(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
प्रदीर्घ अशा अश्मयुगानंतर मानवाने केलेल्या धातुविज्ञानातील प्रगतीमुळे संस्कृती- चा विकास झपाटयाने होत गेला. अठराव्या शतकात औद्योगिकीकरणास चालना मिळून अनेक अवघड असे अभियांत्रिकी प्रकल्प मार्गी लागले. धातुविज्ञानातील या सर्व प्रगतीचा संक्षिप्त आढावा मराठी विश्वकोशाच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या १ ते २० खंडांत घेण्यात आला असून, अनेक मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. २०१७ नंतरच्या वर्षात मूलभूत आणि अनुप्रयुक्त विज्ञानात अनेक शोध लागून या शोधांचा उपयोग धातुतंत्रज्ञानात करण्यात आला आहे. यामुळे अभियांत्रिकीमधील अनेक आधुनिक आविष्कार शक्य होत आहेत. धातुविज्ञान फक्त धातूपुरते मर्यादित न राहाता यात अनेक पदार्थांचा समावेश झाल्यामुळे ते अधिक उपयुक्त आणि सर्वसमावेशक झाले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्यांचे विविध ज्ञानशाखांबद्दलचे कुतूहल वाढीस लागले आहे. एकविसाव्या शतकात सर्वच ज्ञानशाखांमधील कृतिम भिंती कोसळत असताना समांतर आणि दुसऱ्या ज्ञानशाखेत उपयोगी पडू शकतील अशा बाबींचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर मराठी विश्वकोशात असलेल्या धातुविज्ञानातील माहितीचे किंवा नोंदीचे अद्ययावतीकरण करणे आणि नवीन संकल्पनाची भर टाकणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट्य निश्चित करण्यात आले. त्यासाठी या विषयाचा पुढील अंगांनी विचार केला गेला आहे : प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुविज्ञानामधील संकल्पना आणि त्यावर आधारित संशोधनाच्या नवीन दिशा, पोलादासारख्या औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या मिश्र धातुंचे उत्पादन, पृष्ठभाग धातुविज्ञान, भौतिकी आणि रासायनिक धातुविज्ञान, संरचनात्मक धातुविज्ञान आणि प्रगत धातुविज्ञान.
अणुशक्तिकेंद्राच्या रचनेत लागणारे मिश्रधातु
अणुशक्तिकेंद्रात युरेनियमच्या अणूंचे विभंजन (Nuclear Fission) करून मोठी ऊर्जा तयार होते व या ऊर्जेच्या साहाय्याने वाफेवर चालणारे टर्बाइन चालवून वीज ...
अति उच्च सामर्थ्यवान पोलाद
उच्च सामर्थ्यवान पोलादाचे ताण सामर्थ्य (Tensile strength) ६०० ते १००० MPa या दरम्यान असते. यापेक्षा जास्त ताण सामर्थ्य असलेल्या पोलादास ...
अभियांत्रिकी निरुपयोगिता विश्लेषण
अभियांत्रिकी निरुपयोगिता विश्लेषण करताना निरुपयोगिता म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे “एखादा भाग किंवा घटक, ज्या कार्यासाठी तयार ...
अभिवाह
धातू किंवा धातुपाषाण वितळविताना तयार होणाऱ्या द्रवाची तरलता (पातळपणा) वाढविण्यासाठी व नको असलेली मलद्रव्ये त्याच्यातून धातुमळीच्या स्वरूपात निघून जावीत म्हणून ...
उच्च एंट्रॉपी मिश्रधातू
एंट्रॉपी म्हणजे पदार्थ किंवा व्यवस्थेतील अनियंत्रिततेचे परिमाण. तापीय किंवा ऊष्मीय (Thermal Entropy) व अविन्यासी किंवा समाकृतिक (Configurational Entropy) असे एंट्रॉपीचे ...
उच्च क्रोमियम बीड
उच्च तापमान ऑक्सिडीकरण
उच्च तापमान ऑक्सिडीकरण ही उच्च तापमानात घडणारी धातूंच्या गंजण्याची विक्रिया असून यात धातू व वातावरणातील ऑक्सिजन यांची रासायनिक विक्रिया होते ...
उष्माबाधित क्षेत्र
एलिंगहॅम आकृती
ऑक्सिडीकरणाच्या वेगाचे नियम
ऑक्सिडीकरण ही कोणत्याही उच्च किंवा सामान्य तापमानास घडणारी धातूंच्या गंजण्याची विक्रिया असून हिच्यात धातू व वातावरणातील ऑक्सिजन यांची रासायनिक विक्रिया ...
ऑसटेंपर्ड तन्य लोखंड
जगभर ओतल्या जाणाऱ्या धातूंमध्ये बिडाचा (Gray Cast Iron) वाटा मोठा आहे. ओतकामाची सुलभता, मशिनिंगची सुलभता, कंपने शोषून घेण्याची क्षमता इत्यादी ...
ओतकाम दोष
काळ्या बिडाच्या बाबतीत कास्टिंगमधील विविध भागांची जाडी ही त्याच्या अंतिम गुणधर्मावर परिणाम करीत (Section Sensitivity) असते. काळ्या बिडाचे अंतिम गुणधर्म ...
ओतीव भागातील दोषांचे सूक्ष्मरचनादर्शक यंत्राने पृथक्करण
धातुशास्त्रातील ओतकाम करून तयार केलेल्या उपयुक्त भागांमध्ये बरेचदा वेगवेगळ्या प्रकारचे दोष येत असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या यंत्रामध्ये वापरता येत नाहीत ...
ओल्या रेतीतील समावेशके
कर्बयुक्त समावेशक (Crbonaceous Matter) म्हणून पारंपरिक पद्धतीत कोळशाची भुकटी (Coal Dust) वापरली जात असे. परंतु आता खास रीतीने कृत्रिम रीत्या ...
औष्णिक प्रतिबंध लेपन
औष्णिक प्रतिबंध लेपन /आवरण ही अतिप्रगत धातुप्रणाली असून धातूचे उच्च तापमानापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या पृष्ठभागावर आच्छादली/लेपन केली जाते. हे लेपन ...
कथिलाच्छादित पत्रे
सामान्यपणे कथिलाचा मुलामा दिलेल्या पोलादी पत्र्याला किंवा पट्टीला कथिलाच्छादित पत्रा म्हणतात. कथिल विषारी नसते, त्याचा पातळ मुलामा देता येतो आणि ...
कमी ठिसूळ बीड
काळे बीड (Grey Cast Iron) हे ठिसूळ असते. त्याला चिवट व जास्त ताकदवान बनविण्याच्या प्रयत्नातून कमी ठिसूळ बिडाचा जन्म झाला ...
कल्हई
सामान्यपणे पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप देतात,अशा लेपाला कल्हई म्हणतात. शुद्ध कथिल विषारी नसते व त्याच्यावर हवेचा ...
कवच पद्धतीचे साचेकाम
ओल्या मातीतील साचेकामाला काही मर्यादा आहेत. त्यामध्ये किचकट भौमितिक आकार असलेली कास्टिंग काढणे अवघड जाते. तसेच कास्टिंगच्या मापांच्या अचूकतेवरसुद्धा मर्यादा ...
काच विज्ञान आणि तंत्रज्ञान
अकार्बनी ऑक्साइड व कमी-अधिक सिलिका ज्यांच्यात आहेत अशा पदार्थांचा वितळलेला द्रव वेगाने थंड झाल्यावर तयार होणाऱ्या घन पदार्थांना काच म्हणतात ...