(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

पॅरान्थ्रोपस (Paranthropus)

पॅरान्थ्रोपस

पॅरान्थ्रोपस  हे मानवी उत्क्रांतीमधील एका पराजातीचे नाव. हे मानवसदृश प्राणी सुमारे २६ लक्ष ते १४ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. पॅरान्थ्रोपस ...
पॅरान्थ्रोपस रोबस्टस (Paranthropus Robustus)

पॅरान्थ्रोपस रोबस्टस

पॅरान्थ्रोपस रोबस्टस ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. या प्रजातीचा शोध प्रिटोरियाच्या ट्रान्सवाल संग्रहालयात संशोधन करणारे पुरामानवशास्त्रज्ञ रॅाबर्ट ब्रूम (१८६६-१९५१) ...
पॉल-एमिल बोटा (Paul-Émile Botta)

पॉल-एमिल बोटा

बोटा, पॉल-एमिल : (६ डिसेंबर १८०२ – २९ मार्च १८७०). विख्यात पुरातत्त्वज्ञ आणि  फ्रेंच मुत्सद्दी. त्यांचा जन्म रोजी इटलीतील ट्युरिन ...
पोटॅशियम-अरगॉन कालमापन पध्दती (The potassium-argon dating)

पोटॅशियम-अरगॉन कालमापन पध्दती

पोटॅशियम-अरगॉन ही कालमापनाची पद्धत कार्बन-१४ कालमापन पद्धती प्रमाणेच किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित आहे. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा (Isotopes) वापर करून कालमापन ...
पोर्ट रॉयल (Port Royal)

पोर्ट रॉयल

पोर्ट रॉयल हे वेस्ट इंडीजमधील जमैका या छोट्या देशातील एक बंदर होते. सध्या हे समुद्रात बुडालेले पुरातत्त्वीय स्थळ जमैकाची राजधानी ...
प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व

प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा कालखंड : प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा (Post-Processual Archaeology) उगम १९८० नंतर प्रक्रियावादी पुरातत्त्वाला विरोध म्हणून झाला. एक प्रकारे ही नवपुरातत्त्वाच्या ...
प्रायोगिक पुरातत्त्व (Experimental Archaeology)

प्रायोगिक पुरातत्त्व

पुरातत्त्वामधील विविध सिद्धांतकल्पना पडताळून पाहणे व निष्कर्ष काढणे यासाठी प्रत्यक्ष प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनाला प्रायोगिक पुरातत्त्व असे म्हणतात ...
प्रिन्सेस रॉयल (Princess Royal)

प्रिन्सेस रॉयल

लक्षद्वीपमधील प्रसिद्ध प्रिन्सेस रॉयल जहाज. लक्षद्वीप बेटसमूहातील बंगारम हे एक वस्ती नसलेले छोटे प्रवाळ बेट अगाट्टी बेटापासून आठ किमी. अंतरावर ...
फिलीप मेडोज टेलर (Philip Meadows Taylor)

फिलीप मेडोज टेलर

टेलर, फिलीप मेडोज (२५ सप्टेंबर १८०८ – १३ मे १८७६). प्रसिद्ध ब्रिटिश अँग्लो- इंडियन साहित्यिक, कादंबरीकार, पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ. त्यांचा ...
फ्रान्स्वा बोर्डे (François Bordes)

फ्रान्स्वा बोर्डे

बोर्डे, फ्रान्स्वा : (३० डिसेंबर १९१९ – ३० एप्रिल १९८१). फ्रेंच भूवैज्ञानिक, प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि फ्रान्सिस कारसॅक या टोपणनावाने विज्ञानकथा ...
फ्रेडेन्सबोर्ग (Fredensborg)

फ्रेडेन्सबोर्ग

पाण्यात बुडलेले एक गुलामवाहक जहाज. नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाच्या इतिहासात फ्रेडेन्सबोर्ग या गुलामांची वाहतूक करणाऱ्या जहाजाच्या संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे. याचे ...
फ्लूरीन (फ्ल्युओरीन) कालमापन पद्धती (Fluorine Dating)

फ्लूरीन

पुरातत्त्वातील सापेक्ष कालमापनाची एक रासायनिक पद्धती. या पद्धतीमुळे प्राचीन हाडांमधील विशिष्ट घटकांचे विश्लेषण करून त्यांचा काळ ठरविता येतो. हजारो वर्षांपूर्वी ...
फ्लोरेस मानव (Homo floresiensis)

फ्लोरेस मानव

इंडोनेशिया येथील एक पुरातन मानवी जाती. इंडोनेशियातील फ्लोरेस या बेटावर सन २००३ मध्ये लिआंग बुआ (Liang Bua) या गुहेत एका ...
बंकरचे पुरातत्त्व (Bunker Archaeology)

बंकरचे पुरातत्त्व

बंकर म्हणजे तळघर अथवा आश्रयासाठी जमिनीखाली बनवलेली जागा. बंकरचे चक्रीवादळांपासून बचाव करण्यासाठी बनवलेली तळघरे, सैनिकांना राहण्यासाठी अथवा युद्धसामग्री लपवून ठेवण्यासाठीचे ...
बंदिछावण्यांचे पुरातत्त्व (Internment Camp Archaeology)

बंदिछावण्यांचे पुरातत्त्व

बंदिछावण्यांचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक भाग आहे. एका अथवा अनेक माणसांना एकाच ठिकाणी बंदिवासात ठेवणे म्हणजेच डांबून ठेवणे ...
बी. के. थापर (B. K. Thapar)

बी. के. थापर

थापर, बी. के. : (२४ नोव्हेंबर १९२१ – ६  सप्टेंबर १९९५). ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे माजी महासंचालक. त्यांचा ...
बी. सुब्बाराव (B. Subbarao)

बी. सुब्बाराव

सुब्बाराव, बेंडापुडी : (१९२१ — २९ मे १९६२).  प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील वॅाल्टेअर (विशाखापट्टनम) येथे झाला. सुब्बाराव ...
बेट द्वारका (Bet Dwarka)

बेट द्वारका

गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ. परंपरेने कृष्णचरित्राशी जोडले गेलेले हे बेट ‘बेट शंखोधरʼ या नावानेही ओळखले जाते ...
बोखिरा (Bokhira)

बोखिरा

गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यात पोरबंदर शहरापासून पाच किमी. अंतरावर आहे. गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील ...
बोडो मानव (Homo bodoensis)

बोडो मानव

पुरामानववैज्ञानिकांनी मानवी जीवाश्मांतील नव्याने सुचवलेली परंतु सर्वमान्य न झालेली एक जाती. इथिओपियात आवाश नदीच्या खोऱ्यात बोडो डी`आर (Bodo D`ar) या ...