(प्रस्तावना) पालकसंस्था : भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे | समन्वयक : डॉ. माधवी ठाकूर देसाई | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड
निसर्ग आणि गणित यामधील अतूट संबंध अतिप्राचीन काळापासून मानव शोधत आहे. पशुपक्षी, वनस्पती, मनुष्य यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या निवाऱ्यांमध्ये मानवनिर्मित सर्व गोष्टींमध्ये एवढेच नव्हे तर निसर्गात घडणाऱ्या सर्व खगोलीय घटनांमागे गणितीय संकल्पना दडलेल्या आहेत. प्राचीन काळातच निसर्गातील विविध गोष्टींचे निरीक्षण नोंदविताना कधीतरी अंकांचा जन्म झाला असावा आणि त्यातूनच पुढे सर्व शास्त्रांचे मूळ असणाऱ्या गणितशास्त्राचा जन्म झाला असावा.माणसाने गणितशास्त्राची निर्मिती आपल्या आजूबाजूचे जग कसे आहे? त्यात अनेक परस्पर संबंध नसलेल्या ज्या घटना घडत असतात त्यांचा उगम आणि अंत जाणून घेण्यासाठी केला असेही म्हणता येईल.गणितशास्त्र म्हणजे माणसाने निर्माण केलेली आद्य आणि सर्वोच्च विद्या आहे.अतिप्राचीन काळापासून जवळजवळ सगळ्याच संस्कृतींमध्ये गणिताची सुरवात झालेली आढळते. भारताला तर गणिताची महान परंपरा आहे.
गणित या शब्दाची व्याख्या गणेशदेवज्ञ यांनी आपल्या बुद्धिविलासिनी या ग्रंथात पुढीलप्रकारे केली आहे. “गण्यतेसंख्यायतेतद् गणितम्l”म्हणजे ज्याद्वारे परिकलन केले जाते किंवा मोजदाद केली जाते.ते गणित होय. गणित म्हणजे निरीक्षणातून आलेल्या निष्कर्षांची, संकल्पनांची सूत्रबद्धरीतीने मांडणी करून त्यातील सहसंबंध दर्शविणारी सूक्ष्म वैज्ञानिक प्रणाली होय.गणिताशास्त्रात नुसते अंक,चिन्हे एवढेच नसतात तर शून्य,अनंत अशा संकल्पनाही असतात.
गणितशास्त्राचा उपयोग भौतिक, रसायन, खगोल, व्यापार, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांमध्ये होतोच याशिवाय संगीत, चित्रकला इत्यादी कलांमध्येहीहोतो संगणकशास्त्राचा पाया गणितशास्त्रातच आहे. यामुळेच गणितशास्त्रचा अभ्यास करणे अनिवार्य झाले .
“सांख्यिकी म्हणजे संख्यात्मक व वर्णनात्मक माहिती (डेटा) गोळा करणे, त्याची पुनर्मांडणी करणे, त्याचे विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढणे व यांच्या विविध पद्धतींचा शास्त्रीय अभ्यास होय”. नियोजनासाठीसंख्याशास्त्राचा उपयोग अनिवार्य आहे. या नियोजनाच्या युगात सरकार किंवा व्यावसायिक संख्याशास्त्राचा उपयोग करून कामांमध्ये कार्यक्षमता आणतात. आधुनिक काळात संख्याशास्त्राच्या मदतीने विमाशास्त्राचा अधिक विकास झाला व त्यातून विमा गणितशास्त्र ही संख्याशास्त्राची नवीन शाखा उदयास आली.
संख्याशास्त्राचा अर्थशास्त्रात,जीवशास्त्रात,खगोलशास्त्रात, वैद्यकीयशास्त्रात, मानसशास्त्रात अचूक निर्णयासाठी उपयोग केला जातो. संरक्षणशास्त्रातही संख्याशास्त्राचा उपयोग केला जातो. तसेच क्रीडा, कृषी, वाणिज्य, मानव्यविद्या, संगणकशास्त्र, हवामानशास्त्र अशा क्षेत्रातही संख्याशास्त्राचा उपयोग अनिवार्य आहे.विश्वातील एकही क्षेत्र असे नाही, जेथे संख्याशास्त्राचा वापर होत नाही.जीवनातील प्रत्यक घडामोडीत संख्याशास्त्राचे दर्शन होते. जन्मापासून मृत्यू पर्यंत मानवी जीवनाचा संख्याशास्त्राशी संबंध येतो, म्हणून संख्याशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.
जातस्य हि ध्रुवा संख्या ध्रुवा संख्या मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येSर्थे संख्याशास्त्रं पठाम्यहम् ॥
०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, आणि ९ ही एकूण दहा देवनागरी अंकचिन्हे आहेत. म्हणून ह्या अंकांच्या ...
‘अंकमूळ’ ही संकल्पना आकडेमोडीची पडताळणी करण्यासाठी उपयोगी आहे. दोन किंवा अधिक अंकी (दहापेक्षा मोठी नैसर्गिक संख्या) संख्येचे अंकमूळ शोधण्यासाठी प्रथम ...
या वास्तव संख्या संचाचे अनेक महत्त्वाचे उपसंच आहेत. अंतराल (interval) हा त्यापैकी एक महत्त्वाचा
संच आहे. कलन या गणितीय शाखेत ...
सांख्यिकी मध्ये आधारसामग्रीचे विश्लेषण करताना त्या आकडेवारीचे प्रतिनिधित्व करेल अशा एका संख्येची आवश्यकता असते. याकरिता मध्यमान, मध्यगा आणि बहुलक याकेंद्रीय ...
केंद्रीय मापकाच्या जोडीला अपस्करण परिमाण नोंदविणे आवश्यक असते. विस्तार हे
अपस्करणाचे सर्वात सोपे आणि सहज वापरले जाणारे परिमाण असले तरी ...
निसर्गातल्या आकारांमध्ये नेहमी सममिती किंवा प्रमाणबद्धता (Symmetry) बघायला मिळते. असे असले तरी जर बारकाईने निरीक्षण केले तर असे लक्षात येते ...
आर्किमिडीज हे प्रसिद्ध ग्रीक गणिती व संशोधक होते. सिसिलीमधील सेरक्यूज येथे सुमारे इ.स.पू. 287 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी पदार्थविज्ञान, ...
ग्रीक गणितज्ञ
इरेटॉस्थेनिझ (Eratosthenes : इ.स.पू. सुमारे 276 – 194) यांनी ‘‘ या दिलेल्या एक पेक्षा मोठ्या नैसर्गिक संख्येपर्यंतच्या सर्व ...
प्राचीन भारतीय ऋषींनी संख्या लेखनासाठी एक युक्ती शोधली. कटपयादि (क, ट, प, य आदि) पद्धती ही एक सांकेतिक भाषा आहे ...
स्वयंभू आणि संगम संख्या : स्वयंभू संख्या ही संकल्पना थोर भारतीय गणिती दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी १९४९ मध्ये मांडली. यासाठी ...
थोर भारतीय गणिती कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी ४९५ आणि ६१७४ हे दोन स्थिरांक शोधले. (यापैकी ६१७४ हा कापरेकर स्थिरांक ...
‘कुट्टक’ म्हणजे कूट प्रश्न. सामान्यपणे कुट्टके (problems) एकचल (one variable), द्विचल(two variable) किंवा बहुचल (many variable) समीकरणांच्या आधारे सोडविले जातात ...
प्रशियाची (उत्तर-मध्य जर्मनीतील 1947 पूर्वीचे जर्मन साम्राज्य) राजधानी कोनिग्झबर्ग (सध्याचे कलिनिन्ग्राद, रशिया) ह्या शहरातून प्रेगेल नावाची नदी वाहत होती. तिच्या ...
- गृहितक (Axiom/ Postulate) : पारंपरिक गणिती लिखाणामध्ये, एखाद्या सिद्धांताची (theory) रचना करताना सिद्धांतातील ज्या पायाभूत बाबी पूर्ण सत्य आहेत ...
डिलियम येथे इ.स.पू. ४२४ मध्ये अथेन्स आणि बोयोशिया यांच्यात झालेले युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. ग्रीक तत्त्ववेत्ते प्लेटो यांनी आपल्या लायसिस ...
क्रिस्टिअन गोल्डबाख या जर्मन गणितज्ञाला जवळपास पावणेतीनशे वर्षांपूर्वी मूळसंख्यांच्या बाबतीत आढळलेला एक नियम ‘गोल्डबाखची अटकळ‘ ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
गणितातील ...
संस्थिती विज्ञानातील (Topology) एक महत्त्वाचा नियम. एखाद्या प्रतलावर काढलेला कोणत्याही भूभागाचा नकाशा विचारात घेतला असता ह्या भूभागावर अनेक छोटे मोठे ...
झीनो हे एक ग्रीक तत्त्ववेत्ता व गणितज्ञ इ. स. पू. 490 च्या सुमारास ग्रीस मधील इलीआ (आत्ता हे शहर इटलीमध्ये ...
बाबाबा
१) बाबाबा कसोटी : एका त्रिकोणाच्या (शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार) तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप असतील तर ...
त्रिकोणांची एकरूपता : जे त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एकास-एक संगतीनुसार परस्परांशी तंतोतंत जुळविता येतात ते त्रिकोण एकरूप असतात. दोन त्रिकोण एकरूप असतील ...