वनस्पतींच्या संरक्षणामध्ये सॅलिसायलीक अम्लाचे महत्त्व (Importance of Salicylic Acid in Plant Defenses)
वनस्पतींच्या निरोगी वाढीवर हानीकारक परिणाम करणारे विविध प्रकारचे जैविक घटक (कीटक, अळ्या, जीवाणू व बुरशी) अन्नप्राप्ती करीत असताना आढळतात आणि त्यांच्या प्रतिकारासाठी वनस्पतीसुद्धा अनेक प्रकारची रासायनिक द्रव्ये तयार करीत असतात.…