(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

टी. सी. शर्मा (T. C. Sharma)

टी. सी. शर्मा

शर्मा, तरुणचंद्र : (११ एप्रिल १९२९ – १७ नोव्हेंबर २०११). ईशान्य भारतात महत्त्वाचे संशोधन करणारे प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचा ...
ट्रॉय (Troy)

ट्रॉय

तुर्कस्तानातील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. सध्याचे हिसार्लिक. दार्दानेल्स सामुद्रधुनीच्या मुखापासून आग्नेयीस सु. साडेसहा किमी.वर ते वसले आहे. ट्रोजा, इलीऑन, ट्रोॲस, ...
डिकिका बालक (Dikika baby) Selam (Australopithecus)

डिकिका बालक

डिकिका बालक हे ३३ लक्ष वर्षांपूर्वीच्या एकाऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस जीवाश्म बालकाचे नाव आहे. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ झेरेसेनाय ऑलेमसागेड यांना या बालकाचे जीवाश्म ...
डेक्कन कॉलेज, पुणे (Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune)

डेक्कन कॉलेज, पुणे

अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त असलेली भारतातील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था. संस्थेची स्थापना ‘द हिंदू कॉलेजʼ या नावाने मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर ...
डेनिसोव्हा मानव (Denisovan)

डेनिसोव्हा मानव

पुरातन मानवी जाती. आधुनिक मानवांच्या उत्क्रांतीची कहाणी फक्त ⇨निअँडरथल वआधुनिक मानव या दोन समूहांपुरती मर्यादित नाही हे अलीकडेच लक्षात आले ...
डेव्हिड क्लार्क (David L. Clarke)

डेव्हिड क्लार्क

क्लार्क, डेव्हिड लिओनार्ड : (३ नोव्हेंबर १९३७ – २७ जून १९७६). नवपुरातत्त्व विचारधारेचे अग्रणी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील केंट ...
तप्तदीपन (प्रदीपन) कालमापन पद्धती (Thermoluminescence dating)

तप्तदीपन

पुरातत्त्वामध्ये उत्खननात सापडणार्‍या अवशेषांत भाजलेल्या मातीच्या अनेक वस्तू सापडतात. त्यांच्या कालमापनासाठी उपयोगी पडणारी ही भौतिकी-रासायनिक पद्धती आहे. या पद्धतीला औष्णिक ...
त्वांग बालक (Taung Child)

त्वांग बालक

त्वांग बालक हे दक्षिण आफ्रिकेत ‘त्वांगʼ या ठिकाणी मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस जीवाश्माचे नाव आहे. हा जीवाश्म २५ लक्ष वर्षांपूर्वीचा आहे ...
दमनिसी (Dmanisi)

दमनिसी

जॉर्जियातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ जॉर्जियाची राजधानी तबलिसी येथून नैर्ऋत्येला ८५ किमी. अंतरावरील गवताळ प्रदेशातील सिल्क रोड व्यापारी ...
दाभोळ (Dabhol)

दाभोळ

महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्टी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर मुखापाशी असून येथे प्रामुख्याने मध्ययुगीन अवशेष मिळाले ...
दायमाबाद (Daimabad)

दायमाबाद

महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ताम्रपाषाणयुगीन सावळदा संस्कृती ते जोर्वे संस्कृती या दरम्यानच्या सांस्कृतिक कालखंडांची सलग माहिती येथे मिळत असल्याने, ...
देशी पुरातत्त्व (Indigenous Archaeology)

देशी पुरातत्त्व

देशी पुरातत्त्व ही संज्ञा एकविसाव्या शतकातील पुरातत्त्वविद्येमध्ये बदलत्या सैद्धांतिक भूमिकांचे द्योतक आहे. देशी पुरातत्त्व ही पुरातत्त्वाची एक उपशाखा नसून तो ...
द्वारका (Dwarka)

द्वारका

गुजरातमधील एक सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि हिंदूंचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ते गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात (२०१३ पूर्वीचा जामनगर जिल्हा) आहे ...
नलेदी मानव (Homo naledi)

नलेदी मानव

एक विलुप्त मानवी जाती. दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतातील रायझिंग स्टार गुहांमधील दिनलेदी (Dinaledi) या गुहेच्या एका पोकळीत (चेंबर) अनपेक्षितपणे १५५० ...
नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्व

नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्वाचा कालखंड : (१९५०–१९९०). विविध उत्खनने, जगाच्या निरनिराळ्या भागांत सांस्कृतिक क्रमाचे आकलन आणि प्रागितिहास व ...
नागरी पुरातत्त्व (Urban Archaeology)

नागरी पुरातत्त्व

पुरातत्त्वविद्येच्या नागरी पुरातत्त्व या शाखेत शहरांचा पुरातत्वीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास केला जातो. या शाखेचा मुख्य भर नगरांचा आणि नागरीकरणाचा पुरातत्त्वीय ...
निअँडरथल मानव (Homo neanderthalensis)

निअँडरथल मानव

निअँडर नदीच्या खोऱ्यातील मानव. सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी सेपियन मानव म्हणजे आधुनिक मानव जातीचा उदय झाला त्या वेळी इरेक्टस या ...
नीरनम (नेलकिंडा) (Niranam) (Nelcynda)

नीरनम

केरळमधील एक प्राचीन मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. ग्रीक व रोमन व्यापारी केरळच्या मलबार किनाऱ्याला डमिरीका असे म्हणत असत. इ.स. पहिल्या शतकातील ...
नौकांचे पुरातत्त्व 

जमिनीत सापडलेल्या नौकांचे पुरातत्त्व हे नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. अपघातग्रस्त होणे, मुद्दाम बुडवल्या जाणे, रेतीत रुतणे अशा ...
न्यायसाहाय्यक  पुरातत्त्वविज्ञान (Forensic Archaeology)

न्यायसाहाय्यक  पुरातत्त्वविज्ञान

आधुनिक पुरातत्त्वाची तुलनेने अलीकडच्या काळात विकसित झालेली एक उपशाखा. जे. आर. हंटर यांनी या विषयाचा घेतलेला पहिला आढावा १९९४ मध्ये ...