(प्रस्तावना) पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | समन्वयक : माधव राजवाडे | विद्याव्यासंगी : नितीन भरत वाघ
भौतिकीमध्ये प्रामुख्याने पदार्थांच्या स्थिती-गतीचा आणि त्यातील बदलांचा विचार केला जातो. तसेच पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा शोध घेतला जातो. सदर कार्यकारणभावाच्या विवेचनातून या शास्त्राचा पाया घातला गेला. हा ज्ञानविकास होताना साधारणतः निरीक्षण ते सिद्धांत हे अनुक्रमे प्रारंभिक व अंतिम टप्पे मानले जातात. या दरम्यान निरीक्षणाबाबत उपपत्ती,प्रयोग, अनुमान असे टप्पे घेत हा प्रवास पूर्ण होतो. अर्थात प्रत्येक वेळेस अशाच मार्गाने भौतिकीमध्ये ज्ञानाची निर्मिती झाली असे मानण्याचे कारण नाही.

भौतिकीच्या प्रगतीत इतर विज्ञानाप्रमाणे, आधुनिक विज्ञान आणि प्राचीन विज्ञान असे दोन भाग पडतात. जगातल्या महत्वाच्या संस्कृतींनी भौतिकीबाबत विकसित विचार केल्याची उदाहरणे आढळतात. भारतीय संदर्भात खगोलशास्त्राचा विकास हा महत्वाचा टप्पा आहे. मात्र प्रयोग करून उपपात्तींची सत्यता तपासणे हा आधुनिक विज्ञानातला महत्वाचा घटक प्राचीन विज्ञानात अभावानेच आढळतो.
भौतिकी या विषयाचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. सैद्धांतिक –प्रायोगिक किंवा मुलभूत- उपयोजित असे याकडे बघता येईल.तसेच ज्या ज्या परिणामांचे स्पष्टीकरण शोधण्यात आले त्या प्रमाणे वर्गीकरण करता येईल. उदाहरणार्थ – विद्युतप्रवाहाचे परिणाम ‘ विद्युत चुंबकत्व’ या शाखेमध्ये अभ्यासले जातात तसेच पदार्थांच्या उष्माविषयक गुणधर्मांची चिकित्सा ‘उष्मा व उष्मागातीकी’ या शाखेत होऊ शकते. तसेच ज्या प्रकारे संकल्पनांचा विकास होत गेला त्या त्या संकल्पनांच्या विकासाचा मागोवा घेता येऊ शकतो. भौतिकीच्या ज्ञानमंडळातर्फे मूलभूत भौतिकी, उपयोजित भौतिकी, खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व विश्वरचनाशास्त्र या विषयांच्या नोंदी तयार करणे अपेक्षित आहे.

या अनुषंगाने सदर विषयाची खालील दहा उपविभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे.
१. स्थितीगतीशास्त्र व वस्तूचे गुणधर्म
२. तरंग व दोलन
३. उष्मा व उष्मागतीकी
४. ध्वनी
५. विद्युत चुंबकत्व
६.न्युक्लीय व कण भौतिकी
७. आण्विक व रेणूभौतिकी
८.घन अवस्था भौतिकी
९. प्रकाशकी
१०. आंतरशाखीय भौतिकी
११.खगोलशास्त्र व खगोलभौतिकी
१२..विश्वरचनाशास्त्र व सापेक्षता
१३.पुंज भौतिकी
अर्थातच या उपविभागांचे अजून उप-उपविभाग आहेत. ह्या रचनेचे बलस्थान हे की त्यामुळे तुकड्या- तुकड्यातील ज्ञानाचा एकसंधपणा अधोरेखित होतो. अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या अथक संघर्षामुळेच भौतिकीच्या ज्ञानशाखांचा हा व्यासंग आपल्याला शक्य होतो आहे. त्यांचे ऋण मनी ठेवत भौतिकी विषयाबाबत उत्सुकता बाळगणाऱ्या सर्व जिज्ञासू वाचकांचे ज्ञानमंडळातर्फे मनःपूर्वक स्वागत!.

बोर मॅग्नेटाॅन (Bohr magneton)

बोर मॅग्नेटाॅन (Bohr magneton)

अणू आणि रेणूंमूळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र प्रामुख्याने इलेक्ट्रॉनांच्या गतीमुळे निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्या चुंबकीय आघूर्णाचे (magnetic moment) मूल्य ...
बोर सिद्धांत (Bohr theory)

बोर सिद्धांत (Bohr theory)

(बोर आणवीय प्रतिकृती; Bohr atomic model, बोर प्रतिकृती; Bohr model). अणूंची आणवीय संरचना, विशेषतः हायड्रोजन अणूची संरचना समजावून सांगण्याच्या हेतूने ...
बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी (Bose-Einstein statistic)

बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी (Bose-Einstein statistic)

पुंज सांख्यिकीमध्ये सरूप (समसमान, identical) बोसॉनांच्या (Boson) संहतींच्या विविध पुंज स्थितींमध्ये वंटन (distribution) करणाऱ्या सांख्यिकीला बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी असे म्हणतात. (परिवलनसंख्या ...
मघा नक्षत्र (Magha Asterism)

मघा नक्षत्र (Magha Asterism)

मघा नक्षत्र : नक्षत्र चक्रातील मघा हे १० वे नक्षत्र. मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी या तीन नक्षत्रांचा सिंह राशीत ...
महत्त्वाचे लघुग्रह (Notable Asteroids)

महत्त्वाचे लघुग्रह (Notable Asteroids)

महत्त्वाचे लघुग्रह : सूर्याला सर्वात जवळची कक्षा असलेला लघुग्रह: ‘(४३४३२६) २००४ जेजी ६’ हा लघुग्रह सूर्यापासून सर्वात जवळची कक्षा असणारा ...
मीटर (Metre)

मीटर (Metre)

मीटर (m) हे दोन स्थानांमधील अंतर मोजण्याचे मेट्रिक पद्धतीतील मुख्य एकक आहे. सामान्यपणे विज्ञानाच्या विविध शाखांमधील कामकाजात मीटर या एककाचा ...
मूळ नक्षत्र (Mool Asterism)

मूळ नक्षत्र (Mool Asterism)

मूळ नक्षत्र मूळ नक्षत्र हे नक्षत्रचक्रातील १९ वे नक्षत्र आहे. वृश्चिक राशीतील वृश्चिकाच्या (विंचवाच्या) शेपटातील नांगी म्हणजे मूळ नक्षत्र मानतात ...
मृगशीर्ष नक्षत्र (Mrigashīrsha Asterism)

मृगशीर्ष नक्षत्र (Mrigashīrsha Asterism)

मृगशीर्ष नक्षत्र : मृगशीर्ष हे नक्षत्रचक्रातील पाचवे नक्षत्र आहे. भारतीय नक्षत्रचक्रात मृगशीर्ष हे नक्षत्र मानले जाते, पूर्ण मृग तारकासमूह काही चंद्र-नक्षत्र ...
मेष (Aries)

मेष (Aries)

मेष : आयनिकवृत्ताच्या लगत, उत्तरेस असणारा हा एक तारकासमूह आहे. मेष ही राशीचक्रातील पहिली राशी मानली जाते. आकाशात मेष शोधताना त्यातील ...
राहू आणि केतू : पातबिंदू  (Nodes)

राहू आणि केतू : पातबिंदू  (Nodes)

राहू आणि केतू : पातबिंदू – राहू आणि केतू म्हटले की ग्रहणाची आठवण होते. राहू आणि केतू हे कोणी राक्षस ...
रोहिणी नक्षत्र (Rohini Asterism)

रोहिणी नक्षत्र (Rohini Asterism)

रोहिणी नक्षत्र : रोहिणी हे आयनिकवृत्तावरील एकूण २७ नक्षत्रचक्रातील चौथे नक्षत्र आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात रोहिणी (Aldebaran; Alpha Taurii) तारा हेच ...
लघुग्रह : नामकरण पद्धती (Asteroid : Naming system)

लघुग्रह : नामकरण पद्धती (Asteroid : Naming system)

लघुग्रहांचा शोध १९९८पर्यंत चार पायऱ्यांमध्ये नोंदवला जात असे. आकाशाच्या ठराविक भागाचे सातत्याने (दर दिवशी किंवा ठराविक कालावधीने एका माहीत असलेल्या ...
लघुग्रह (Asteroid)

लघुग्रह (Asteroid)

सेरीस (खगोलशास्त्र). (ॲस्टेरॉइड, प्लॅनेटॉइड, मायनर प्लॅनेट). लघु म्हणजे लहान आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहांना ‘लघुग्रह’ असे नाव आहे. स्वत:च्या गुरुत्वाकर्षणाखाली ...
लघुग्रह मोहिमा ( Asteroid expeditions)

लघुग्रह मोहिमा ( Asteroid expeditions)

लघुग्रह मोहिमा : इ.स. १९९० पासून अवकाशयानांनी विविध अंतरांवरून, कधी लघुग्रहांभोवती फेरी मारत, तर कधी प्रत्यक्ष उतरून लघुग्रहांना भेटी दिल्या आहेत, ...
लघुग्रह शोध (Asteroid : Discoveries)

लघुग्रह शोध (Asteroid : Discoveries)

(खगोलशास्त्र). लघुग्रह (ॲस्टेरॉइड; Asteroid) आकाराने लहान आणि सूर्यापासून सु. २२—५५ कोटी किमी. अंतरावरआहेत. ते स्वयंप्रकाशी नाहीत. दुर्बिणीचा शोध लागल्या नंतरही ...
लघुग्रह: क्यूपर पट्टा (Kuiper Belt)

लघुग्रह: क्यूपर पट्टा (Kuiper Belt)

लघुग्रह: क्यूपर पट्टा : नेपच्यूनच्या कक्षेबाहेर कक्षांची माध्यांतरे (Semi Major Axis) असणाऱ्या वस्तूंपैकी इ. स. १९३० ला सापडलेला प्लुटो (Pluto), ...
लघुग्रहांची कुटुंबे (Asteroids Families)

लघुग्रहांची कुटुंबे (Asteroids Families)

लघुग्रहांची कुटुंबे : मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान असलेल्या मुख्य पट्ट्यातील लघुग्रहांची अनेक ‘कुटुंबे’ अर्थात गट आहेत. लघुग्रहांच्या कक्षा, त्यांची ...
लघुग्रहांचे वर्णपटीय वर्गीकरण (Spectroscopic classification of Asteroids)

लघुग्रहांचे वर्णपटीय वर्गीकरण (Spectroscopic classification of Asteroids)

लघुग्रहांचे वर्णपटीय वर्गीकरण : लघुग्रहांचे वर्णपटीय विश्लेषणातून वर्गीकरण करून गट करण्यात येतात. त्यात सी(C), एस(S), (M)एम, एक्स(X) हे चार प्रमुख ...
लघुग्रहांच्या कक्षा, माध्यांतरे आणि त्यांचे समूह (Asteroid’s orbit, Semi Major Axis and their groups )

लघुग्रहांच्या कक्षा, माध्यांतरे आणि त्यांचे समूह (Asteroid’s orbit, Semi Major Axis and their groups )

लघुग्रहांच्या कक्षा, माध्यांतरे आणि त्यांचे समूह : लघुग्रहांचा मुख्य पट्टा मंगळ आणि गुरूच्या कक्षांच्या दरम्यान आहे. पण प्रत्येक लघुग्रहाची सूर्याभोवती ...
लेप्टॉन (Lepton)

लेप्टॉन (Lepton)

कणभौतिकीच्या मानक प्रतिकृतीनुसार (standard model) लेप्टॉन हे क्वार्कांप्रमाणेच मूलभूत कण आहेत. लेप्टॉन हे प्रबल आंतरक्रियाशील नसतात आणि अबल व विद्युतचुंबकीय ...