(प्रस्तावना) पालकसंस्था : प्रभात चित्र मंडळ, दादर, मुंबई | समन्वयक : संतोष पाठारे | संपादकीय सहायक : वर्षा देवरुखकर
चित्रपट हे सर्वांच्या परिचयाचे आणि तरीही नवे माध्यम आहे. एकूण कलांचा इतिहास पाहिला, तर तुलनेने खूपच मर्यादित कालावधीत हे माध्यम विकसित झाले आहे. चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कला शेकडो वर्षांच्या कालावधीत घडत, बदलत गेलेल्या आहेत. त्या तुलनेने चित्रपट या कलामाध्यमाला नुकतीच शंभर वर्षे पुरी झाली. त्यामुळे एका परीने आपण चित्रपटमाध्यमाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्येच आहोत. तरीही आज चित्रपटाने एक कलाप्रकार म्हणून आणि तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे.

चित्रपट हे कला आणि विज्ञान यांचे एकसंध मिश्रण आहे, आणि त्याचा विकास हा शंभर वर्षांत झालेला असला, तरी वेगवेगळ्या कालावधींत वेगवेगळ्या प्रांतांमधून त्यात प्रगती होत गेलेली आहे. ल्युमिएरबंधूंनी जेव्हा १८९५ मध्ये हे माध्यम प्रथम लोकांपर्यंत आणले, तेव्हा ते कृष्णधवल स्वरूपात होते, ध्वनी नव्हता, त्याचा वापर कसा केला जाईल, हेदेखील पूर्णत: अनिश्चित होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत त्याचा तांत्रिक विकास होत त्याला एक पूर्ण स्वरूप आले, त्याचबरोबर त्याचा एक कथामाध्यम म्हणून विविध मार्गांनी कसा वापर केला जाईल, या संबंधातही विचार झाला. या काळात जसे प्रतिभावान दिग्दर्शक या माध्यमात उतरले, तसेच अनेक विचारवंतही. त्यांच्या कामामधून चित्रपटाने समाजाला सर्वांत जवळचे कलामाध्यम म्हणून नाव मिळवले. दुसऱ्या महायुद्धानंतर चित्रपटनिर्मितीचा व्याप खूपच वाढला आणि मोठ्या चित्रपट उद्योगांबरोबरच लहानलहान देशही त्यात सामील झाले. आज आपण चित्रपट ज्यावर मुद्रित होतो, त्या फिल्मलाच रजा देऊन डिजिटल युगात पोचलो आहोत. हा सारा इतिहास, त्याबरोबरच संबंधित व्यक्ती आणि विचारांचा आढावा, हा या विषयाचा महत्त्वाचा भाग आहे.

जागतिक चित्रपटाकडे पाहताना भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास कसा झाला, हेदेखील पाहणे आवश्यक ठरते. त्याबरोबरच चित्रपटाचे तंत्र आणि तंत्रज्ञान, महत्त्वाच्या संकल्पना, परिभाषा आणि चित्रपटाबरोबरचे समाजाचे नाते या सगळ्यांचा विचार येथे केला जाईल.

दादा कोंडके (Dada Kondke)

दादा कोंडके

कोंडके, दादा : ( ८ ऑगस्ट १९३२ – १४ मार्च १९९८). मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते ...
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke)

दादासाहेब फाळके 

फाळके, दादासाहेब : ( ३० एप्रिल १८७० – १६ फेब्रुवारी १९४४). भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार. ते ...
दिलीपकुमार (Dilipkumar)

दिलीपकुमार 

दिलीपकुमार : (११ डिसेंबर १९२२ – ७ जुलै २०२१). भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या पंक्तीतील अग्रणी नाव. त्यांचे मूळ नाव ...
दीवार (Deewar)

दीवार

लोकप्रिय हिंदी चित्रपट. भारतीय हिंदी चित्रपटांच्या इतिहासामध्ये कथा, दिग्दर्शन, अभिनय, संवाद, गाणी व संगीत अशा सर्वच बाबतींत यशस्वी ठरलेला हा ...
दुर्गा खोटे (Durga Khote)

दुर्गा खोटे

खोटे, दुर्गा : ( १४ जानेवारी १९०५ – २२ सप्टेंबर १९९१ ). मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री ...
दो आँखे बारह हाथ (Do Ankhen Barah Haath)

दो आँखे बारह हाथ

चित्रपटमहर्षी व्ही. शांताराम दिग्दर्शित व निर्मित हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिजात कलाकृती. राजकमल कलामंदिर निर्मित हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला ...
नर्गिस (Nargis)

नर्गिस 

दत्त, नर्गिस : ( १ जून १९२९ – ३ मे १९८१ ). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म कोलकाता येथे ...
निळू फुले (Nilu Phule)

निळू फुले

फुले, निळू : (२५ जुलै १९३१–१३ जुलै २००९). मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते. मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले. ‘निळूभाऊʼ ...
नूतन (Nutan)

नूतन

नूतन : (४ जून १९३६ – २१ फेब्रुवारी १९९१). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व ख्यातकीर्त अभिनेत्री. यांनी अनेकदा हिंदी चित्रपटांच्या रूढ ...
पोलंडचा चित्रपट (Film of Poland)

पोलंडचा चित्रपट

पोलंडच्या चित्रपटसृष्टीचे जागतिक योगदान लक्षणीय आहे. चित्रपटविषयक अनेक पायाभूत गोष्टी पोलंडमध्ये घडल्या. आज जगभरातील अनेक महोत्सवांत पोलंडचे चित्रपट दाखविले जातात ...
प्यासा (Pyaasa)

प्यासा

भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेला अभिजात कलात्मक चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेला हा हिंदी कृष्णधवल चित्रपट ...
प्रभाकर पेंढारकर (Prabhakar Pendharkar)

प्रभाकर पेंढारकर

पेंढारकर, प्रभाकर : (८ सप्टेंबर १९३३ – ७ ऑक्टोबर २०१०). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि साहित्यिक. चित्रपटमहर्षी ...
प्रभात चित्र मंडळ (Prabhat Chitra Mandal)

प्रभात चित्र मंडळ

भारतातील एक अग्रगण्य फिल्म सोसायटी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट-दिग्दर्शक सत्यजित राय यांनी स्थापन केलेल्या ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ या ...
फिल्म सोसायटी चळवळ (Film Society Movement)

फिल्म सोसायटी चळवळ

चित्रपटप्रेमींची सदस्यता असलेली संस्था. इथे अन्यथा चित्रपटगृहांमध्ये सहसा पाहायला न मिळणारे कलात्मक चित्रपट सदस्यांना दाखवले जातात, कला म्हणून त्यांची चर्चा ...
फ्रिट्झ लांग (Fritz Lang)

फ्रिट्झ लांग

लांग, फ्रिट्झ : (५ डिसेंबर १८९० – २ ऑगस्ट १९७६). प्रसिद्ध जर्मन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. त्याचे पूर्ण नाव फ्रिड्रिख क्रिस्तीआन आंतोन ...
बाबूराव पेंटर (Baburao Painter )

बाबूराव पेंटर

बाबूराव पेंटर : (३ जून १८९० – १६ जानेवारी १९५४). प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक. पूर्ण नाव बाबूराव ...
बाबूराव पेंढारकर (Baburao Pendharkar)

बाबूराव पेंढारकर

पेंढारकर, दामोदर ऊर्फ बाबूराव : (२२ जून १८९६ – ९ नोव्हेंबर १९६७). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक ...
बायसिकल थिव्ह्ज (Bicycle Thieves)

बायसिकल थिव्ह्ज

बायसिकल थिव्ह्ज या चित्रपटातील एक छायाचित्र इटलीतील नववास्तववादी प्रवाहातील एक महत्त्वाचा चित्रपट. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात काही चित्रपटांनी महत्त्वाचे स्थान मिळविले ...
बालचित्रपट समिती, भारतातील (चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया) Children's Film Society of India

बालचित्रपट समिती, भारतातील

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बालचित्रपट समितीची स्थापना केली. नेहरू यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. पूर्णपणे ...
बिमल रॉय (Bimal Roy)

बिमल रॉय

रॉय, बिमलचंद्र : (१२ जुलै १९०९ – ८ जानेवारी १९६६). जागतिक चित्रपटइतिहासात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे चित्रकर्मी. त्यांचा जन्म पूर्व ...
Loading...