(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

टेहरी गढवाल संस्थान (Tehri Garhwal Princely State)

टेहरी गढवाल संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील कुमाऊँ प्रदेशातील एक संस्थान. क्षेत्रफळ १०,८८० चौ. किमी. लोकसंख्या ६,०२,११५ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. ४१ लाख रुपये. उत्तरेस ...
टॉमस जेफर्सन (Thomas Jefferson)

टॉमस जेफर्सन

जेफर्सन, टॉमस (jefferson thomas) : (१३ एप्रिल १७४३ – ४ जुलै १८२६). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा तिसरा अध्यक्ष आणि स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा ...
टॉमस बॅबिंग्टन मेकॉले (Thomas Babington Macaulay)

टॉमस बॅबिंग्टन मेकॉले

मेकॉले, टॉमस बॅबिंग्टन : (२५ ऑक्टोबर १८००–२८ डिसेंबर १८५९). इंग्रज इतिहासकार आणि निबंधकार. लायसेस्टशरमधील रॉथ्‌ली टेंपल येथे जन्मला. १८१८ मध्ये केंब्रिजच्या ...
ट्रिपल अलायन्स (Triple Alliance -1882)

ट्रिपल अलायन्स

ट्रिपल अलायन्स म्हणजेच त्रिराष्ट्र लष्करी करार. जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि इटली यांच्यामध्ये पहिल्या महायुद्धापूर्वी हा करार झालेला होता (२० मे १८८२) ...
ट्रॉट्‌स्कीवाद (Trotskyism)

ट्रॉट्‌स्कीवाद

रशियन धोरण आणि जागतिक क्रांती यासंबंधी क्रांतिकारक लीअन ट्रॉट्‌स्की याने मांडलेले विचार म्हणजे ट्रॉट्‌स्कीवाद. लेनिनच्या मृत्यूनंतर साम्यवादी क्रांतीच्या ध्येयधोरणासंबंधी ट्रॉट्‌स्की ...
ड्रायफस प्रकरण  (Dreyfus Affair)

ड्रायफस प्रकरण 

आल्फ्रेड ड्रायफस ह्या फ्रेंच लष्करातील अधिकारी व्यक्तीवर लादलेल्या आरोपातून उद्‌भवलेले एक प्रकरण. फ्रान्समध्ये ज्यूविरोधी वातावरण तापले असताना तसेच रोमन कॅथलिक ...
ताइपिंग बंड (Taiping Rebellion)

ताइपिंग बंड

ताइपिंग बंड : (थायफींग बंड). राजकीय, सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनमध्ये झालेले एक प्रसिद्ध बंड. १८४८–६५ अशी सतरा ...
तात्या टोपे (Tatya Tope)

तात्या टोपे

तात्या टोपे : (? १८१४–१८ एप्रिल १८५९). इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग ...
तिसरा जॉर्ज (George III of the United Kingdom)

तिसरा जॉर्ज

जॉर्ज, तिसरा : (४ जून १७३८—२९ जानेवारी १८२०). हॅनोव्हर घराण्यातील ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा १७६०—१८२० या काळातील राजा. त्याचा जन्म ...
तीस वर्षांचे युद्ध (Thirty Years War)

तीस वर्षांचे युद्ध

तीस वर्षांचे युद्ध : (१६१८–१६४८). सोळाव्या शतकात उत्तर व पश्चिम यूरोपात प्रबोधन व धर्मसुधारणा या दोन गोष्टींनी जी खळबळ माजली, ...
तुंकू अब्दुल रहमान (Tunku Abdul Rahman Putra Alhaj)

तुंकू अब्दुल रहमान

तुंकू अब्दुल रहमान : (८ फेब्रुवारी १९०३–६ डिसेंबर १९९०). मलेशियाच्या संघराज्याचा पहिला पंतप्रधान व आग्नेय आशियाचा एक मान्यवर नेता. त्याच्या ...
तेभागा आंदोलन (Tebhaga movement)

तेभागा आंदोलन

तेभागा आंदोलन : (१९४६-५०). भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या शेवटच्या कालखंडात बंगाल प्रांतात झालेले एक महत्त्वाचे शेतकरी आंदोलन. जमीनदारीच्या शोषणातून मुक्ततेसाठी हे आंदोलन ...
त्रिआनॉनचा तह (Treaty of Trianon)

त्रिआनॉनचा तह

पहिल्या महायुद्धातील (१९१४–१९१८) पराभवानंतर हंगेरीचा विजेत्या राष्ट्रांशी झालेला तह (४ जून १९२०). महायुद्धात इंग्लंडच्या नेतृत्वाखालील गटाचा विजय होऊन जर्मनीच्या गटाचा ...
थिऑसॉफिकल सोसायटी (Theosophical Society)

थिऑसॉफिकल सोसायटी

आधुनिक काळातील एक धार्मिक आंदोलन. ‘थिऑसʼ आणि ‘सोफियाʼ या दोन ग्रीक शब्दांपासून ‘थिऑसॉफीʼ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ...
थिबा राजे (Thibaw, king of Myanmar)

थिबा राजे

थिबा राजे : (१ जानेवारी १८५९–१९ डिसेंबर १९१६ ). म्यानमारच्या (पूर्वीचा ब्रह्मदेश) कॉनबाँग वंशातील शेवटचे राजे. मिंडान राजांचे (कार. १८५३-७८) ...
थीओडर रूझवेल्ट (Theodore Roosevelt)

थीओडर रूझवेल्ट

रूझवेल्ट, थीओडर : (२७ ऑक्टोबर १८५८ – ६ जानेवारी १९१९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सव्वीसावा राष्ट्राध्यक्ष आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ...
दाजीबा देसाई (Dajiba Desai)

दाजीबा देसाई

देसाई, दाजीबा बळवंतराव : (१५ सप्टेंबर १९२५ – १९ मार्च १९८५).  शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातील एक ज्येष्ठ ...
नवे आर्थिक धोरण (The New Economic Policy - NEP)

नवे आर्थिक धोरण

नवे आर्थिक धोरण : (१९२१–२८). आधुनिक रशियाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे धोरण. मार्क्सवादी विचारवंत न्यिकलाय लेनिनच्या (१८७०–१९२४) नेतृत्वाखाली रशियात जगातील पहिली ...
नागनाथअण्णा नायकवडी (Nagnath Naikwadi)

नागनाथअण्णा नायकवडी

नायकवडी, नागनाथ रामचंद्र : ( १५ जुलै १९२२ – २२ मार्च २०१२ ). महाराष्ट्रातील एक थोर स्वातंत्र्यसैनिक. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ...
नादिरशाह  (Nadir Shah)

नादिरशाह  

नादिरशाह : (१२/२२ ? ऑक्टोबर १६८८ – ९ मे /१९ जून ? १७४७). इराणचा एक बादशहा. तहमास्प कूलीखान किंवा नादीर ...