सागरी कुरव (Seagull)

(सी-गल). एक समुद्र पक्षी. सागरी कुरव या पक्ष्यांचा समावेश पक्षिवर्गाच्या कॅरॅड्रिफॉर्मिस गणाच्या लॅरिडी कुलात केला जातो. त्यांच्या १० प्रजाती आणि सु. ५७ जाती आहेत. त्यांनाही ‘कुरव’ म्हणतात. त्यांच्या अनेक जाती…

सागरघोडा (Seahorse)

(सी-हॉर्स). अस्थिमत्स्य वर्गातील एक मासा. सागरघोडा हा मासा जगाच्या उष्ण प्रदेशांतील उथळ समुद्रात तसेच काही समशीतोष्ण प्रदेशांच्या समुद्रात आढळतो. त्याच्या सु. ५४ जाती आहेत. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यालगत आढळणाऱ्या…

साग (Teak tree)

(टीक ट्री). प्राचीन काळापासून इमारतींसाठी व बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा वृक्ष. साग हा पानझडी वृक्ष लॅमिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टेक्टोना ग्रँडिस आहे. पुदिना, तुळस, मरवा…

ससाणा (Falcon)

(फॅल्कन). एक शिकारी पक्षी. ससाण्याचा समावेश फॅल्कॉनिडी कुलात केला जातो. या कुलाच्या फॅल्को प्रजातीत ससाण्याच्या सु. ४० जाती आहेत. अंटार्क्टिका वगळता हा पक्षी जगात सर्वत्र आढळतो. भारतात या पक्ष्याच्या सु.…

ससा (Hare and Rabbit)

(हेअर आणि रॅबिट). एक सस्तन प्राणी. सशाचा समावेश स्तनी वर्गाच्या लॅगोमॉर्फा गणातील लेपोरिडी कुलात केला जातो. लॅगोमॉर्फा गणामध्ये लेपोरिडी आणि ओकोटोनिडी ही दोन कुले अस्तित्वात आहेत. लेपोरिडी कुलात अकरा प्रजातींचा…

सलगम (Turnip)

(टर्निप). एक द्विवर्षायू वनस्पती. सलगम ही वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका रॅपा प्रकार रॅपा आहे. ही वनस्पती नवलकोल या वनस्पतीसारखी दिसते. कोबी, फुलकोबी, मोहरी इत्यादी वनस्पतीही ब्रॅसिकेसी…

सर्पगंधा (Indian snakeroot/Rauvolfia serpentina)

(इंडियन स्नेकरूट; राऊवोल्फिया सर्पेंटिना). बहुवर्षायू औषधी वनस्पती. सर्पगंधा ही ॲपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव राऊवोल्फिया सर्पेंटिना आहे. सदाफुली ही वनस्पती याच कुलातील आहे. राऊवोल्फिया हे प्रजाती-दर्शक नाव लेओनार्ट राऊवोल्फ…

सर्दी (Common cold)

(कॉमन कोल्ड). सर्दी किंवा पडसे हा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. सर्दीमुळे मुख्यत: श्वसनसंस्थेच्या सुरुवातीच्या भागात संसर्ग होतो. कधीकधी हा संसर्ग नाक, नासागुहा आणि स्वरयंत्र या भागापर्यंत पसरतो. सर्दीमुळे नाकातील…

सरीसृप वर्ग (Class reptilia)

(रेपटाइल). सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग. उत्तर तसेच दक्षिण असे दोन्ही ध्रुव वगळता, सरीसृप जगभर आढळतात. त्यांच्या सु. ६,५०० जाती असून भारतात त्यांच्या सु. ४२५ जाती आढळतात. ते मुख्यत: जमिनीवर राहतात. मात्र…

सरडा (Garden lizard)

(गार्डन लिझार्ड). एक सरपटणारा प्राणी. सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ॲगॅमिडी कुलात सरड्याचा समावेश केला जातो. इराण, अफगाणिस्तान, चीन, भारत, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया इ. देशांत सरडा आढळतो. भारतात आढळणाऱ्या सरड्याचे…

समुद्रशोक (Elephant creeper)

(एलिफंट क्रीपर). एक आकर्षक आणि औषधी वनस्पती. समुद्रशोक वनस्पतीचा समावेश कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी कुलात होत असून तिचे शास्त्रीय नाव अर्जीरिया नर्व्होसा आहे. अर्जीरिया स्पेसिओजा अशा नावानेही ती ओळखली जाते. मराठी भाषेत या…

सरडगुहिरा (Chameleon)

(कॅमॅलिऑन). एक सरपटणारा आणि झाडावर राहणारा प्राणी. सरडगुहिऱ्याचा समावेश सरीसृप वर्गाच्या डायॉप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या लॅसर्टीलिया उपगणात होतो. या उपगणात अनेक कुले असून त्यांपैकी शॅमिलिओनिडी कुलातील प्राणी सरडगुहिरा या नावाने…

समुद्रपुष्प (Sea anemone)

(सी अनिमोन). सागरी परभक्षी प्राण्यांचा एक गट. ॲक्टिनियारिया गणातील आंतरगुही संघातील प्राण्यांना सामान्यपणे समुद्रपुष्प म्हणतात. या प्राण्यांचे रंग अनिमोन प्रजातीतील फुलांसारखे आकर्षक असल्याने त्यांना ‘सी अनिमोन’ असे इंग्लिश नाव पडले…

समस्थिती (Homeostasis)

(होमिओस्टॅसिस). सजीव स्वनियंत्रणाने त्यांच्या शरीराची अंतर्गत स्थिती संतुलित राखतात. या संतुलित स्थितीला समस्थिती म्हणतात. जसे उष्ण रक्ताच्या सजीवांच्या शरीराचे तापमान बाहेरील तापमान बदलले, तरी एका मर्यादेत राहते; हा समस्थितीचा भाग…

सफरचंद (Apple)

(ॲपल). एक फळ वनस्पती. सफरचंद ही वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॅलस प्युमिला आहे. गुलाब, रासबेरी, स्ट्रॉबेरी इ. वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. सफरचंद या वनस्पतीचे मूळस्थान पूर्व यूरोप…