिसतात.

अभिजात शब्द अभिजन या संकल्पनेशी संबंधित आहे. भव्यता, उदात्त मूल्य, अभ्यासपूर्णता आणि नियमबद्धता अशी याची काही गुणवैशिष्टये. पण त्याच बरोबर आविष्कारातला संयम आणि औचित्य महत्वाचे. व्यंग्यार्थाने सुचवण्याचे कवीचे कौशल्य. यामुळे एकापेक्षा जास्त अन्वय लावता येण्याची, वेगवेगळे अर्थ लावता येण्याची शक्यता अभिजात कलाकृतीत असते. नियमबद्धता पाळूनही स्वतंत्र रचना आणि विविध अर्थ प्रसवणारी कलाकृती अभिजात असते. म्हणूनच ती कालातीतही असते. कलात्मक प्रमाणबद्धता, भव्योदात्त आशय व शाश्वत सत्यांचे प्रतिपादन या बाबतींत आढळते. आदर्श व अनुकरणीय ठरणारे जे साहित्य, ते अभिजाततावादी होय, हा प्रबोधनकाळाचा दृष्टिकोन होता. याउलट लोककलांमधे नियम झुगारून देणारी मुक्त अभिव्यक्ती, उत्तमाचा ध्यास न धरता सहजपणे अभिव्यक्त होणं आणि त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचणं ही स्वाभाविक वैशिष्टये दिसतात. तर अभिजाततेत सदभिरुची, प्रातिनिधिक स्वभावचित्रण, सामाजिक उद्बोधन व आशय-अभिव्यक्तीमधील सर्वांगीण औचित्यविचार यांचा प्राधान्याने विचार असतो.

याच आधारावर कालांतराने संस्कृत, चायनीज, जॅपनीज, अरेबिक या प्राचीन साहित्यालाही अभिजात साहित्याचा मान मिळाला. प्राचीन कालखंड, धार्मिक विचार, राजसत्तांचा साहित्यावर प्रभाव आणि पद्यातून अभिव्यक्ती हे या परंपरांचे वैशिष्टय आहे. हीच वैशिष्टये जगभरातील प्राचीन अभिजात वाङ्मयातून प्रगट होतात. अभिजातता कमी-अधिक फरकाने कला, स्थापत्य, भाषा, विज्ञान अशाप्रकारच्या मानवी जीवनाच्या सर्व अंगामध्ये एकाच वेळी अस्तित्वात येते.

संस्कृत या भारतातील प्राचीनतम भाषेचे उदाहरण या संदर्भात पाहणे युक्त ठरेल. ऋग्वेदापासून अथवा त्याच्याही आधीपासून संस्कृतात साहित्याची निर्मिती होऊ लागली. ऋग्वेदाची रचना ही साधे आणि शिथिल छंद आणि व्याकरण यांच्या अनुषंगाने झालेली दिसते. ऋग्वेदापासून उपनिषदांपर्यंतची रचना कमी-अधिक फरकाने याच प्रकारात मोडते. यानंतर निर्माण झालेल्या महाभारत आणि रामायण या ऋषिनिर्मित साहित्यात भाषा अधिक सुघटित झाली. तिच्यातील वैदिक स्वरांचा लोप झाला. या भाषारचनेला व्याकरणाने आणि छंदःशास्त्राने नियमबद्ध केले. त्यानंतर मात्र“जे पाणिनीला ज्ञात नाही ते व्याकरणदृष्ट्या अशुद्ध” असे समजले जाऊ लागले. शिथिल छंदांचेही रूपांतर बांधीव अशा अक्षररगणवृत्तांमध्ये झाले. वृत्तांची लांबी आणि संख्या वाढू लागली. अशाच प्रकारचे निश्चित निकष आणि नियम हे अलंकार, शैली, रस यांच्या संदर्भातही निर्माण झाले.

भारतीय प्राचीन अभिव्यक्तीमध्ये जैन आणि बौद्ध वाङ्मयाची परंपरा समृद्ध करणारे पाली आणि प्राकृत भाषेतील ग्रंथही मौलिक आहेत. त्या साहित्याने भारतीय समाजाला समृद्ध आणि विचारशील केलेच पण हे साहित्य आणि त्यातील विचारधन जगातील अनेक देशांमध्ये फार पूर्वीच स्वीकारले गेले. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म म्हणून स्वीकारला गेला. त्या त्या ठिकाणच्या भाषांमध्ये मूळ पाली व संस्कृत ग्रंथ भाषांतरित झाले. त्यातील अनेक ग्रंथांचे आजही वाचन होते. जैन संप्रदायाचे ग्रंथ संस्कृत, प्राकृत तसेच अपभ्रंश भाषांमध्ये आहेत. अनेक राजे, व्यापारी तसेच सामान्यजनांनी देखील या धर्मांचा व त्यातील साहित्याचा स्वीकार मोठया प्रमाणावर केला होता. त्यामुळे पाली, प्राकृत, अपभ्रंश, बौद्ध संकर संस्कृत वाङ्मयाचाही अभिजात साहित्यात समावेश करण्यात येतो.

अभिजात भाषा म्हणजे ‘मृत’ भाषा असे मानण्याची भाषाशास्त्राची रीत आहे. शास्त्रीय परिभाषा तयार करणे आणि धार्मिक कृत्ये या प्रयोजनांव्यतिरिक्त प्राचीन ग्रीक, लॅटिन इत्यादी भाषा आज वापरात नाहीत यामुळे ही कल्पना अस्तित्वात आलेली आहे. या भाषांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. भारतात मात्र अशी स्थिती नाही. वरील दोन प्रयोजनांव्यतिरिक्त संस्कृतादी प्राचीन भाषा आणि लिपी यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच भारत सरकारने अभिजात मानलेल्या तमिळ, कन्नड, तेलुगू, हिन्दी इत्यादी भाषांमध्ये लोकव्यवहार आजही सुरू आहे. त्यामुळे अभिजात भाषा म्हणजे सर्वस्वी मृत भाषा ही कल्पना भारतीय भाषांना पूर्णपणे लागू पडत नाही.

५ फेब्रुवारी २०१४ रोजी भारत सरकारने भारतीय भाषांच्या अभिजाततेसंबंधी पुढील नियम निश्चित केले. ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि जुने वाङ्मय त्या भाषेत असावे. त्या भाषेतील प्राचीन वाङ्मय मौल्यवान वारसा म्हणता यावे अशा स्वरूपाचे असावे. त्या भाषेला स्वतन्त्र आणि दुसर्‍या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असावी. जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे. या कसोटयांवर केन्द्र सरकारने १७ सप्टेंबर २००४ ह्या दिवशी तमिळ भाषा ‘अभिजात’ असल्याचे घोषित केले. २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड व तेलगू, २०१३ मध्ये मल्याळम् आणि २०१४ साली ओडिया या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला.

या ज्ञानमंडळातून भारतीय तसेच जागतिक अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री (Vardhaman Parshwanath Shastri)

वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री

वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री : (२७ मार्च १९१९- २८ डिसेंबर १९८१) जैन धर्म आणि साहित्यातील तत्वचिंतक, संपादक लेखक. त्यांचा जन्म कर्नाटकातील ...
वामदेव (Vamadeva)

वामदेव

वामदेव : एक वैदिक ऋषी. ‘ वामदेव गोतम ’ वा ‘ वामदेव गौतम ’ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. त्याच्या वडिलांचे नाव गोतम व आईचे नाव ममता. त्यास ...
वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर (Vasudevshastri Mahadevbhatt Abhyankar)

वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर

अभ्यंकर, वासुदेवशास्त्री महादेवभट्ट : (४ ऑगस्ट १८६३ – १४ ऑक्टोबर १९४२). महाराष्ट्रातील विख्यात संस्कृत वैयाकरणी व शास्त्रसंपन्न पंडित. व्याकरणमहाभाष्य  ह्या ...
विश्वगुणादर्शचम्पू (Visvagunadarsacampu)

विश्वगुणादर्शचम्पू

विश्वगुणादर्शचम्पू : वेंकटाध्वरी यांनी लिहिलेली विश्वगुणादर्शचम्पू चम्पूवर्गातील एक संस्कृत कलाकृती.भौगोलिकदृष्टया हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. चम्पूरचनांप्रमाणेच याही रचनेत गद्य व ...
वीथी (Vithi)

वीथी

शेवटचा रूपकप्रकार. सर्व रसांच्या लक्षणांनी समृद्ध,तसेच तेरा अंगांनी युक्त आणि एक अंक असलेली तसेच एका पात्राने किंवा दोन पात्रांनी अभिनीत ...
वैदिक वाङ्मयातील स्त्री-कवयित्री (Poetesses of vedik literature)

वैदिक वाङ्मयातील स्त्री-कवयित्री

स्त्री-कवयित्री (वैदिक वाङ्मयातील) : वैदिक वाङ्मय हे जगातील पहिले उपलब्ध वाङ्मय होय. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ...
वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति (Vaidyanath Prasad Prashasti)

वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति

वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति : देवकुमारिका ह्या स्त्री कवयित्रीने रचलेले संस्कृत काव्य (रचनाकाळ इ.स. १७१६). १८ वे शतक हा कवयित्रीचा कालखंड ...
व्हिलम कलांद  (William Caland)

व्हिलम कलांद

कलांद, व्हिलम : (२७ ऑगस्ट १८५९ – २० मार्च १९३२). जर्मन भारतविद्यावंत, वैदिक साहित्याचे आणि कर्मकांडाचे महान अभ्यासक. त्यांचा जन्म ब्रिएल् ...
शकुन्तला

शकुंतला : कविकुलगुरु  कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल या अजरामर नाटकाची नायिका आणि महाभारतातील एक स्त्रीपात्र. तिची कथा प्रथम महाभारताच्या आदिपर्वात आलेल्या शकुंतलोपाख्यानात ...
शाहनामा ए फिरदौसी (Shahnameh of Ferdowsi)

शाहनामा ए फिरदौसी

शाहनामा ए फिरदौसी : एक अरबी छंदबद्ध काव्य. या काव्यातील मध्यवर्ती ५० पात्रे ही पर्शियाच्या पौराणिक कथा व इतिहासातील शूर ...
शिलप्पधिकारम् (Silappathikaram)

शिलप्पधिकारम्

शिलप्पधिकारम् : प्राचीन, अभिजात तमिळ महाकाव्य. इळंगो अडिगळ या कवीने ते सु. दुसऱ्या शतकात रचले. इळंगो अडिगळ हा शेंगुट्टवन या ...
शी यु ची (Xī Yóu Jì)

शी यु ची 

शी यु ची : जर्नी टू द वेस्ट (इं.शी). चिनी साहित्यातील चार महान कादंबऱ्यांपैकी एक लोकप्रिय कादंबरी. ही कादंबरी १६ ...
श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय (Shree Somnath Sanskrit University)

श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय

श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय : वेरावल,गीर-सोमनाथ येथील गुजरात राज्यातील एकमात्र संस्कृत विद्यापीठ. इ.स. २००५ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. ‘पूर्णता ...
श्रीधरशास्त्री वारे (Shridharshastri Ware)

श्रीधरशास्त्री वारे

वारे, श्रीधरशास्त्री : (१६ सप्टेंबर १९०३ – २४ऑगस्ट १९६४). महाराष्ट्रातील थोर संस्कृत अभ्यासक आणि लेखक. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नासिकमध्ये झाला ...
सचित्र हस्तलिखिते (Illuminated Manuscript)

सचित्र हस्तलिखिते

सचित्र हस्तलिखिते : हस्तलिखित ग्रंथ लेखनाचे प्रमुख कारण ज्ञानार्जन हे असले तरी ज्ञान कलेच्या सहाय्याने ते अधिक समृद्ध करण्याची हौसही ...
संदेश रासक (Sandesh Rasak)

संदेश रासक

संदेश रासक : अब्दुल रहमान या मुसलमान कवीने तेराव्या शतकात लिहिलेले दूतकाव्य. अपभ्रंश भाषेतील २२३ कडवकांचे हे काव्य तीन प्रक्रमांत ...
समवकार (Samavkar)

समवकार

संस्कृतमधील दशरूपकांपैकी म्हणजे दहा नाट्यप्रकारांपैकी एक रुपकप्रकार. नाट्यशास्त्राच्या चौथ्या अध्यायात म्हटले आहे की,नाट्यवेदाची निर्मिती करून तो भरतमुनींच्या स्वाधीन केल्यावर आणि ...
संस्तारक (Sanstarak)

संस्तारक

संस्तारक : संथारग.अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकातील (संग्रह) संस्तारक प्रकीर्णक हे सहावे प्रकीर्णक आहे. संथारग म्हणजे शय्या, अंतिम समयीच्या ...
साराशिना निक्की (Sarashina nikki)

साराशिना निक्की

साराशिना निक्की : अभिजात जपानी साहित्यातील हेइआन कालखंडामधील रोजनिशी. ही साहित्यकृती इ.स.१०५९ मध्ये सुगिवारा नो ताकासुएच्या मुलीने लिहिली आहे. ही ...
सावित्री (Sawitri)

सावित्री

सावित्री : महाभारतातील एक प्रसिद्ध पात्र. सावित्रीचे उपाख्यान हे महाभारताच्या वनपर्वात येते. वनवासात असताना युधिष्ठिर मार्कण्डेय ऋषींशी राज्यापहरण आणि द्रुपदकन्या ...