(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

मिठाचा सत्याग्रह (दांडी यात्रा) (Dandi March)

मिठाचा सत्याग्रह

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील म. गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे आणि दीर्घकालीन (१९३०–३४) जनता आंदोलन. ‘दांडी यात्राʼ किंवा ‘दांडी मार्चʼ म्हणूनही हे आंदोलन ...
मुक्तद्वार धोरण (Open Door Policy)

मुक्तद्वार धोरण 

अमेरिकेचे चीनच्या बाजारपेठविषयीचे जागतिक धोरण. अमेरिकेने १८९९ आणि १९०० मध्ये सर्व राष्ट्रांसमोर चीनची बाजारपेठ व्यापारासाठी सर्वांना मुक्त असावी, असा प्रस्ताव ...
मॅथ्यू कॅलब्रेथ पेरी (Matthew C. Perry)

मॅथ्यू कॅलब्रेथ पेरी

पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ : (१० एप्रिल १७९४ – ४ मार्च १८५८). एक अमेरिकन नाविक अधिकारी. त्याचा जन्म न्यूपोर्ट (र्‍होड-आयलंड) येथे ...
मेजी (Emperor Meiji) 

मेजी

मेजी : (३ नोव्हेंबर १८५२ — ३० जुलै १९१२). जपानी सम्राट (कार. १८६७–१९१२) व आधुनिक जपानचा एक शिल्पकार. त्याचे मूळ ...
मेन्शेव्हिक (Mensheviks)

मेन्शेव्हिक

रशियन साम्यवाद समर्थक एक प्रमुख राजकीय गट. रशियामध्ये विभिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष होते. निरंकुश आणि दमनात्मक परिस्थिती असूनदेखील तेथे राजकीय ...
मोशे दॅयान (Moshe Dayan)

मोशे दॅयान

दॅयान, मोशे :  (२० मे १९१५ – १६ ऑक्टोबर १९८१). इझ्राएलचा एक सेनानी व मुत्सद्दी. त्याचा जन्म सधन ज्यू कुटुंबात ...
मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (Mountstuart Elphinstone)

मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन

एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट : (६ ऑक्टोबर १७७९—२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो ...
याकॉप क्रिस्टोफ बुर्कहार्ट (Jacob Burckhardt)

याकॉप क्रिस्टोफ बुर्कहार्ट

बुर्कहार्ट, याकॉप क्रिस्टोफ  :  (२५ मे १८१८ — ८ आगॅस्ट १८९७). प्रसिद्ध स्विस इतिहासकार व इटालियन प्रबोधनाचा एक श्रेष्ठ मीमांसक ...
याल्टा परिषद (Yalta Conference)

याल्टा परिषद

याल्टा परिषद : दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात याल्टा (क्रिमिया–सोव्हिएट रशिया) येथे तीन बड्या दोस्त राष्ट्रांत झालेली परिषद. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन ...
युआन-शृ-खाय्‌ (Yuan Shihkai)

युआन-शृ-खाय्‌

युआन-शृ-खाय्‌ : (१६ सप्टेंबर १८५९ — ६ जून १९१६). प्रजासत्ताक चीनचा पहिला अध्यक्ष (१९१२−१६), मुत्सद्दी व लष्करी नेता. हूनान्‌ प्रांतातील ...
यूझेफ पिलसूतस्की (Jozef Pilsudski)

यूझेफ पिलसूतस्की

पिलसूतस्की, यूझेफ : (५ डिसेंबर १८६७–१२ मे १९३५). पोलंडमधील एक क्रांतिकारक, मुत्सद्दी व लष्करी सेनानी (मार्शल). पोलंडच्या रशियाविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात ...
यूरोपीय संघ  (Concert of Europe)

यूरोपीय संघ 

नेपोलियनच्या पाडावानंतर व्हिएन्ना परिषदेने दृढ केलेली यूरोपची राजकीय प्रतिष्ठा व प्रादेशिक विभागणी स्थिरस्थावर करण्यासाठी यूरोपीय राजांनी ढोबळमानाने एकमेकांत केलेला एक ...
योझेफ पाउल गोबेल्स (Joseph Goebbels)

योझेफ पाउल गोबेल्स

गोबेल्स, योझेफ पाउल : (२९ ऑक्टोबर १८९७ – १ मे १९४५). जर्मनीतील नाझी पक्षाचा प्रमुख प्रचारक व मुत्सद्दी. ऱ्हाइनलँडमधील राइट ह्या ...
योहान गुस्टाफ ड्रॉइझेन (Johann Gustav Droysen)

योहान गुस्टाफ ड्रॉइझेन

ड्रॉइझेन, योहान गुस्टाफ : (६ जुलै १८०८–१९ जून १८८४). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार व मुत्सद्दी. ट्रेप्टो (पॉमेरेनीया) येथे प्रशियन कुटुंबात जन्म ...
रक्तहीन राज्यक्रांति (Bloodless Revolution) (Glorious Revolution)

रक्तहीन राज्यक्रांति

इंग्लंडमध्ये इ. स. १६८८ साली मानवी रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली राज्यक्रांती. या क्रांतीचा उल्लेख वैभवशाली राज्यक्रांती असाही केला ...
रघुनाथ पांडुरंग करंदीकर (Raghunath Pandurang Karandikar)

रघुनाथ पांडुरंग करंदीकर

करंदीकर, रघुनाथ पांडुरंग : (२१ ऑगस्ट १८५७ – २४ एप्रिल १९३५). व्यासंगी कायदेपंडित, स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते, साहित्यिक आणि लोकमान्य ...
रमेशचंद्र मजुमदार (R. C. Majumdar)

रमेशचंद्र मजुमदार

मजुमदार, रमेशचंद्र : (४ डिसेंबर १८८८ — ११ फेब्रवारी १९८०). भारतातील एक थोर व परखड बंगाली इतिहाकार. त्यांचा जन्म बंगालमध्ये (विद्यमान ...
राघोजी भांगरे (Raghoji Bhangare)

राघोजी भांगरे

भांगरे, राघोजी : ( ८ नोव्‍हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्‍यांचा जन्‍म अहमदनगर जिल्ह्यातील ...
राजमोहिनी देवी (Rajmohini Devi)

राजमोहिनी देवी

राजमोहिनी देवी : (७ जुलै १९१४ – ६ जानेवारी १९९४). छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या. त्यांचा जन्म प्रतापपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे ...
राणी इंदुमती (Indumati)

राणी इंदुमती

राणी इंदुमती : (६ डिसेंबर १९०६ – ३० नोव्हेंबर १९७१). कोल्हापूर संस्थानातील शैक्षणिक व सामाजिक सुधारणांच्या पुरस्कर्त्या. त्यांचा जन्म सासवड ...