(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

नारायणसिंह (Veer Narayan Singh)

नारायणसिंह

नारायणसिंह : (१७९५–१० डिसेंबर १८५७). छत्तीसगडमधील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक. त्यांचा जन्म छत्तीसगडमधील सोनाखानमध्ये आदिवासी भागात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ...
निळीचा उठाव (Indigo Revolt) (Blue Mutiny)

निळीचा उठाव

भारतातील बंगाल प्रांतातील नीळ उत्पादक शेतकर्‍यांनी मळेवाल्यांविरुद्ध केलेला प्रसिद्ध उठाव (१८५९-६०). हा उठाव ‘ब्लू म्यूटिनी’ म्हणूनही ओळखला जातो. मोगल काळापासून ...
नीळकंठ जनार्दन कीर्तने (Nilkanth Janardan Kirtane)

नीळकंठ जनार्दन कीर्तने

कीर्तने, नीळकंठ जनार्दन : (१ जानेवारी १८४४–१८९६). मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार, चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला ...
नेपोलियन, तिसरा (Napoleon III)

नेपोलियन, तिसरा

नेपोलियन, तिसरा : (२० एप्रिल १८०८ – ९ जानेवारी १८७३). फ्रान्सचा १८५२–७० च्या दरम्यानचा बादशाह व पहिल्या नेपोलियनचा पुतण्या. त्याचे ...
न्यू डील (New Deal)

न्यू डील

अमेरिकेचा अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट याने अंमलात आणलेल्या अंतर्गत कार्यक्रमाचे नाव. अध्यक्षीय निवडणुकीसाठी रूझवेल्टला उमेदवार म्हणून १९३२ मध्ये मान्यता मिळाली. तेव्हा ...
न्यूरेंबर्ग कायदे (१९३५) (The Nuremberg Laws)

न्यूरेंबर्ग कायदे

नाझी जर्मनीतील ज्यूविरोधी आणि वंशवादी कायदे. जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर (२० एप्रिल १८८९–३० एप्रिल १९४५) याच्या ...
पंढरपूरचा तह (Treaty of Pandharpur)

पंढरपूरचा तह

पंढरपूरचा तह : (११ जुलै १८१२). पेशवे आणि जहागीरदार यांच्यातील तह. महाराष्ट्रात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवे-जहागीरदारांच्या संघर्षाचे प्रश्न पुढे ...
पबना उठाव (Pabana Revolt)

पबना उठाव

पबना उठाव : (१८७३-७६). बंगालमधील शेतकऱ्यांनी जमीनदारांच्या विरोधात केलेला उठाव. अन्यायी महसूल वाढ आणि महसूल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची संपत्ती जप्त ...
पवित्र संघ (Holy League)

पवित्र संघ

पवित्र संघ : (होली लीग ). फ्रान्सच्या इटलीवरील अतिक्रमणाविरुद्ध विविध घटक मित्र राष्ट्रांनी उभा केलेला संघ. यात पोपचाही समावेश होता, ...
पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर (Pandurang Sakharam Pisurlekar)

पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर

पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम : (३० मे १८९४ – १० जूलै १९६९). गोव्यातील एक प्रसिद्ध इतिहासकार. त्यांचा जन्म गोव्यातील शेणवी कुटुंबात ...
पीटर द ग्रेट (Peter the Great)

पीटर द ग्रेट

पीटर द ग्रेट : (९ जून १६७२ – २८ जानेवारी १७२५). विख्यात रशियन सम्राट. मॉस्को येथे जन्म. झार अलेक्सिस आणि ...
पुणे सार्वजनिक सभा (Pune Sarvajanik Sabha)

पुणे सार्वजनिक सभा

महाराष्ट्रातील एक महत्त्वाची राजकीय संस्था व सनदशीर मार्गाने चळवळ करणारी संघटना. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय राजकारणात उदारमतवादी अथवा नेमस्त ...
फ्रँक्लिन डेलॅनो रूझवेल्ट (Franklin D. Roosevelt)

फ्रँक्लिन डेलॅनो रूझवेल्ट

रूझवेल्ट, फ्रँक्लिन डेलॅनो : (३० जानेवारी १८८२ – १२ एप्रिल १९४५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा बत्तीसावा राष्ट्राध्यक्ष व न्यू डील या ...
फ्रांस्वा प्येअर गीयोम गीझो (Francois Guizot)

फ्रांस्वा प्येअर गीयोम गीझो

गीझो, फ्रांस्वा प्येअर गीयोम : (४ ऑक्टोबर १७८७—१२ ऑक्टोबर १८७४). सुप्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म नीम (दक्षिण फ्रान्स) येथील ...
फ्रिटझ फिशर (Fritz Fischer)

फ्रिटझ फिशर

फिशर, फ्रिटझ : (५ मार्च १९०८ – १ डिसेंबर १९९९). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार. त्यांचा जन्म जर्मनीतील बव्हेरीया प्रांतातील लुडविगस्टॅड येथे ...
फ्रॅन्सिस्को फ्रँको  (Francisco Franco)

फ्रॅन्सिस्को फ्रँको  

फ्रँको, फ्रॅन्सिस्को : (४ डिसेंबर १८९२ – २० नोव्हेंबर १९७५). स्पेनचा हुकूमशाह आणि सरसेनापती  (१९३९–७५). पूर्ण नाव पाउलि‌नो एर्मेनहेल्दो तेओदेलो. स्पेनच्या गॅलिशिया प्रांतात ...
फ्रेडरिक एमन्स टर्मन (Frederick Emmons Terman)

फ्रेडरिक एमन्स टर्मन

टर्मन, फ्रेडरिक एमन्स : (७ जून १९००–१९ डिसेंबर १९८२). अमेरिकन अभियंते व शिक्षणतज्ज्ञ. इलेक्ट्रॉनिकी व शिक्षण क्षेत्र यांमध्ये बजाविलेल्या कामगिरीबद्दल ...
फ्रेडरिक जॅक्सन टर्नर (Frederick Jackson Turner)

फ्रेडरिक जॅक्सन टर्नर

टर्नर, फ्रेडरिक जॅक्सन : (१४ नोव्हेंबर १८६१—१४ मार्च १९३२). एक प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार. पॉर्टिज (विस्कॉन्सिन) येथे जन्म. विस्कॉन्सिन विद्यापीठातून बी ...
बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt)

बटुकेश्वर दत्त

दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी ...
बर्लिन ऑलिम्पिक १९३६ (Berlin Olympic 1936)

बर्लिन ऑलिम्पिक १९३६

जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात १९३६ साली झालेली ११ वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडासामने. जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलर ...