सागरमग्न खंडभूमी (Continental Shelf)
सागरकिनाऱ्याला लागून असणारा उथळ सागरतळ म्हणजे सागरमग्न खंडभूमी होय. खंड-फळी व भूखंड मंच या पर्यायी संज्ञाही सदर भूविशेषासाठी वापरल्या जातात. बहुतेक खंडांच्या किनाऱ्याशी सागरमग्न खंडभूमी आढळतात. जगातील महासागरांनी व्यापलेल्या एकूण…
