अस्तेय
पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी अस्तेय हा तिसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा । योगसूत्र २.३०). अस्तेय म्हणजे ‘चोरी न करणे’. पातंजल योगसूत्रावरील व्यासभाष्यात आणि व्यासभाष्यावरील तत्त्ववैशारदी या वाचस्पति मिश्रांनी…