व्यापारवाद (Mercantilism)

व्यापारवादाच्या काळात अर्थशास्त्रीय विचारांना दिशा मिळाली असली, तरी त्यास सैद्धांतिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे व्यापारवादी विचार हे अर्थशास्त्रपूर्व विचार म्हणून ओळखले जातात. व्यापारवादाचा नेमका कालखंड निर्देशित करता येत नसला,…

धोंडूताई कुलकर्णी (Dhondutai Kulkarni)

कुलकर्णी, धोंडूताई : ( २३ जुलै १९२७ – १ जून २०१४ ). भारतीय अभिजात संगीत शैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या व्रतस्थ व ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूरचा. त्यांचे वडील गणपतराव कुलकर्णी…

वैश्विक किरणजन्य न्युक्लाइड कालमापन (Cosmogenic Nuclide-CN Dating)

पुरातत्त्वात किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित वापरली जाणारी कालमापन पद्धत. विश्वात अतिउच्च ऊर्जा (०.१ ते १० गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट) असणारे वैश्विक किरण (Cosmic Rays) आहेत. हे किरण म्हणजे मुख्यतः भार असलेले प्रोटॉन…

Read more about the article युरेनियम शृंखला कालमापन पद्धती (Uranium Series Dating)
आकृती : युरेनियम-२३८ ऱ्हासशृंखला.

युरेनियम शृंखला कालमापन पद्धती (Uranium Series Dating)

किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची महत्त्वाची पध्दती. चतुर्थक कालखंडाच्या संशोधनासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. युरेनियम हे अणुऊर्जेसाठी वापरले येणारे महत्त्वाचे नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ९२ आहे. युरेनियम-२३४ (234U),…

पुराचुंबकीय कालमापन पद्धती (Palaeomagnetic Dating)  

चुंबकीय क्षेत्र ही एक महत्त्वाची मूलभूत भौतिक घटना आहे. पृथ्वीचा गोल देखील एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्य करतो आणि त्यामुळेच चुंबकाप्रमाणेच पृथ्वीला चुंबकीय उत्तर ध्रुव व चुंबकीय दक्षिण ध्रुव आहेत. हे चुंबकीय…

Read more about the article हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन (Varve Dating)
हिमवाहित मृत्तिकास्तराचे कालमापन करताना एक अभ्यासक.

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन (Varve Dating)

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन ही निरपेक्ष कालमापनाची एक पद्धत असून ती प्रामुख्याने चतुर्थक कालखंडातील हिमयुगाशी निगडित घटनांच्या कालमापनासाठी उपयुक्त ठरली आहे. या पद्धतीत निक्षेपांच्या विशिष्ट अशा अगदी पातळ थरांचा उपयोग करून…

अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धती (Argon-Argon Dating Methods)

किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची पद्धत. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा वापर करून कालमापन करण्याची ही एक पद्धत असून पोटॅशियम-अरगॉन कालमापन ही या पद्धतीशी साम्य असलेली दुसरी पद्धत आहे. अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धतीचा…

भीमराव बळवंत कुलकर्णी (Bhimrao Balwant Kulkarni)

कुलकर्णी, भीमराव बळवंत : (४ नोव्हेंबर १९३२ - २७ सप्टेंबर १९८७). मराठीतील संस्थात्मक कार्याचा ध्यास असलेले साहित्यिक, वक्ते, समीक्षक आणि ललितलेखक. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी हे त्यांचे गाव. ते…

लेव्हायथन (Leviathan)

प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्वज्ञ थॉमस हॉब्स यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी लेव्हायथन  हा एक ग्रंथ. १६४२ ते १६५१ दरम्यान यादवी युद्ध अनुभवलेल्या हॉब्स यांनी चार भागांत लिहिलेला हा ग्रंथ १६५१ साली प्रसिद्ध झाला.…

जागतिक तापमानवाढ (Global Warming)

पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया म्हणजे जागतिक तापमानवाढ होय. याचबरोबर हवामानातील आताचे बदल व त्यामुळे होणारे भविष्यात होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो. हरितवायूंचे उत्सर्जन : पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा…

बाजार यंत्रणेचे अपयश (Market Failure)

बाजार यंत्रणा ही मुख्यत्वे मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वांवर चालते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांच्या ‘अदृश्य शक्ती’च्या सिद्धांतानुसार बाजारातील किमती ही मागणी-पुरवठ्यावर अवलंबून असते आणि त्यानुसारच बाजारात संतुलन प्राप्त होते. बहुतांश सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी…

गर्भनिरोधन : नैसर्गिक पद्धती (Natural birth control)

कोणतेही साधन अथवा औषधी न वापरता गर्भधारणा टाळण्याच्या उपायांना नैसर्गिक पद्धती म्हटले जाते. प्राचीन काळापासून या पद्धती वापरल्या जातात. आजही काही जोडपी धार्मिक वा अन्य कारणासाठी या पद्धतींचा अवलंब करतात.…

हिमदंश (Frostbite)

मानवामध्ये त्वचा किंवा शरीराच्या इतर भागाचे तापमान हिमवर्षाव, हिमवादळ, अतिशीत पाण्याचा संपर्क यांमुळे अत्यंत कमी झाले तर हिमदंशाची लक्षणे आढळतात. हिमदंशाचे प्राथमिक लक्षण म्हणजे हिमदंश झालेला भाग बधिर होतो. यानंतर…

जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day)

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील…

अनंत महादेव मेहंदळे (Anant Mahadev Mehndale)

मेहंदळे, अनंत महादेव : ( ७ फेब्रुवारी १९२८ - २४ एप्रिल १९९२ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार.  पुणे जिल्ह्यातील मळवली जवळ भाजे गावी  महादेव आणि पार्वतीबाई यांच्या पोटी अनंतबुवांचा जन्म…