संप्रेरके (Hormones)

(हॉर्मोन्स). प्राणी किंवा वनस्पती यांच्यातील संदेशवाहक रासायनिक संयुगाला ‘संप्रेरक’ म्हणतात. पेशींच्या, ऊतींच्या वा इंद्रियांच्या क्रियांचे नियंत्रण, नियमन तसेच त्यांच्यात समस्थिती राखण्याचे कार्य संप्रेरकांद्वारे होते. संप्रेरके सजीवांच्या विशिष्ट भागात निर्माण होतात,…

सप्ताळू (Peach/Nectarine)

(पीच/नेक्टरीन). चवदार फळांसाठी प्रसिद्ध असलेला रोझेसी कुलातील एक लहान वृक्ष. सप्ताळू हा पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव प्रूनस पर्सिका आहे. जरदाळू, बदाम, चेरी या वनस्पतीही रोझेसी कुलातील असून त्या…

सप्तपर्णी (Indian devil’s tree)

(इंडियन डेव्हिल्स ट्री). एक सदाहरित वृक्ष. सप्तपर्णी हा वृक्ष ॲपोसायनेसी कुलातील असून भारतात सामान्यपणे ॲल्स्टोनिया स्कोलॅरिस या शास्त्रीय नावाची जाती आढळून येते. ॲल्स्टोनिया प्रजातीत एकूण ५० जाती असून भारतात त्यांपैकी…

संत्रे (Sweet orange)

(स्वीट ऑरेंज). सिट्रस प्रजातीतील फळांपैकी काही फळांचा ‘संत्रा’ किंवा ‘नारिंग’ असा गट करतात. या गटात गोड नारिंग (स्वीट लाइम; सिट्रस लिमेटा), आंबट नारिंग (ॲसिड लाइम; सिट्रस ऑरँटिफोलिया) आणि मँडरिन नारिंग…

सजीवसृष्टी (Living world)

(लिव्हिंग वर्ल्ड). आपल्या भोवतालची सृष्टी निर्जीव आणि सजीव यांची बनलेली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा समावेश सजीवसृष्टीत केला जातो. सजीवसृष्टीला ‘जीवसृष्टी’ असेही म्हणतात. सजीव आणि निर्जीव यांच्यात काही मूलभूत फरक आहेत.…

शिंदी (Wild date palm)

(वाइल्ड डेट पाम). खजुराच्या झाडासारखा दिसणारा एक वृक्ष. शिंदी हा वृक्ष ॲरेकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव फीनिक्स सिल्व्हेस्ट्रिस आहे. ताड, माड, सुपारी हे वृक्षदेखील याच कुलातील आहेत. शिंदी हा…

शिंगे (Horns)

(हॉर्न्स). निरनिराळ्या प्राण्यांच्या डोक्यावरील टोकदार प्रवर्धाला (वाढलेल्या भागाला) शिंग म्हणतात. शिंगावर केराटीन आणि इतर प्रथिनांचे आवरण असून त्याच्या आत हाडांचा गाभा असतो. सस्तन वर्गातील रवंथ करणाऱ्या (रोमंथी) प्राण्यांच्या समखुरी गणातील…

विषमज्वर (Typhoid)

(टायफॉइड). साल्मोनेला टायफाय (साल्मोनेला एंटेरिका उपजाती टायफाय) नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगाला ‘विषमज्वर’ म्हणतात. याला आंत्रज्वर, संततज्वर असेही म्हणतात. विषमज्वराची लक्षणे संसर्गापासून ६ ते ३० दिवसांनंतर दिसू लागतात आणि…

शिंगाळा (Singhala)

(सिंघाला). एक लोकप्रिय खाद्यमासा. शिंगाळ्याचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या ब्रॅगिडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव मिस्टस सिंघाला आहे. हा मासा अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, भारत या देशांतील गोड्या…

शिकरा (Shikra)

(शिक्रा). एक लहान आकारमानाचा शिकारी पक्षी. शिकरा पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या ॲक्सिपिट्रिफॉर्मिस गणाच्या ॲक्सिपिट्रिडी कुलात केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिपिटर बॅडियस आहे. या पक्ष्याच्या सहा उपजाती असून आशिया आणि…

शाश्वत विकास (Sustainable development)

(सस्टेनेबल डेव्हलपमेंट). भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला बाधा पोहोचू न देता वर्तमानकाळातील गरजा पूर्ण करण्याच्या विकासाला शाश्वत विकास म्हणतात. शाश्वत विकासात पृथ्वीवरील संसाधनांचा वापर विकासासाठी करताना पुढील पिढ्यांनीही संसाधनांचा…

शाल्मली (Red silk cotton tree)

(रेड सिल्क कॉटन ट्री). एक पानझडी वृक्ष. शाल्मली ही वनस्पती माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बाँबॅक्स सैबा आहे. हा वृक्ष मूळचा आशिया व ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग येथील असून भारत,…

Read more about the article शारीरिक चिकित्सा (Physical Therapy/ Physiotherapy)
शारीरिक चिकित्सा (आधुनिक तंत्रज्ञान) : (१) विद्युत उद्दीपन, (२) उसळ चेंडू , (३) ऊतितापन चिकित्सा, (४) श्राव्यातीत चिकित्सा.

शारीरिक चिकित्सा (Physical Therapy/ Physiotherapy)

(फिजिकल थेरपी; फिजिओथेरपी). आजार, इजा किंवा विकलांगता यांच्यावर मर्दन व व्यायाम या शारीरिक पद्धतींचा वापर करण्याच्या उपचार पद्धतीला शारीरिक चिकित्सा म्हणतात. या उपचार पद्धतीत औषधांचा वापर किंवा शस्त्रक्रिया केली जात…

शहामृग (Ostrich)

(ऑस्ट्रिच). पक्ष्यांमध्ये आकारमानाने सर्वांत मोठा परंतु उडू न शकणारा पक्षी. शहामृगाचा समावेश स्ट्रुथिऑर्निफॉर्मिस गणाच्या स्ट्रुथिओनिडी कुलात केला जातो. सामान्य शहामृगाचे शास्त्रीय नाव स्ट्रुथिओ कॅमेलस आहे. तो आफ्रिकेच्या निरनिराळ्या भागात तसेच…

शहाजिरे (Black Caraway)

(ब्लॅक कॅरॅवे). भारतीय मसाल्यांतील एक महत्त्वाचा घटक. शहाजिरे ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरम नायग्रम आहे. कोथिंबीर, गाजर या वनस्पतीही एपिएसी कुलातीलच आहेत. शहाजिरे मूळची यूरोप, बलुचिस्तान,…