(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
शारदा नदी (Sharda River)

शारदा नदी

काली किंवा महाकाली नदी. भारतातील उत्तराखंड राज्य आणि नेपाळ यांच्या सरहद्दीवरून, तसेच उत्तर प्रदेश राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. लांबी ...
शिमला शहर (Shimla City)

शिमला शहर

सिमला. भारतातील हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी, राज्यातील सर्वांत मोठे शहर व एक प्रसिद्ध थंड हवेचे गिरिस्थान. लोकसंख्या १,६९,५७८ (२०११). लेसर ...
शेटलंड बेटे (Shetland Islands)

शेटलंड बेटे

ईशान्य अटलांटिक महासागरातील ग्रेट ब्रिटनची बेटे. यांस झेटलंड बेटे असेही म्हणतात. ग्रेट ब्रिटनच्या अगदी उत्तर भागात असलेल्या स्कॉटलंडच्या मुख्य भूमीपासून ...
शेफील्ड शहर (Sheffield City)

शेफील्ड शहर

इंग्लंडच्या उत्तरमध्य भागतील साउथ यॉर्कशर या परगण्यातील एक महानगरीय बरो आणि प्रगत औद्योगिक शहर. लोकसंख्या – शहर ५,८४,८५३; महानगर १५,६९,००० ...
शोण नदी (Son River)

शोण नदी

गंगा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी ७८४ किमी. गुगल नकाशानुसार या नदीची लांबी ९३२ किमी. आहे. जलवाहन क्षेत्र सुमारे ७१,९०० ...
श्टेट्सीन शहर (Szczecin City)

श्टेट्सीन शहर

श्टेटीन. पोलंडमधील झाचोद्नीओपॉमोरस्की प्रांताची राजधानी, एक प्रमुख बंदर व औद्योगिक शहर. बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील पॉमरेनीअ या भूतपूर्व प्रशियन प्रदेशाची हीच राजधानी ...
सँटिआगो शहर (Santiago City)

सँटिआगो शहर

सांत्यागो. दक्षिण अमेरिकेतील चिली प्रजासत्ताकाची राजधानी. हे देशातील सर्वांत मोठे शहर आणि एक महत्त्वाचे राजकीय, आर्थिक, व्यापारी, वित्तीय व सांस्कृतिक ...
सँता फे शहर (Santa Fe City)

सँता फे शहर

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यू मेक्सिको राज्याची राजधानी, सँता फे परगण्याचे मुख्य ठिकाण आणि एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ. लोकसंख्या ८४,६८३ (२०१९). असंसं.च्या ...
सँता मोनिका शहर (Santa Monica City)

सँता मोनिका शहर

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील एक निसर्गरम्य शहर. लोकसंख्या ९०,५५५ (२०२०). कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागात, पॅसिफिक महासागराच्या सँता मोनिका उपसागराच्या ...
सँतुस शहर (Santos City)

सँतुस शहर

दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशामधील एक प्रमुख शहर, सागरी बंदर व साऊँ पाउलू राज्याची राजधानी. लोकसंख्या ५,२९,५४२ (२०१० अंदाज). ब्राझीलच्या आग्नेय ...
सँतेत्येन शहर (Saint-Etienne City)

सँतेत्येन शहर

फ्रान्समधील एक औद्योगिक शहर व ओव्हर्न-ऱ्होन-आल्प्स प्रदेशातील ल्वार विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,७२,०२३ (२०१३), उपनगरांसह ५,०८,००० (२०११). फ्रान्सच्या आग्नेय भागात ...
समुद्र (Sea)

समुद्र

महासागराचा उपविभाग किंवा सामान्यपणे पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा मोठा जलाशय म्हणजे समुद्र होय. उदा., कॅरिबियन समुद्र, उत्तर समुद्र, भूमध्य समुद्र, अरबी ...
समुद्रसपाटी (Sea Level)

समुद्रसपाटी

सर्वसाधारणपणे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाची सरासरी पातळी म्हणजे समुद्रसपाटी. तिच्या तुलनेत भूपृष्ठावरील अन्य उठावांची किंवा ठिकाणांची उंची अथवा खोली दर्शविली जाते. ...
समोच्च रेषा (Contour Line)

समोच्च रेषा

समोच्चतादर्शक रेषा. भूपृष्ठावरील समुद्रसपाटीपासून समान उंचीच्या स्थळांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समोच्च रेषा म्हणतात. स्थलवर्णनात्मक नकाशांत भूप्रदेशाचा उठाव दाखविण्यासाठी समोच्च रेषांचा ...
सर जॉर्ज बॅक (Sir George Back)

सर जॉर्ज बॅक

बॅक, सर जॉर्ज (Back, Sir George) : (६ नोव्हेंबर १७९६ – २३ जून १८७८). ब्रिटिश नौसेना अधिकारी, आर्क्टिक प्रदेशाचा समन्वेषक ...
सरँ शहर (Seraing City)

सरँ शहर

बेल्जियममधील ल्येझ प्रांतातील एक शहर. लोकसंख्या ६५,२७२ (२०२० अंदाज). हे पूर्व बेल्जियममध्ये, ल्येझपासून नैर्ऋत्येस १० किमी. वर, म्यूज नदीच्या काठावर ...
सरहद्द (Frontier) 

सरहद्द

एका देशाचा दुसऱ्या देशाच्या नजीकचा क्षेत्रविभाग किंवा दोन देशांचा एकमेकांशी भिडणारा प्रदेश म्हणजे सरहद्द होय. सरहद्दीला लांबी व रुंदी असते ...
सराटव्ह शहर (Saratov City)

सराटव्ह शहर

रशियाच्या पश्चिम भागातील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण, प्रमुख शहर व नदीबंदर. लोकसंख्या ८,४१,९०२ (२०१९ अंदाजे.). हे व्होल्गा नदीच्या उजव्या ...
सरोवर (Lake)

सरोवर

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोलगट भागातील जमिनीने वेढलेला किंवा बंदिस्त जलाशय म्हणजे सरोवर. यातील पाणी स्थिर असते किंवा संथगतीने प्रवाहित होत असते ...
सहारा वाळवंट (Sahara Desert)

सहारा वाळवंट

जगातील सर्वांत मोठे उष्ण कटिबंधीय वाळवंट. अरबी भाषेतील ‘सहारा’ म्हणजे ‘वाळवंट’ यावरून या प्रदेशाला हे नाव पडले आहे. भूमध्य समुद्राच्या ...