(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
पर्शियन आखात (Persian Gulf)

पर्शियन आखात

पश्चिम आशियातील इराण आणि अरबस्तान द्वीपकल्प यांदरम्यानचा अरबी समुद्राचा एक फाटा. याला इराणचे आखात असेही म्हणतात. या आखाताची लांबी ९९० ...
पालघर शहर (Palghar City)

पालघर शहर

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६८,९३० (२०११). हे मुंबई व विरारच्या उत्तरेस अनुक्रमे ८७ ...
पिंपळनेर (Pimpalner)

पिंपळनेर

महाराष्ट्र राज्याच्या साक्री (जि. धुळे) तालुक्यातील एक प्रमुख गाव. लोकसंख्या २३,३६२ (२०११). हे गाव धुळे या शहराच्या पश्चिमेस सुमारे ८० ...
पुत्रजया शहर (Putrajaya City)

पुत्रजया शहर

मलेशियातील प्रमुख शहर, देशाचे प्रशासकीय केंद्र आणि संघीय प्रदेश. लोकसंख्या ९१,९०० (२०१८). हे शहर मलेशिया द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात, क्वालालुंपुर या ...
पुस्तकांचे गाव, भिलार (Village of Books, Bhilar)

पुस्तकांचे गाव, भिलार

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आणि एक पर्यटन स्थळ. लोकसंख्या ३,००० (२०२५ अंदाजे). हे गाव महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात आहे ...
पेद्रू आल्व्हारिश काब्राल (Pedro Alvares Cabral)

पेद्रू आल्व्हारिश काब्राल

काब्राल, पेद्रू आल्व्हारिश : (१४६७ किंवा ६८ – १५२०). पोर्तुगीज सरदार, मार्गनिर्देशक, समन्वेषक व ब्राझीलचा शोध लावणारा पहिला यूरोपीय. त्यांचा ...
पोओपो सरोवर (Poopo Lake)

पोओपो सरोवर

दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या सरोवरांपैकी हे एक मोठे सरोवर आहे ...
पोटोमॅक नदी (Potomac River)

पोटोमॅक नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी नदी. या नदीची एकूण लांबी ६१६ किमी. असून त्यातील ११८ किमी. लांबीचा भरती प्रवाह ...
प्रतिरोध पर्जन्य (Orographic Rainfall)

प्रतिरोध पर्जन्य

बाष्पयुक्त वाऱ्याच्या वाहण्याच्या मार्गात येणाऱ्या पर्वतीय अडथळ्यामुळे त्या पर्वताच्या वाताभिमुख उतारावर जी पर्जन्यवृष्टी होते, तिला ‘प्रतिरोध पर्जन्य’ किंवा ‘गिरिलिख पर्जन्य’ ...
प्रत्यावर्त (Anticyclone)

प्रत्यावर्त

वातावरणात जेव्हा एखाद्या ठिकाणी निर्माण झालेल्या जास्त भाराच्या केंद्राकडून सभोवतालच्या कमी भाराच्या प्रदेशाकडे चक्राकार वारे वाहतात, तेव्हा त्या वातावरणीय आविष्काराला ...
फंडी उपसागर (Bay of Fundy)

फंडी उपसागर

अटलांटिक महासागरचा एक फाटा. नैर्ऋत्य – ईशान्य दिशेत विस्तारलेल्या या उपसागरच्या उत्तरेस आणि पश्चिमेस कॅनडाचा न्यू ब्रन्सविक प्रांत, तर दक्षिणेस ...
फरीदाबाद शहर (Faridabad City)

फरीदाबाद शहर

भारताच्या हरयाणा राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि एक औद्योगिक शहर. लोकसंख्या १४,१४,०५० (२०११). हे राज्याच्या आग्नेय भागात, दिल्लीच्या ...
फिंगर लेक्स (Finger Lakes)

फिंगर लेक्स

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्याच्या पश्चिम-मध्य भागातील सरोवरसमूह. पूर्वेकडील सिराक्यूस आणि पश्चिमेकडील जेनसीओ या दोन नगरांच्या दरम्यान हा सरोवरसमूह आहे ...
फिनलंडचे आखात (Gulf of Finland)

फिनलंडचे आखात

यूरोप खंडातील बाल्टिक समुद्राचा अती पूर्वेकडील फाटा. याचा पूर्व-पश्चिम विस्तार ४०० किमी., दक्षिणोत्तर विस्तार १९ ते १३० किमी. आणि क्षेत्रफळ ...
फॉन वारे (Fohn Winds)

फॉन वारे

हा उबदार व शुष्क सोसाट्याचा वारा आहे. याला फोएन वारे असेही म्हणतात. हा जवळजवळ सर्व पर्वत व पर्वतरांगांच्या वातविमुख उतारांवरून ...
फ्योर्ड किनारा (Fjord Coast)

फ्योर्ड किनारा

समुद्राचा जमिनीकडे घुसलेला इंग्रजी ‘यू’ आकाराचा, लांब, खोल आणि अरुंद फाटा किंवा दरी म्हणजे फ्योर्ड होय. हिमनदीच्या अपघर्षण (झीज) कार्यामुळे ...
फ्रांथीस्को दे ओरेयाना (Francisco De Orellana)

फ्रांथीस्को दे ओरेयाना

ओरेयाना, फ्रांथीस्को दे (Orellana, Francisco De) : (१४९०? – १५४६). स्पॅनिश सेनानी व संपूर्ण ॲमेझॉन नदीचे समन्वेषण करणारे पहिले समन्वेषक ...
फ्रीड्रिक कॉन्रात हॉर्नमान (Friedrich Konrad Hornemann)

फ्रीड्रिक कॉन्रात हॉर्नमान

हॉर्नमान, फ्रीड्रिक कॉन्रात (Hornemann, Friedrich Konrad) : (१५ सप्टेंबर १७७२ – फेब्रुवारी १८०१ ). आफ्रिकेतील अतिशय धोकादायक व अपरिचित सहारा ...
फ्रेड्रिक जॉर्ज जॅक्सन (Frederick George Jackson)

फ्रेड्रिक जॉर्ज जॅक्सन

जॅक्सन, फ्रेड्रिक जॉर्ज (Jackson, Frederick George) : (६ मार्च १८६० – १३ मार्च १९३८). आर्क्टिक प्रदेशाचे समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक ...
बाब – एल् – मांदेब सामुद्रधुनी (Bab – El – Mandeb Strait)

बाब – एल् – मांदेब सामुद्रधुनी

आशिया खंडातील येमेन आणि आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागातील जिबूती व एरिट्रिया या देशांदरम्यान स्थित असणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीमुळे तांबडा समुद्र ...