अफांसो द अल्बुकर्क (Afanso de Albuquerque)
अल्बुकर्क, अफांसो द (?-१४५३—१५ डिसेंबर १५१५). भारतातील पोर्तुगीज अंमलाखालील प्रदेशाचा दुसरा गव्हर्नर. पूर्वेकडे साम्राज्य स्थापण्याच्या आकांक्षेने १५०९ मध्ये हा भारतात आला. गव्हर्नर म्हणून येण्यापूर्वी त्याने १५०३ साली एकदा भारतास भेट दिली होती.…
