धनुर्वात (Tetanus)

मनुष्याला तसेच इतर प्राण्यांना होणारा तीव्र संक्रामक रोग. क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी या जीवाणूंपासून शरीरात तयार होणाऱ्या जीवविषामुळे या रोगाची बाधा होते.ऐच्छिक स्नायूंना आकडी येऊन ते ताठरणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे.…

द्विनाम नामकरण-पद्धती ( Bionomial nomenclature system)

सर्व सजीवांची शास्त्रीय नावे दर्शविण्यासाठी दोन नावांच्या जोडीचा वापर करतात. या पद्धतीला द्विनाम नामकरण पद्धती म्हणतात. सजीवांची नावे सर्वसाधारणपणे लॅटिन भाषेतून घेतली आहेत. छापताना ती तिरक्या अक्षरात (इटालिक फाँटमध्ये) छापतात.…

द्विदलिकित वनस्पती (Dicotyledonous plant)

सपुष्प वनस्पतींच्या बियांमध्ये भ्रूणाला दोन बीजपत्रे असल्यास त्या द्विदलिकित वनस्पती होत. या गटात सु. १,९९,३५० जाती आहेत. या वनस्पतींची मुळे सोटमूळ प्रकारची असून पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो. फुलांचे भाग चाराच्या…

दोडका (Vegetable gourd)

दोडका ही वेल कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा ॲक्युटँगुला आहे. ही वनस्पती मूळची भारतातील असून आशिया खंडातील अनेक देशांत तिची लागवड करतात. भारतात दोडक्याची व्यापारी लागवड भाजीसाठी म्हणजे…

दवणा (Indian wormwood)

एक सुगंधी झुडूप. दवणा ही वर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आर्टेमिसिया पॅलेन्स आहे. ॲस्टर, डेझी, सूर्यफूल या वनस्पतीही ॲस्टरेसी कुलात समाविष्ट आहेत. ही वनस्पती मूळची भारतातील असून…

दलदल परिसंस्था (Swamp ecosystem)

चिखल आणि गाळ यांनी भरलेली पाणथळ जागा म्हणजे दलदल. दलदल ही एक आर्द्रभूमीच आहे. दलदल परिसंस्था ही आर्द्रभूमी परिसंस्थेचाच एक प्रकार आहे. जेथे जमिनीतील पाण्याची पातळी भूपृष्ठाच्या वर आलेली असते,…

दयाळ (Magpie robin)

पक्षिवर्गाच्या पॅसेरीफॉर्मिस गणामधील म्युस्किकॅपिडी कुलातील कॉप्सिकस किंवा ट्रायकीक्सॉस या प्रजातींचे पक्षी. दयाळ पक्ष्यांची कॉप्सिकस सॉलॅरिस ही जाती प्रामुख्याने बांगला देश, श्रीलंका, भारत, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर आणि फिलिपीन्स या देशांत आढळते.…

दमा (Asthma)

श्वसनमार्गाला झालेला दाहयुक्त व दीर्घकालीन रोग. श्वासनलिका आकुंचित होणे, त्यांच्या श्लेष्मल पटलाच्या अस्तराला सूज येणे किंवा त्यांच्या पोकळीत साचणाऱ्या स्रावामुळे श्वसनक्रियेत वारंवार अडथळा येणे इत्यादी कारणांमुळे दमा उद्भभवतो. तो तात्कालिक…

दत्रंग (Chamror)

दत्रंग हा पानझडी वृक्ष बोरॅजिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव एहरेशिया लेविस आहे. भोकर ही वनस्पतीही याच कुलातील आहे. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, म्यानमार, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलिया इ. देशांत हा वृक्ष…

थॅलॅसेमिया (Thalassemia)

थॅलॅसेमिया हा मानवी रक्ताशी संबंधित एक आनुवंशिक विकार आहे. हा विकार प्रामुख्याने भूमध्य समुद्राच्या किनारी राहात असलेल्या बालकांमध्ये आढळून येतो. तसेच जगभरातील अनेक देशांत आणि भारतातही थॅलॅसेमियाबाधित बालके आढळून येत…

त्रुटिजन्य विकार (Deficiency diseases)

आहारातील विशिष्ट अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांना सामान्यपणे त्रुटिजन्य विकार म्हणतात. या विकारांमध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांचा समावेश होतो. आहारात मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यास होणाऱ्या या…

तोंडले (Ivy gourd)

तोंडले ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॉक्सिनिया ग्रँडीस आहे. भोपळा व कलिंगड या वनस्पती याच कुलातील आहेत. ही वनस्पती मूळची भारतातील असून तिचा प्रसार आशिया आणि आफ्रिका…

तेलमाड (Oil palm)

नारळासारखा सरळ व उंच वाढणारा एक शोभिवंत वृक्ष. तेलमाड हा वृक्ष ॲरॅकॅसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव एलिइस गिनीन्सिस आहे. हा आफ्रिकन वृक्ष मूळचा पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या (अंगोला आणि…

तेरडा (Garden balsam)

तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इंपॅटिएन्स बाल्समिना आहे. ती मूळची दक्षिण आशियाच्या भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इंपॅटिएन्स प्रजातीच्या ८५०–१,००० जाती आहेत. भारतात या प्रजातीतील…

तूर (Pigeon pea)

एक कडधान्य. तूर ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कजानस कजान आहे. मागील ३५०० वर्षांपासून ती भारतात लागवडीखाली आहे, असा अंदाज आहे. ती मूळची दख्खनच्या पठाराच्या पूर्वेची बाजू…