(प्रस्तावना) पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | समन्वयक : माधव राजवाडे | विद्याव्यासंगी : नितीन भरत वाघ
भौतिकीमध्ये प्रामुख्याने पदार्थांच्या स्थिती-गतीचा आणि त्यातील बदलांचा विचार केला जातो. तसेच पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा शोध घेतला जातो. सदर कार्यकारणभावाच्या विवेचनातून या शास्त्राचा पाया घातला गेला. हा ज्ञानविकास होताना साधारणतः निरीक्षण ते सिद्धांत हे अनुक्रमे प्रारंभिक व अंतिम टप्पे मानले जातात. या दरम्यान निरीक्षणाबाबत उपपत्ती,प्रयोग, अनुमान असे टप्पे घेत हा प्रवास पूर्ण होतो. अर्थात प्रत्येक वेळेस अशाच मार्गाने भौतिकीमध्ये ज्ञानाची निर्मिती झाली असे मानण्याचे कारण नाही.

भौतिकीच्या प्रगतीत इतर विज्ञानाप्रमाणे, आधुनिक विज्ञान आणि प्राचीन विज्ञान असे दोन भाग पडतात. जगातल्या महत्वाच्या संस्कृतींनी भौतिकीबाबत विकसित विचार केल्याची उदाहरणे आढळतात. भारतीय संदर्भात खगोलशास्त्राचा विकास हा महत्वाचा टप्पा आहे. मात्र प्रयोग करून उपपात्तींची सत्यता तपासणे हा आधुनिक विज्ञानातला महत्वाचा घटक प्राचीन विज्ञानात अभावानेच आढळतो.
भौतिकी या विषयाचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. सैद्धांतिक –प्रायोगिक किंवा मुलभूत- उपयोजित असे याकडे बघता येईल.तसेच ज्या ज्या परिणामांचे स्पष्टीकरण शोधण्यात आले त्या प्रमाणे वर्गीकरण करता येईल. उदाहरणार्थ – विद्युतप्रवाहाचे परिणाम ‘ विद्युत चुंबकत्व’ या शाखेमध्ये अभ्यासले जातात तसेच पदार्थांच्या उष्माविषयक गुणधर्मांची चिकित्सा ‘उष्मा व उष्मागातीकी’ या शाखेत होऊ शकते. तसेच ज्या प्रकारे संकल्पनांचा विकास होत गेला त्या त्या संकल्पनांच्या विकासाचा मागोवा घेता येऊ शकतो. भौतिकीच्या ज्ञानमंडळातर्फे मूलभूत भौतिकी, उपयोजित भौतिकी, खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व विश्वरचनाशास्त्र या विषयांच्या नोंदी तयार करणे अपेक्षित आहे.

या अनुषंगाने सदर विषयाची खालील दहा उपविभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे.
१. स्थितीगतीशास्त्र व वस्तूचे गुणधर्म
२. तरंग व दोलन
३. उष्मा व उष्मागतीकी
४. ध्वनी
५. विद्युत चुंबकत्व
६.न्युक्लीय व कण भौतिकी
७. आण्विक व रेणूभौतिकी
८.घन अवस्था भौतिकी
९. प्रकाशकी
१०. आंतरशाखीय भौतिकी
११.खगोलशास्त्र व खगोलभौतिकी
१२..विश्वरचनाशास्त्र व सापेक्षता
१३.पुंज भौतिकी
अर्थातच या उपविभागांचे अजून उप-उपविभाग आहेत. ह्या रचनेचे बलस्थान हे की त्यामुळे तुकड्या- तुकड्यातील ज्ञानाचा एकसंधपणा अधोरेखित होतो. अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या अथक संघर्षामुळेच भौतिकीच्या ज्ञानशाखांचा हा व्यासंग आपल्याला शक्य होतो आहे. त्यांचे ऋण मनी ठेवत भौतिकी विषयाबाबत उत्सुकता बाळगणाऱ्या सर्व जिज्ञासू वाचकांचे ज्ञानमंडळातर्फे मनःपूर्वक स्वागत!.

कासाग्रेन - रिट्चे क्रेशियन परावर्ती दूरदर्शी (Cassegrain Ritchey Chretien Telescope)

कासाग्रेन – रिट्चे क्रेशियन परावर्ती दूरदर्शी

कासाग्रेन – रिट्चे क्रेशियन परावर्ती दूरदर्शी : कासाग्रेन दूरदर्शीमध्ये मुख्य आरसा (प्राथमिक आरसा) अन्वस्तीय (parabolic) असून, अपास्तिक (hyperbolic) दुय्यम आरसा ...
किरणोत्सर्ग : ऱ्हासाचे नियम (Radioactivity : Decay Law)

किरणोत्सर्ग : ऱ्हासाचे नियम

किरणोत्सर्गी ऱ्हासात अणुकेंद्रकाचा निरनिराळ्या पद्धतींनी ऱ्हास होतो. उदा., अल्फा ऱ्हासात ( decay; alpha decay) अणुकेंद्रकातून हीलियम () अणूचे अणुकेंद्रक उत्सर्जित ...
किरणोत्सर्ग : ऱ्हासाच्या शृंखला (Radioactive series)

किरणोत्सर्ग : ऱ्हासाच्या शृंखला

निसर्गात आढळणाऱ्या किरणोत्सर्गी पदार्थांचा ऱ्हास झाल्यावर निर्माण झालेली जन्य अणुकेंद्रके (Daughter nuclei)  बहुतांशी किरणोत्सर्गी असतात. किंबहुना अशा अणुकेंद्रकांची शृंखलाच असते ...
किरणोत्सर्ग (Radioactivity)

किरणोत्सर्ग

अस्थायी अणुकेंद्रकांमधून वेगवेगळे कण उत्सर्जित होण्याच्या प्रक्रियेला किरणोत्सर्ग म्हणतात. किरणोत्सर्गाची दोन प्रकारांमध्ये विभागणी करता येईल. पहिल्या प्रकारात नैसर्गिक किरणोत्सर्ग, तर ...
किरणोत्सर्गाचा इतिहास (Historical background of Radioactivity)

किरणोत्सर्गाचा इतिहास

किरणोत्सर्गाचा शोध आंत्वान आंरी बेक्रेल (Henri Becquerel) या फ्रेन्च शास्त्रज्ञ यांनी १८९६ साली लावला. युरेनियमचे क्षार छायाचित्र पट्टीवर (photographic plate) ...
किरणोत्सर्गी अवपात (Radioactive fallout)

किरणोत्सर्गी अवपात

अणुबाँबच्या स्फोटानंतर होणाऱ्या किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) धुळीच्या वर्षावाला व फैलावाला किरणात्सर्गी अवपात म्हणतात. अणुबाँबचा स्फोट होताच किरणोत्सर्गी ...
कुजबुजणारे सज्जे (Whispering Gallery)

कुजबुजणारे सज्जे

ध्वनीचा एक आविष्कार. ठराविक दोन बिंदूंजवळ उभे राहून एका बिंदूजवळ कुजबुजले असता दुसऱ्या बिंदूजवळ स्पष्ट ऐकू येईल असा ध्वनिकीय गुणधर्म ...
कृत्तिका नक्षत्र (Pleiades)

कृत्तिका नक्षत्र

कृत्तिका नक्षत्र : नक्षत्र चक्रातील कृत्तिका हे तिसरे नक्षत्र. वृषभ राशीतील कृत्तिका हा साध्या डोळ्यांनी दिसणारा आकाशातील सुंदर असा तारकापुंज ...
केल्व्हिन तापमानश्रेणी (Kelvin scale)

केल्व्हिन तापमानश्रेणी

केल्व्हिन अथवा निरपेक्ष (absolute) तापमानश्रेणी प्रामुख्याने शास्त्रीय विषयात पदार्थांचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारी तापमानश्रेणी आहे. ह्या तापमानश्रेणीचा प्रस्ताव लॉर्ड केल्व्हिन  ...
कैशिकता (Capillarity)

कैशिकता

केशनलिकेमध्ये पृष्ठताणामुळे दिसून येणारा आविष्कार. काचेची नळी, जिच्या आतील पोकळ भागाची त्रिज्या अतिशय लहान असते, तिला ‘केशनलिका’ असे म्हणतात. केशनलिकेचे ...
क्वार्क (Quark)

क्वार्क

कणभौतिकीच्या मानक प्रतिकृतीनुसार (standard model) क्वार्क आणि त्यांचे प्रतिकण (antiparticles) हे मूलभूत कण अथवा मूलकण (elementary particles) मानले जातात. या ...
क्वार्कांचे गुणधर्म (Quark's Properties)

क्वार्कांचे गुणधर्म

मानक प्रतिकृतीनुसार क्वार्क हे मूलभूत कण आहेत आणि त्यांच्या संयोगाने सर्व पदार्थ तयार होतात. या नोंदीत क्वार्कांच्या गुणधर्मांचे सविस्तर वर्णन ...
खगोलशास्त्रीय अंतरमापनाची एकके (Astronomical Units)

खगोलशास्त्रीय अंतरमापनाची एकके

ग्रह आणि ताऱ्यांची अंतरे मोजण्यासाठी खगोलशास्त्रात मीटर अथवा इतर साधित एकके न वापरता खगोलशास्त्रीय एकक (ख.ए. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट; Astronomical unit, ...
गुरुत्वमध्य (Center Of Gravity)

गुरुत्वमध्य

वस्तुमान असलेल्या प्रत्येक कणावर गुरुत्व-बल (Gravity force) कार्य करीत असते. त्या बलाला कणाचे वजन (Weight) असे म्हणतात. त्या बलाची दिशा ...
गुरुत्वाकर्षण (Gravity)

गुरुत्वाकर्षण

पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात. या आकर्षणाला गुरुत्वाकर्षण (Gravity) म्हणतात. सर आयझॅक न्यूटन (Sir Isaac Newton) यांनी या आकर्षक बलाचा अभ्यास ...
गोलत्वमापक (Spherometer)

गोलत्वमापक

(उपकरण). अंतर्गोल अथवा बहिर्गोल भिंगे (Concave and Convex lenses) किंवा आरसे हे एका मोठ्या गोलाचा भाग असतात. या किंवा अशाच ...
ग्रहणे: मेटोनचे चक्र (Metons’s Cycle)

ग्रहणे: मेटोनचे चक्र

ग्रहणे: मेटोनचे चक्र : चांद्रमास (Lunar Month) आणि ऋतुवर्ष (Tropical Year) यांचा मेळ घालण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून अगदी बॅबिलोनियन काळापासून ...
घनता व विशिष्ट गुरुत्व (Density and Specific gravity)

घनता व विशिष्ट गुरुत्व

एखाद्या पदार्थाच्या एकक आकारमानात असणाऱ्या वस्तुमानास (mass) त्याची घनता म्हणतात. सर्व अवस्थांतील द्रव्याच्या बाबतीत सहज मोजता येण्यासारखी ही एक राशी ...
घनतामापक (Pyknometer)

घनतामापक

घनता मोजन्याचे उपकरण. घनता सामान्यपणे ग्रॅम प्रती घ. सेंमी. (किंवा मिलिलिटर), पौंड प्रती घ. फूट किंवा पौंड प्रती गॅलन या ...
चंद्रग्रहण (Lunar eclipse)

चंद्रग्रहण

चंद्रग्रहण : चंद्रग्रहणाचे प्रकार ग्रहणे हा सावल्यांचा परिणाम आहे. चंद्र पृथ्वीच्या सावलीत सापडला की चंद्रग्रहण होते. सूर्याकडून येणारा प्रकाश ...