जलीय वनस्पती (Aquatic plants)

पाण्याखाली, पाणथळ जागी, चिखलात व जलसंपृक्त मृदेत वाढणाऱ्या वनस्पतींना ‘जलीय वनस्पती’ म्हणतात. या वनस्पतींमध्ये पाण्यात वाढण्यासाठी अनुकूलन घडून आलेले असते. जलीय वनस्पतींमध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात. काही वनस्पती स्वैरपणे पाण्यावर…

जायफळ (Nutmeg)

मिरिस्टिकेसी कुलातील वनस्पतींना सामान्यपणे जायफळ म्हणतात. मिरिस्टिका प्रजातीत सु. ८० जाती असून त्यांपैकी मिरिस्टिका फ्रॅग्रन्स जाती महत्त्वाची आहे. जे सामान्यपणे जायफळ म्हणून वापरले जाते ते या वृक्षाचे बी आहे. हा वृक्ष…

जागतिक तापन (Global Warming)

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीला जागतिक तापन म्हणतात. २००५ साली केलेल्या अभ्यासात मागील १०० वर्षांच्या काळात जागतिक स्तरावर सरासरी तापमानात ०.६० से. ते १० से. (१० फॅ. ते…

जांभूळ (Java plum)

जांभूळ हा सदापर्णी वृक्ष मिर्टेसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी आहे. यूजेनिया जांबोलना या शास्त्रीय नावानेही हा ओळखला जातो. भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंडोनेशिया या…

जळू (Leech)

एक अपृष्ठवंशी बाह्यपरजीवी प्राणी. जळूचा समावेश ॲनेलिडा (वलयांकित) संघाच्या हिरुडिनिया वर्गात करण्यात येतो. जगभर यांच्या सु.३०० जाती आहेत. शरीराची लांबी १ ते २० सेंमी. असते आणि ताणल्यावर लांबी वाढते. शरीराच्या…

जांब (Rose apple)

जांब हा लहान आकाराचा वृक्ष मिर्टेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सायझिजियम जांबोस आहे. लवंग, पेरू, मिरी या वनस्पतींचाही याच कुलात समावेश केला जातो. हा वृक्ष मूळचा दक्षिण-पूर्व आशियाच्या उष्ण…

जीवाणू (Bacteria)

मोनेरा सृष्टीतील सजीवांना जीवाणू म्हणतात. जीवाणू सूक्ष्म असून ते एकपेशीय असतात. त्यांची लांबी ०.२ - २० मायक्रॉन असते व ते सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येतात. जीवाणू दंडगोल, चक्राकार, वर्तुळाकार, स्वल्पविराम अशा वेगवेगळ्या…

जीवसंहती (Biome)

पृथ्वीवर मोठ्या भौगोलिक क्षेत्रात निसर्गत: अनेक वनस्पतींचे भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात. त्याचबरोबर अशा अधिवासात राहणारे प्राणीही आढळतात. सजीवांच्या अशा एकत्र समुदायाला जीवसंहती म्हणतात. जमिनीवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या जीवसंहतीच्या सीमा या…

जास्वंद (Shoe-flower)

भारतात सर्वत्र आढळणारे शोभेच्या फुलाचे एक झुडूप. ही वनस्पती फुले येणाऱ्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस रोजा-सायनेन्सिस आहे. ती मूळची चीनमधील असून नंतर तिचा प्रसार भारतात झाला असावा,…

जास्मिन (Jasmine)

सुवासिक फुलांची एक प्रजाती. जॅस्मिनम (जास्मिन) ही प्रजाती ओलिएसी कुलातील असून यामधील सर्व वनस्पतींना सुगंधी फुले येतात. ओलिएसी कुलाला पारिजातक कुल असेही म्हणतात. या प्रजातीत सु.२०० जाती असून भारतात आढळणाऱ्या…

जीभ (Tongue)

स्वाद ओळखणारे मुख्य इंद्रिय. या इंद्रियाचा समावेश पाच ज्ञानेंद्रियांमध्ये होतो. अन्नग्रहण करताना होणाऱ्या चघळणे, चावणे, गिळणे इत्यादी क्रियांना जीभ मदत करते. मनुष्यामध्ये शब्दोच्चार करणे हे जिभेचे आणखी एक कार्य आहे.…

जीनोम (Genome)

आधुनिक रेणवीय जीवशास्त्रामध्ये एखादया सजीवाचा जीनोम म्हणजे त्या सजीवाच्या जनुकीय माहितीचा संपूर्ण संच. ही माहिती त्या सजीवाच्या शरीरातील डीएनए (किंवा विषाणूंचा विचार करताना, आरएनए) च्या स्वरूपात साठविलेली असते. जीनोेममध्ये जनुकांचा…

जिराफ (Giraffe)

समखुरी गणाच्या जिराफिडी कुलातील सस्तन प्राणी. जलद गतीने चालणारा या अर्थाच्या 'झरापा' या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द आलेला आहे. जिराफाचे वास्तव्य फक्त आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिण भागातील खुल्या वनक्षेत्रात आहे.…

जिरे (Cumin)

ही वर्षायू वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्युमीनम सायमिनम आहे. गाजर, कोथिंबीर, ब्राह्मी, बडीशेप या वनस्पतीही एपिएसी कुलातील आहेत. जिऱ्याची लागवड सुवासिक फळांकरिता (बिया) करतात. याच्या फळांनाही सामान्यपणे…

जीवरसायनशास्त्र (Biochemistry)

सजीवांमध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास जीवरसायनशास्त्रात केला जातो. प्राणी, वनस्पती आणि इतर सजीवांच्या पेशींमध्ये जे रेणू आढळतात त्यांसंबंधीचे संशोधन जीवरसायनतज्ज्ञ या शाखेत करतात. अनेक मूलद्रव्ये उदा., कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन…