(प्रस्तावना) पालकसंस्था : डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे | समन्वयक : सुषमा देव | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

अधोजल पुरातत्त्व (Underwater Archaeology)

अधोजल पुरातत्त्व (Underwater Archaeology)

पुरातत्त्वाची एक शाखा. त्यात पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन केले जाते. ही शाखा तुलनेने नवी असून विसाव्या शतकाच्या अखेरच्या चार ...
अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्व (Underwater Prehistoric Archaeology)

अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्व (Underwater Prehistoric Archaeology)

पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन. प्रागैतिहासिक पुरातत्त्वात अशी एक सर्वसाधारण समजूत आहे की, एकेकाळी खंडांचे जे भाग उघडे होते त्या ...
अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धती (Argon-Argon Dating Methods)

अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धती (Argon-Argon Dating Methods)

किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची पद्धत. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा वापर करून कालमापन करण्याची ही एक पद्धत असून पोटॅशियम-अरगॉन कालमापन ही ...
अरिकामेडू (Arikamedu)

अरिकामेडू (Arikamedu)

भारतातील पुदुच्चेरी (पाँडिचेरी) या केंद्रशासित प्रदेशात असलेले एक प्रसिद्ध मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पुदुच्चेरी शहरापासून सहा किमी. अंतरावर अरियानकुप्पम ...
अहाड (बनास संस्कृती) Ahar (Banas Culture)

अहाड (बनास संस्कृती) Ahar (Banas Culture)

भारतीय ताम्रपाषाण युगातील एक महत्त्वाची संस्कृती. राजस्थानमधील बनास आणि भेडच नदीच्या काठी ही उदयास आली. याच नदीच्या काठी असणाऱ्या अहाड ...
आत्मा प्रकाश खत्री (ए. पी. खत्री) (A.P. Khatri)

आत्मा प्रकाश खत्री (ए. पी. खत्री) (A.P. Khatri)

खत्री, आत्मा प्रकाश : (८ एप्रिल १९३२–१७ नोव्हेंबर २००४). विख्यात प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि पुरामानवशास्त्रज्ञ.  त्यांचा जन्म बवहाळपूर (पाकिस्तान) येथे झाला ...
आद्य-पुराश्मयुग (Lower Palaeolithic)

आद्य-पुराश्मयुग (Lower Palaeolithic)

पुरातत्त्वशास्त्रात मानवी इतिहास हा स्थूलमानाने तीन कालखंडांत विभागला गेला आहे. या काळात मानवाला लेखनकला अवगत नव्हती. त्यामुळे पुरातत्त्वीय अवशेष हे ...
आंद्रे लेरॉ-गुर्हान (André Leroi-Gourhan)

आंद्रे लेरॉ-गुर्हान (André Leroi-Gourhan)

लेरॉ-गुर्हान, आंद्रे : (२५ ऑगस्ट १९११ – १९ फेब्रुवारी १९८६). आंद्रे लेऑ-गुह्हा.  विसाव्या शतकातील महत्त्वाच्या प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञांपैकी एक. पुरातत्त्वीय सिद्धांत ...
आधुनिक काळाचे पुरातत्त्व (Archaeology of Modern Period)

आधुनिक काळाचे पुरातत्त्व (Archaeology of Modern Period)

आधुनिक काळाचे पुरातत्त्व या शाखेची संशोधन पद्धत सर्वसाधारणपणे ऐतिहासिक व मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वासारखी आहे. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट आधुनिक काळातील ...
आधुनिक पुरातत्त्वविद्या : पायाभरणी

आधुनिक पुरातत्त्वविद्या : पायाभरणी

सतराव्या शतकापासून जवळजवळ दोन शतके पुराणवस्तू जमवण्याच्या छंदासाठी का असेना, अनेक धाडशी प्रवाशांनी, वसाहतवादी युरोपीय सत्तांनी, सैनिकी व मुलकी अधिकाऱ्यांनी ...
आधुनिक पुरातत्त्वविद्या : प्रारंभिक वाटचाल

आधुनिक पुरातत्त्वविद्या : प्रारंभिक वाटचाल

आधुनिक पुरातत्त्वविद्येची प्रारंभिक वाटचाल : (१८५०–१९५०). एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर आधुनिक पुरातत्त्वविद्येचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होत असताना प्रामुख्याने दोन घटना घडून आल्या: ...
आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व (Salvage Archaeology)

आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व (Salvage Archaeology)

पुरातत्त्वीय अवशेषांच्या अभ्यासासाठीची एक उपाययोजना पद्धती. ही पुरातत्त्वाची स्वतंत्र शाखा नसून विकासकामांमुळे सांस्कृतिक अथवा पुरातत्त्वीय अवशेष नष्ट होण्याचा धोका उत्पन्न ...
आर्डीपिथेकस (Ardipithecus)

आर्डीपिथेकस (Ardipithecus)

मानवी उत्क्रांतीशी संबधित प्रायमेट गणातील नामशेष झालेली एक प्रजाती. या प्रजातीत आर्डीपिथेकस रमिडस (Ardipithecus ramidus) आणि आर्डीपिथेकस कडाबा (Ardipithecus kadabba) ...
इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज (Indian Society for Prehistoric and Quaternary Studies)

इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज (Indian Society for Prehistoric and Quaternary Studies)

भारतासह आशिया खंडातील प्रागितिहासाचा विशेष अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेली संस्था. भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व परिषद ही संस्था ...
इतिहास (History)

इतिहास (History)

इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण ...
इयन हॉडर (Ian Hodder)

इयन हॉडर (Ian Hodder)

हॉडर, इयन रिचर्ड : (२३ नोव्हेंबर १९४८). समकालीन पुरातत्त्वीय सिद्धांताच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रभाव असणारे आणि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचे अग्रणी, ब्रिटिश ...
इरावती कर्वे (Irawati Karve)

इरावती कर्वे (Irawati Karve)

कर्वे, इरावती दिनकर : (१५ डिसेंबर १९०५–११ ऑगस्ट १९७०). विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका. मानवशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि ...
इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन (Electron Spin Resonance-ESR)

इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन (Electron Spin Resonance-ESR)

इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन ही पुरातत्त्वात वापरली जाणारी पद्धत सर्वसाधारणपणे तप्तदीपन पद्धतीप्रमाणेच आहे. निक्षेपातील पदार्थ किंवा खडकांच्या रचनेतील जालकांमध्ये (lattice) साठलेल्या ...
उत्क्रांतिवादी पुरातत्त्व (Evolutionary Archaeology)

उत्क्रांतिवादी पुरातत्त्व (Evolutionary Archaeology)

पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्याची एक पद्धती. चार्ल्स डार्विन (१८०९—१८८२) या निसर्गशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने जीवविज्ञानाखेरीज सामाजिक विज्ञानाच्या अनेक ज्ञानशाखांवर मोठा ...
एफ. आर. अल्चिन (F. R. Allchin)

एफ. आर. अल्चिन (F. R. Allchin)

अल्चिन, फ्रँक रेमंड : (९ जुलै १९२३–४ जून २०१०). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडनच्या हॅरो या उपनगरात झाला. रेमंड ...