(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

फ्रॅन्सिस्को फ्रँको  (Francisco Franco)

फ्रॅन्सिस्को फ्रँको  

फ्रँको, फ्रॅन्सिस्को : (४ डिसेंबर १८९२ – २० नोव्हेंबर १९७५). स्पेनचा हुकूमशाह आणि सरसेनापती  (१९३९–७५). पूर्ण नाव पाउलि‌नो एर्मेनहेल्दो तेओदेलो. स्पेनच्या गॅलिशिया प्रांतात ...
फ्रेडरिक एमन्स टर्मन (Frederick Emmons Terman)

फ्रेडरिक एमन्स टर्मन

टर्मन, फ्रेडरिक एमन्स : (७ जून १९००–१९ डिसेंबर १९८२). अमेरिकन अभियंते व शिक्षणतज्ज्ञ. इलेक्ट्रॉनिकी व शिक्षण क्षेत्र यांमध्ये बजाविलेल्या कामगिरीबद्दल ...
फ्रेडरिक जॅक्सन टर्नर (Frederick Jackson Turner)

फ्रेडरिक जॅक्सन टर्नर

टर्नर, फ्रेडरिक जॅक्सन : (१४ नोव्हेंबर १८६१—१४ मार्च १९३२). एक प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार. पॉर्टिज (विस्कॉन्सिन) येथे जन्म. विस्कॉन्सिन विद्यापीठातून बी ...
फ्रेडरिक डग्लस (Frederick Douglass)

फ्रेडरिक डग्लस

डग्लस, फ्रेडरिक : (फेब्रुवारी १८१८ ? -२० फेब्रुवारी १८९५). मानवी हक्कांसाठी लढणारा प्रसिद्ध आफ्रिकन अमेरिकन नेता, गुलामगिरी विरोधात झालेल्या दास्यमुक्ती ...
बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt)

बटुकेश्वर दत्त

दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी ...
बर्लिन ऑलिम्पिक १९३६ (Berlin Olympic 1936)

बर्लिन ऑलिम्पिक १९३६

जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात १९३६ साली झालेली ११ वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडासामने. जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलर ...
बर्लिन काँग्रेस (Congress of Berlin)

बर्लिन काँग्रेस

बर्लिन काँग्रेस : (१८७८). यूरोपमधील अठराव्या शतकातील तिसरी महत्त्वाची राजकीय परिषद. या परिषदेचे वैशिष्ट्य हे की, तुर्कस्तानबरोबरचे युद्ध जिंकून केलेल्या ...
बहादुरशाह जफर (Bahadur Shah Zafar)

बहादुरशाह जफर

बहादुरशाह जफर : (२४ ऑगस्ट १७७५–७ नोव्हेंबर १८६२). भारताचा १९ वा व शेवटचा मोगल सम्राट, तसेच तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता ...
बाल्कन युद्धे (Balkan Wars)

बाल्कन युद्धे

एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस यूरोपीय राजकारणात ‘पूर्वेकडील प्रश्न’ ही एक गुंतागुंतीची समस्या होती. बाल्कन द्वीपकल्पातील तुर्की साम्राज्याच्या उतरत्या ...
बाळकृष्ण देवरुखकर (Balkrishna Deorukhkar)

बाळकृष्ण देवरुखकर

देवरुखकर, बाळकृष्ण जानुजी : (३० ऑक्टोबर १८८४ ?- ८ जानेवारी १९४७) महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते. त्यांचा ...
बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai)

बाळासाहेब देसाई

देसाई, दौलतराव उर्फ बाळासाहेब : (१० मार्च १९१० – २४ एप्रिल १९८३). महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकनेते. त्यांचा जन्म सातारा ...
बाळू पालवणकर (Balu Palwankar)

बाळू पालवणकर

पालवणकर, बाळू :  (१९ मार्च १८७६ – ४ जुलै १९५५). पहिल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि विख्यात गोलंदाजपटू. पूर्ण नाव ...
बिरसा मुंडा (Birsa Munda)

बिरसा मुंडा

बिरसा मुंडा (Birsa Munda) : (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००). आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म ...
बॅस्तील (Bastille)

बॅस्तील

बॅस्तील :  पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला. बॅस्तील या शद्बाचे दोन ...
बेंजामिन डिझरेली (Benjamin Disraeli)

बेंजामिन डिझरेली

डिझरेली, बेंजामिन : (२१ डिसेंबर १८०४ – १९ एप्रिल १८८१). इंग्लंडचा एक प्रसिद्ध पंतप्रधान व मुत्सद्दी. कादंबरीकार म्हणूनही तो इंग्रजी ...
बेनीतो मुसोलिनी (Benito Mussolini)

बेनीतो मुसोलिनी

मुसोलिनी, बेनीतो : (२९ जुलै १८८३ — २८ एप्रिल १९४५). इटलीचा हुकूमशहा (१९२२–४३) व फॅसिझम या तत्त्वप्रणालीचा प्रवर्तक. त्याचा जन्म ...
बेहरामजी मेहरवानजी मलबारी (Behramji Malabari)

बेहरामजी मेहरवानजी मलबारी

मलबारी, बेहरामजी मेहरवानजी : (१८ मे १८५३–१२ जुलै १९१२). थोर भारतीय समाजसुधारक, साहित्यिक व पत्रकार. त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदा (सध्याचे ...
बॉक्सर बंड (Boxer Rebellion)

बॉक्सर बंड

बॉक्सर बंड : (१८९८-१९००). पाश्चात्त्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्ध चिनी लोकांनी केलेला सशस्त्र उठाव. या उठावाच्या संघटनेतील बहुसंख्य सदस्य कसरतपटू किंवा बलदंड ...
बोअर युद्ध (Boer war) (South African War)

बोअर युद्ध

बोअर युद्ध : (इ. स. १८९९ ते १९०२). द. आफिकेतील ब्रिटिश आणि डच वसाहतवाल्यांच्या स्पर्धेतून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बोअर युद्ध ...
बोल्शेव्हिक (Bolsheviks)

बोल्शेव्हिक

रशियन साम्यवादी क्रांतिकारी गट. रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (स्थापना १८९८) या मुळातील मार्क्सवादी पक्षाच्या १९०३ मध्ये लंडन येथे भरलेल्या ...