(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा देवरुखकर
चित्रपट हे सर्वांच्या परिचयाचे आणि तरीही नवे माध्यम आहे. एकूण कलांचा इतिहास पाहिला, तर तुलनेने खूपच मर्यादित कालावधीत हे माध्यम विकसित झाले आहे. चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कला शेकडो वर्षांच्या कालावधीत घडत, बदलत गेलेल्या आहेत. त्या तुलनेने चित्रपट या कलामाध्यमाला नुकतीच शंभर वर्षे पुरी झाली. त्यामुळे एका परीने आपण चित्रपटमाध्यमाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्येच आहोत. तरीही आज चित्रपटाने एक कलाप्रकार म्हणून आणि तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे.

चित्रपट हे कला आणि विज्ञान यांचे एकसंध मिश्रण आहे, आणि त्याचा विकास हा शंभर वर्षांत झालेला असला, तरी वेगवेगळ्या कालावधींत वेगवेगळ्या प्रांतांमधून त्यात प्रगती होत गेलेली आहे. ल्युमिएरबंधूंनी जेव्हा १८९५ मध्ये हे माध्यम प्रथम लोकांपर्यंत आणले, तेव्हा ते कृष्णधवल स्वरूपात होते, ध्वनी नव्हता, त्याचा वापर कसा केला जाईल, हेदेखील पूर्णत: अनिश्चित होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत त्याचा तांत्रिक विकास होत त्याला एक पूर्ण स्वरूप आले, त्याचबरोबर त्याचा एक कथामाध्यम म्हणून विविध मार्गांनी कसा वापर केला जाईल, या संबंधातही विचार झाला. या काळात जसे प्रतिभावान दिग्दर्शक या माध्यमात उतरले, तसेच अनेक विचारवंतही. त्यांच्या कामामधून चित्रपटाने समाजाला सर्वांत जवळचे कलामाध्यम म्हणून नाव मिळवले. दुसऱ्या महायुद्धानंतर चित्रपटनिर्मितीचा व्याप खूपच वाढला आणि मोठ्या चित्रपट उद्योगांबरोबरच लहानलहान देशही त्यात सामील झाले. आज आपण चित्रपट ज्यावर मुद्रित होतो, त्या फिल्मलाच रजा देऊन डिजिटल युगात पोचलो आहोत. हा सारा इतिहास, त्याबरोबरच संबंधित व्यक्ती आणि विचारांचा आढावा, हा या विषयाचा महत्त्वाचा भाग आहे.

जागतिक चित्रपटाकडे पाहताना भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास कसा झाला, हेदेखील पाहणे आवश्यक ठरते. त्याबरोबरच चित्रपटाचे तंत्र आणि तंत्रज्ञान, महत्त्वाच्या संकल्पना, परिभाषा आणि चित्रपटाबरोबरचे समाजाचे नाते या सगळ्यांचा विचार येथे केला जाईल.

क्वेंटीन टॅरेंटीनो (Quentin Tarantino)

क्वेंटीन टॅरेंटीनो

क्वेंटीन टॅरेंटीनो : ( २७ मार्च १९६३ ). विख्यात अमेरिकन चित्रपटलेखक, दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता. त्याचा जन्म नॉक्सव्हिल-टेनेसी (अमेरिका) येथे ...
ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan)

ख्रिस्तोफर नोलन

नोलन, ख्रिस्तोफर : (३० जुलै १९७०). हॉलिवुड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन लेखक, निर्माता व दिग्दर्शक. ख्रिस्तोफर यांचे वडील ब्रिटिश व ...
गर्म हवा (Garm Hawa)

गर्म हवा

हिंदुस्थानची फाळणी या विषयावर आधारलेल्या काही मोजक्या चित्रपटांपैकी अत्यंत मार्मिक असा हिंदी चित्रपट. हा चित्रपट १९७३ मध्ये प्रदर्शित झाला. या ...
गिरीश रघुनाथ कार्नाड (Girish Raghunath Karnad)

गिरीश रघुनाथ कार्नाड

कार्नाड, गिरीश रघुनाथ : (१९ मे १९३८- १० जून २०१९). जागतिक रंगभूमीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रमुख भारतीय कन्नड  नाटककार. सर्वोच्च ...
चार्ली कॉफमन (Charlie Kaufman)

चार्ली कॉफमन

चार्ली कॉफमन : (१९ नोव्हेंबर १९५८). अमेरिकन चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, नाटककार व गीतकार. त्याचा जन्म न्यूयॉर्क (अमेरिका) येथे झाला ...
चित्रपट : प्रकार

चित्रपटांचे प्रकार : १८९५ मध्ये ल्युमेअरबंधूंनी फ्रान्समध्ये मूक-चलचित्रनिर्मिती सुरू केली, तेव्हा घडणारी घटना कॅमेऱ्याने मुद्रित करून हुबेहूबपणे दाखविणे एवढाच हेतू ...
चित्रपट आणि रंगभूमी (Chitrapat ani Rangbhumi)

चित्रपट आणि रंगभूमी

येथे चित्रपट आणि रंगभूमी यांतील परस्पर साहचर्य व तुलना यांविषयी चर्चा केलेली आहे. चित्रपटकलेचे द्रव्य म्हणून ज्या दृक्-श्राव्य प्रतिमा वापरल्या ...
चित्रपट आणि शिक्षण

शिक्षण आणि चित्रपट हे चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात भिन्न विषय होते. चित्रपट हे करमणुकीचे नवे साधन, तर शिक्षण ही समाजाने भावी ...
चित्रपटविषयक चळवळी

चित्रपट-इतिहास सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेण्यासाठी त्यात वेळोवेळी उदयास आलेल्या चळवळींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. चित्रपटाचे तंत्र आणि तंत्रज्ञान, माध्यमांसंदर्भात झालेले ...
चित्रपटसमीक्षा  (Film Criticism)

चित्रपटसमीक्षा

चित्रपटाचे आणि चित्रपटमाध्यमाचे मनोरंजन, कलात्मक सौंदर्यशास्त्र, सामाजिक व सांस्कृतिक पैलू, चित्रपटतंत्रे व आशयविषयक घटक यांच्या कसोट्यांवर केलेले विश्लेषण व मूल्यमापन, ...
चित्रपटांचे तत्त्वज्ञान (Philosophy of Film)

चित्रपटांचे तत्त्वज्ञान

चित्रपटाचे तत्त्वज्ञान हे समकालीन कला तत्त्वज्ञानाचे उपक्षेत्र आहे. तसेच सौंदर्यशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण संशोधनाचा विषय म्हणूनही त्यास ओळखले जाते. सध्याच्या काळात ...
चेतन आनंद (Chetan Anand)

चेतन आनंद

आनंद, चेतन : (३ जानेवारी १९२१ – ६ जुलै १९९७). हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेता. त्यांचा ...
चौर्यप्रती, चित्रपटाच्या (पायरसी) : (Piracy)

चौर्यप्रती, चित्रपटाच्या

एखाद्या नैसर्गिक वा कृत्रिम व्यक्तीच्या नावे कायदेशीरपणे नोंदल्या गेलेल्या कलाकृतीचा, उत्पादनाचा वा संकल्पनेचा अनधिकृतपणे केलेला वापर किंवा पुनर्निर्मिती म्हणजे पायरसी ...
जमशेटजी  फ्रामजी मादन (Jamshedji Framji Madan)

जमशेटजी  फ्रामजी मादन

मादन, जमशेटजी  फ्रामजी :  (? १८५६ – २८ जून १९२३). भारतीय चित्रपटव्यवसायाचे जनक. त्यांचा जन्म मुंबईत एका पारसी परिवारात झाला ...
जयश्री गडकर (Jayshree Gadkar)

जयश्री गडकर

गडकर, जयश्री : (२१ फेब्रुवारी १९४२ – २९ ऑगस्ट २००८). प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक ...
जाफर पनाही (Jafar Panahi)

जाफर पनाही

पनाही, जाफर : ( ११ जुलै १९६० ). प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार व संकलक. त्यांचा जन्म मिआने, अझरबैजान, इराण ...
जावेद अख्तर (Javed Akhtar)

जावेद अख्तर

अख्तर, जावेद : (१७ जानेवारी १९४५). भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कथा-पटकथाकार, गीतकार आणि कवी. हिंदी चित्रपटसृष्टीत सत्तरऐंशीच्या दशकात जावेद अख्तर ...
जॅक निकोल्सन (Jack Nicholson)

जॅक निकोल्सन

निकोल्सन, जॅक : (२२ एप्रिल १९३७). हॉलीवूडमधील अमेरिकन अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता. त्यांचे पूर्ण नाव जॅक जॉन जोसेफ निकोल्सन. त्यांचा ...
जॅकी चॅन (Jackie Chan)

जॅकी चॅन

चॅन, जॅकी : (७ एप्रिल १९५४). साहसीदृश्यांकरिता प्रसिद्ध असलेले चित्रपट अभिनेता आणि निर्माता. त्यांचे मूळ नाव चॅन काँग-सँग. त्यांचा जन्म ...
जोहरा सहगल (Zohra Sehgal)

जोहरा सहगल

सहगल, जोहरा : (२७ एप्रिल १९१२—१० जुलै २०१४). नृत्यक्षेत्रात आणि चित्रपटक्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका. नृत्य ...