(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
भौतिकीमध्ये प्रामुख्याने पदार्थांच्या स्थिती-गतीचा आणि त्यातील बदलांचा विचार केला जातो. तसेच पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा शोध घेतला जातो. सदर कार्यकारणभावाच्या विवेचनातून या शास्त्राचा पाया घातला गेला. हा ज्ञानविकास होताना साधारणतः निरीक्षण ते सिद्धांत हे अनुक्रमे प्रारंभिक व अंतिम टप्पे मानले जातात. या दरम्यान निरीक्षणाबाबत उपपत्ती,प्रयोग, अनुमान असे टप्पे घेत हा प्रवास पूर्ण होतो. अर्थात प्रत्येक वेळेस अशाच मार्गाने भौतिकीमध्ये ज्ञानाची निर्मिती झाली असे मानण्याचे कारण नाही.

भौतिकीच्या प्रगतीत इतर विज्ञानाप्रमाणे, आधुनिक विज्ञान आणि प्राचीन विज्ञान असे दोन भाग पडतात. जगातल्या महत्वाच्या संस्कृतींनी भौतिकीबाबत विकसित विचार केल्याची उदाहरणे आढळतात. भारतीय संदर्भात खगोलशास्त्राचा विकास हा महत्वाचा टप्पा आहे. मात्र प्रयोग करून उपपात्तींची सत्यता तपासणे हा आधुनिक विज्ञानातला महत्वाचा घटक प्राचीन विज्ञानात अभावानेच आढळतो.
भौतिकी या विषयाचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. सैद्धांतिक –प्रायोगिक किंवा मुलभूत- उपयोजित असे याकडे बघता येईल.तसेच ज्या ज्या परिणामांचे स्पष्टीकरण शोधण्यात आले त्या प्रमाणे वर्गीकरण करता येईल. उदाहरणार्थ – विद्युतप्रवाहाचे परिणाम ‘ विद्युत चुंबकत्व’ या शाखेमध्ये अभ्यासले जातात तसेच पदार्थांच्या उष्माविषयक गुणधर्मांची चिकित्सा ‘उष्मा व उष्मागातीकी’ या शाखेत होऊ शकते. तसेच ज्या प्रकारे संकल्पनांचा विकास होत गेला त्या त्या संकल्पनांच्या विकासाचा मागोवा घेता येऊ शकतो. भौतिकीच्या ज्ञानमंडळातर्फे मूलभूत भौतिकी, उपयोजित भौतिकी, खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व विश्वरचनाशास्त्र या विषयांच्या नोंदी तयार करणे अपेक्षित आहे.

या अनुषंगाने सदर विषयाची खालील दहा उपविभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे.
१. स्थितीगतीशास्त्र व वस्तूचे गुणधर्म
२. तरंग व दोलन
३. उष्मा व उष्मागतीकी
४. ध्वनी
५. विद्युत चुंबकत्व
६.न्युक्लीय व कण भौतिकी
७. आण्विक व रेणूभौतिकी
८.घन अवस्था भौतिकी
९. प्रकाशकी
१०. आंतरशाखीय भौतिकी
११.खगोलशास्त्र व खगोलभौतिकी
१२..विश्वरचनाशास्त्र व सापेक्षता
१३.पुंज भौतिकी
अर्थातच या उपविभागांचे अजून उप-उपविभाग आहेत. ह्या रचनेचे बलस्थान हे की त्यामुळे तुकड्या- तुकड्यातील ज्ञानाचा एकसंधपणा अधोरेखित होतो. अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या अथक संघर्षामुळेच भौतिकीच्या ज्ञानशाखांचा हा व्यासंग आपल्याला शक्य होतो आहे. त्यांचे ऋण मनी ठेवत भौतिकी विषयाबाबत उत्सुकता बाळगणाऱ्या सर्व जिज्ञासू वाचकांचे ज्ञानमंडळातर्फे मनःपूर्वक स्वागत!.

वस्तुमान आणि ऊर्जा यांची अक्षय्यता (Mass and Energy Conservation)

वस्तुमान आणि ऊर्जा यांची अक्षय्यता

वस्तुमानाची निर्मीती शून्यातून होऊ शकत नाही अथवा त्याचा नाशही होऊ शकत नाही. अधिक अचूकपणे म्हणायचे झाले, तर कोणत्याही प्रणालीतील एकूण ...
वस्तुमानदोष (Mass Defect)

वस्तुमानदोष

अणुकेंद्राचे वस्तुमान आणि त्याच्या घटकांचे वस्तुमान यांमधील फरकास वस्तुमानदोष असे म्हणतात. न्यूट्रॉन (Neutron) आणि प्रोटॉन (Proton) असलेल्या अणुकेंद्राचे वस्तुमान असल्यास ...
वस्तुमानांक (Mass Number)

वस्तुमानांक

एखाद्या अणूचे वस्तुमान आणवीय वस्तुमान एकका (Atomic Mass Unit) च्या परिमाणात व्यक्त केले असता जी संख्या येईल तिच्या अगदी लगतच्या ...
विद्युत आकारांतर (Electrostriction)

विद्युत आकारांतर

विद्युत अपारक (विद्युत असंवाहक वा निरोधक; Dielectric) पदार्थ विद्युत क्षेत्रात ठेवल्यास त्याच्या आकारमानात किंचित बदल (यांत्रिक विरूपण) होतो. या आविष्काराला ...
विद्युत् तर्षण (Electro-osmosis)

विद्युत् तर्षण

एका छिद्रातील विद्युत तर्षण : V-वेग भौतिकीय आविष्कार.  पाणी असलेल्या चंचुपात्रात एक सच्छिद्र भांडे ठेवून एक विद्युत् अग्र त्या भांड्यात ...
विद्युत् प्रवाहमापक (Galvanometer)

विद्युत् प्रवाहमापक

अल्प विद्युत् प्रवाहाचे अस्तित्व दाखविण्यासाठी आणि मापन करण्यासाठी मुख्यत्वे वापरण्यात येणारे नाजूक उपकरण. भोवती चुंबकीय क्षेत्र असताना तारेतून वाहणारा विद्युत् ...
विश्वनिर्मिती - महा उसळी (Big Bounce)

विश्वनिर्मिती – महा उसळी

विश्वनिर्मिती – महा उसळी  विश्वाच्या निर्मितीविषयक ‘महास्फोट सिद्धांत’ हा अग्रणी समजला जातो. या सिद्धांतातील त्रुटी दूर करण्यासाठी वैश्विक वैश्विक फुगवट्याचा ...
विश्वनिर्मिती - स्थिर स्थिती (Steady State Theory)

विश्वनिर्मिती – स्थिर स्थिती

विश्वनिर्मिती – स्थिर स्थिती : विश्वाच्या निर्मितीविषयी असलेल्या महास्फोट सिद्धांतातील त्रुटी दूर करण्यासाठी इ.स. १९४८ मध्ये थॉमस गोल्ड आणि हर्मन बॉन्डी ...

विश्वनिर्मिती – महास्फोट

विश्वनिर्मिती – महास्फोट : महास्फोट सिद्धांत हा विश्वनिर्मितीवरील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. अल्बर्ट आइन्स्टाइनने इ.स. 1915 मध्ये मांडलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धांताचा ...
विष्ट्म्भ (Solstice)

विष्ट्म्भ

विष्ट्म्भ : उत्तरविष्ट्म्भ (Summer Solstice) : आयनिकवृत्त (Ecliptic) वैषुविकवृत्ताशी (Celestial Equator) सुमारे २३.५ अंशाचा कोन करीत असल्यामुळे सूर्य वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस ...
वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत (Equatorial Co-ordinate System)

वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत

वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत : आकाश गोलावरील (Celestial Sphere) ग्रह, तारे किंवा अन्य आकाशस्थ वस्तूंचे स्थान निश्चित करण्यासाठी ही पद्धत वापरली ...
व्यतिकरण (Interference)

व्यतिकरण

पाण्याच्या स्थिर-सपाट पृष्ठभागावर जेंव्हा आघात होतो तेंव्हा त्या पृष्ठभागावर उंच सखल अशा लहरी उमटतात. त्या लहरींना तरंग अशी संज्ञा आहे ...
संपात (Equinox)

संपात

संपात :  वसंत संपात  (Vernal Equinox) : आयनिक वृत्तावरील सूर्याचे एक भ्रमण म्हणजे एक वर्ष. पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी ...
समता उल्लंघन (Violation of parity)

समता उल्लंघन

(भौतिकी). पॅरिटी उल्लंघन. सममिती (symmetry) आणि अक्षय्यत्वाचे नियम (conservation law) ह्या भौतिकीमधील महत्त्वाच्या संकल्पना आहेत. समता अथवा परावर्तन सममिती (reflection ...
सममंडल (Prime vertical)

सममंडल

सममंडल : क्षितिजावर चार मुख्य दिशा दर्शविणारे बिंदू ( N, E, S, W ) आपल्याला माहीत आहेत. NZS हे याम्योत्तरवृत्त ...
समवस्तुमानांक (Isobar)

समवस्तुमानांक

अणुकेंद्रीय भौतिकीत वस्तुमानांक [] तोच परंतु भिन्न अणुक्रमांक [] असलेल्या अणूंना समवस्तुमानांक असे म्हणतात. म्हणजेच न्यूक्लिऑनांची (न्यूट्रॉन व प्रोटॉन यांची ...
संस्पंदन (Resonance)

संस्पंदन

(अनुस्पंदन). ध्वनीच्या कंपनांबाबत ही संज्ञा वापरण्यात येते. ध्वनीशिवाय यांत्रिकी, प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह मंडले, रेडिओ मंडले, रेणवीय संरचना, अणुकेंद्रीय चुंबकत्व, प्रकाशकी ...
सी. सी. डी. - विद्युत भार युग्मित प्रयुक्ती– (Charge Coupled Device)

सी. सी. डी. – विद्युत भार युग्मित प्रयुक्ती–

सी. सी. डी. – विद्युत भार युग्मित प्रयुक्ती : विद्युत भार युग्मित प्रयुक्तीचा शोध इ.स. १९६९ मध्ये विलार्द बॉयल आणि ...
सूर्यग्रहण (Solar Eclipse)

सूर्यग्रहण 

सूर्यग्रहणसूर्यग्रहण अमावास्येला होते. अमावास्येचा क्षण म्हणजे सूर्य-चंद्र युतीचा क्षण असतो. आयनिकवृत्ताच्या संदर्भात बोलायचे तर त्याक्षणी सूर्य आणि चंद्र यांचे ...
सूर्यग्रहणाचे प्रकार (Types of Solar Eclipse)

सूर्यग्रहणाचे प्रकार

सूर्यग्रहणाचे प्रकार : खग्रास सूर्यग्रहण (Total Solar Eclipse), खंडग्रास सूर्यग्रहण (Partial Solar Eclipse) आणि कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Eclipse) असे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार ...