शमी (Khejri tree)

(खेजरी ट्री). साधारणपणे बाभळी किंवा खैरासारखा दिसणारा एक सदाहरित वृक्ष. शमी हा वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचा समावेश प्रोसोपिस प्रजातीत केला जातो. प्रोसोपिस प्रजातीत सु. ४५ जाती असून भारतात त्यांपैकी…

शतावरी (Asparagus)

(ॲस्परॅगस). एक बहुगुणी औषधी वनस्पती. शतावरी ही वनस्पती ॲस्परॅगसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲस्परॅगस रॅसिमोसस आहे. पूर्वी तिचा समावेश लिलिएसी कुलात केला जात असे. यूरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका…

शंखपुष्पी (Canscora)

(कॅन्स्कोरा). शंखपुष्पी ही वनस्पती जन्शनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅन्स्कोरा डिकरेन्स किंवा कॅन्स्कोरा डेक्युसाटा  किंवा कॅन्स्कोरा अलाटा आहे. ती मूळची भारत आणि म्यानमार येथील असावी, असा अंदाज आहे. भारतात…

शंख आणि शिंपला (Conch and scallop)

(काँच अँड स्कॅलप). मृदुकाय संघातील प्राण्यांच्या कवचांना शंख किंवा शिंपला म्हणतात. मृदुकाय संघात उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील बहुतेक प्राण्यांना कठीण कवच असते, या कवचाला शंख म्हणतात. तर याच संघातील द्विपुटी (बायव्हाल्व्हिया)…

व्हॅनिला (Vanilla)

सुगंधी आणि स्वादकारक पदार्थ देणारी एक आरोही (आधारावर चढणारी) आमरी (ऑर्किड) वनस्पती. व्हॅनिला या वनस्पतीचा समावेश ऑर्किडेसी कुलातील व्हॅनिला प्रजातीत केला जातो. या प्रजातीत सु. ११० जाती असून त्यांपैकी व्हॅनिला…

वॉलरस (Walrus)

एक जलचर सस्तन प्राणी. वॉलरसचा समावेश स्तनी वर्गाच्या अपरास्तनी या उपवर्गाच्या मांसाहारी गणात होतो. या गणातील ओडोबेनिडी कुलात वॉलरसचा समावेश केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव ओडोबेनस रोझमेरस आहे. ‘व्हॉलरॉस’…

वेलदोडा (Cardamom)

(कार्‌डॅमम). मसाल्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेली वनस्पती. वेलदोडा ही वनस्पती झिंजिबरेसी कुलातील आहे. आले, हळद या वनस्पतीही झिंजिबरेसी कुलातील आहेत. झिंजिबरेसी कुलातील इलेटॅरिया आणि ॲमोमम प्रजातीतील वनस्पतींना आणि त्यांपासून मिळणाऱ्या फळांना…

वेडी बाभूळ (Jerusalem thorn)

(जेरूसलेम थॉर्न). तण म्हणून परिचित असलेली एक वनस्पती. वेडी बाभूळ ही बहुवर्षायू सपुष्प वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्रीय नाव पार्किंसोनिया ॲक्युलियाटा आहे. इंग्रज वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन पार्किंसन (१५६७–१६५०) यांच्या गौरवार्थ…

वेखंड (Sweet flag)

(स्वीट फ्लॅग). एक बहुवर्षायू औषधी, सपुष्प वनस्पती. वेखंड ही एकदलिकीत वनस्पती ॲकॉरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲकॉरस कॅलॅमस आहे. या वनस्पतीचे मूलक्षोड औषधासाठी वापरले जाते आणि त्यालाही वेखंड म्हटले…

विकरे (Enzymes)

(एंझाइम्स). सजीवांमधील रासायनिक अभिक्रियांचा (प्रक्रियांचा) वेग वाढवणाऱ्या संयुगांना विकरे किंवा वितंचके म्हणतात. सर्व सजीवांच्या पेशी विकरे तयार करतात. विकरांचे रेणू दुसऱ्या रेणूंमध्ये बदल घडवून आणतात. अशा रूपांतरित रेणूंबरोबर विकरे संयोग…

वावडिंग (False black pepper)

(फॉल्स ब्लॅक पेपर). वावडिंग ही आरोही (वर चढणारी) वनस्पती मिर्सिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव एंबेलिया राइब्ज आहे. वावडिंगाचा भारत, श्रीलंका, मलेशिया आणि चीन या देशांत प्रसार झालेला दिसून येतो.…

वाळुंज (Indian willow)

(इंडियन विलो). एक पानझडी वृक्ष. वाळुंज ही वनस्पती सॅलिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सॅलिक्स टेट्रास्पर्मा आहे. हा वृक्ष बहुधा ओलसर जागी व नदीकाठच्या वाळूत वाढलेला दिसून येतो. म्हणून त्याला…

वाळा (Vetiver)

(व्हेटिव्हर). गवत कुलातील (पोएसी किंवा ग्रॅमिनी) एक उपयुक्त वनस्पती. वाळा उर्फ खस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्रायसोपोगॉन झिझेनॉइड्स आहे. गहू, भात, नाचणी, बाजरी इत्यादी वनस्पतीही पोएसी कुलातील आहेत. वाळा मूळची…

वार्धक्य (Ageing)

(एजिंग). सजीवांमध्ये वाढत्या वयानुसार शरीरक्रियात्मक बदलांमुळे जीर्णता उद्भवते म्हणजे सजीवांमधील जैविक प्रक्रियांचा वेग कमी होऊ लागतो आणि चयापचय क्रियांवर येणारे ताण झेपण्याची क्षमता कमी होते. या प्रक्रियेला वार्धक्य म्हणतात. ही…

ब्रूस ली (Bruce Lee)

ब्रूस ली : ( २७ नोव्हेंबर १९४० – २० जुलै १९७३). प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, जीत कून दो या युद्धकला (मार्शल आर्ट) प्रकाराचे जन्मदाते आणि विसाव्या शतकातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. पॉप…