(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
सातमाळा डोंगररांग (Satmala Hills)

सातमाळा डोंगररांग

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागातील प्रामुख्याने नासिक जिल्ह्यातील सह्याद्रीचा एक फाटा. दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री (पश्चिम घाट) ...
सांता आना शहर (Santa Ana City)

सांता आना शहर

मध्य अमेरिकेतील एल साल्वादोर प्रजासत्ताकामधील याच नावाच्या विभागाचे मुख्य ठिकाण, तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ३,३०,३८९ (२०२० अंदाज). ...
सातारा जिल्हा (Satara District)

सातारा जिल्हा

पश्चिम महाराष्ट्रातील एक जिल्हा. क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी. लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११). राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सुमारे ...
सातारा जिल्हा, इतिहास (Satara District, History)

सातारा जिल्हा, इतिहास

सातारा जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. अश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा व कोयना या ...
सातारा शहर (Satara City)

सातारा शहर

महाराष्ट्र राज्यातील एक इतिहास प्रसिद्घ शहर आणि याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्यालय. ते अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी, किल्ल्याच्या उत्तर उतारावर ...
सान पेद्रो सूला शहर (San Pedro Sula City)

सान पेद्रो सूला शहर

दक्षिण अमेरिकेतील हाँडुरस या देशातील कॉर्तेझ विभागाच्या राजधानीचे ठिकाण, तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ६,६१,१९० (२०१९). देशाच्या वायव्य ...
सान मारीनो (San Marino)

सान मारीनो

यूरोपातील एक लहानसे स्वतंत्र प्रजासत्ताक तसेच यूरोपातील सर्वांत जुना देश. व्हॅटिकन सिटी, मोनाको व नाऊरू खालोखाल हा जगातील चौथ्या क्रमांकाचा ...
सांभर सरोवर (Sambhar Lake)

सांभर सरोवर

सांबर सरोवर. भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. राजस्थान राज्याच्या पूर्वमध्य भागातील नागौर व जयपूर या जिल्ह्यांत त्याचा विस्तार असून ...
सामाजिक भूगोल (Social Geography)

सामाजिक भूगोल

मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. या शाखेत मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली ...
सामोआ (Samoa)

सामोआ

पूर्वीचा पश्चिम सामोआ. अधिकृत नाव इन्डिपेन्डेन्ट स्टेट ऑफ सामोआ. पॅसिफिक महासागरातील एक स्वतंत्र देश. क्षेत्रफळ २,८३१ चौ. किमी. लोकसंख्या १,९८,४१४ ...
सायान पर्वत (Sayan Mountains)

सायान पर्वत

रशियातील सायबीरियाच्या दक्षिण भागातील पर्वत. सायान पर्वतश्रेण्या म्हणजे अल्ताई पर्वताचाच विस्तारित भाग आहे. या पर्वतश्रेणीचा विस्तार पश्चिमेस अल्ताई पर्वतापासून पूर्वेस ...
सारायेव्हो शहर (Sarajevo City)

सारायेव्हो शहर

बॉझ्निया आणि हेर्ट्सगोव्हीना या देशाची राजधानी आणि देशातील एक प्रमुख औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या ४,१९,९५७ (२०१९). हे देशाच्या पूर्वमध्य ...
सारावाक राज्य (Sarawak State)

सारावाक राज्य

मलेशियातील तेरा राज्यांपैकी एक राज्य आणि एक  ऐतिहासिक प्रदेश. या राज्याने बोर्निओ बेटाचा वायव्य भाग व्यापला आहे. सारावाकच्या वायव्येस दक्षिण ...
सालूमॉन आउगस्ट आंद्रे (Salomon August Andree)

सालूमॉन आउगस्ट आंद्रे

आंद्रे, सालूमॉन आउगस्ट (Andree, Salomon August) : (१८ ऑक्टो १८५४ – ? ऑक्टो १८९७). स्वीडिश विमानविद्या अभियंता, भौतिकीविज्ञ आणि ध्रुवीय ...
सिक्यांग नदी (Si Kiang River)

सिक्यांग नदी

शी-जीआंग; सी नदी; वेस्ट रिव्हर. दक्षिण चीनमधील सर्वांत लांब नदी. लांबी १,९५७ किमी. चीनमधील यूनान उच्चभूमी प्रदेशात उगम पावल्यानंतर सामान्यपणे ...
सितांग नदी (Sittang River)

सितांग नदी

म्यानमारच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी एक प्रमुख नदी. म्यानमारमधील शान पठाराच्या पश्चिम कडेवर, यामेदिनच्या ईशान्येस सितांगचा उगम होतो. हे उगमस्थान मंडालेच्या ...
सिंधु नदी (Indus River)

सिंधु नदी

संस्कृत – सिंधु (नदी), पर्शियन – हिंदु, ग्रीक – सिंथोस (इंदोस), रोमन – इंदुस, लॅटिन – सिंदुस. भारत, चीन (तिबेट) ...
सिरदर्या नदी (Syr Darya River)

सिरदर्या नदी

प्राचीन नाव जॅकसार्टेझ. मध्य आशियातील किरगिजिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान व कझाकस्तान या देशांचे जलवाहन करणारी एक महत्त्वपूर्ण नदी. नरिन व कारदर्या ...
सीबॅस्चन कॅबट (Sebastian Cabot)

सीबॅस्चन कॅबट

कॅबट, सीबॅस्चन : (१४७६/१४८२? – १५५७). ब्रिटिश मार्गनिर्देशक, समन्वेषक आणि मानचित्रकार. कॅबट यांची जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच त्यांच्या बालपणाविषयी बरीच अस्पष्टता ...
सुपीरिअर सरोवर (Superior Lake)

सुपीरिअर सरोवर

उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा यांदरम्यान असलेल्या पंचमहासरोवरांपैकी (ग्रेट फाइव्ह लेक्स) एक सरोवर. हे जगातील सर्वांत मोठे ...