(प्रस्तावना) पालकसंस्था : रचना संसद, मुंबई | समन्वयक : स्मिता गीध | संपादकीय सहायक : वर्षा देवरुखकर
सर्वच समाजव्यवस्थांमध्ये विविध पातळ्यांवर दृश्यकलांसबंधात निर्मिती व व्यवहार होत असतात. चित्रकला व शिल्पकला यांसारख्या कलांना स्थूलमानाने दृश्यकला असे म्हणता येते. त्या कला प्रामुख्याने दृश्यस्वरूपात दृग्गोचर होतात. कलाकृती आणि कलाकार यांपलीकडे जाऊन आशय व्यक्त करण्याचे माध्यम, त्याचे तंत्र, कलाकृती घडविण्यामागचा हेतू, शैली, प्रांत, प्रदेश, राज्य, देश, खंड अशा क्रमाने व्यापक पातळीवर जाऊन आकलन होणे आवश्यक असते.

दृश्यकलेचे शिक्षण, संवर्धन व जतन यांचे शास्त्र, अभ्यासपद्धती, दृश्यकलेचा इतिहास व तत्त्वज्ञान, संबंधित व्यक्ती व समाज अशा अनेक घटकांचा विचार ही कला समजावून घेताना करावा लागतो. याबरोबरीनेच धर्म, राजकीय विचारसरणी, आर्थिक, नैतिक, सामाजिक, जीवनविषयक दृष्टिकोन व तत्त्वज्ञान अशा गोष्टींचा संबंध दृश्यकलांशी येत असतो. त्यामुळे कलाकृती व त्यांची निर्मिती यांना विस्तृत असा सांस्कृतिक व सामाजिक अर्थ प्राप्त होतो. त्याचप्रमाणे साहित्य, संगीत, नृत्य-नाट्य, चित्रपट आदी ललित आणि प्रयोगीय कलांचा दृश्यकलांशी संबंध निर्माण होऊन या सर्वच कला अधिक सकस व आशयघन होतात. हे मुद्दे दृश्यकला समजावून घेताना लक्षात घेणे गरजेचे असते.

अशा कलाव्यवहाराची जडणघडण व्यक्ती, समूह, समाज, देश, संस्कृती अशा अनेक परिघांमध्ये होत असते. त्यामुळे भौगोलिक स्थिती, स्थानिक वातावरण यांसारख्या गोष्टींचा प्रत्यक्ष –अप्रत्यक्षरीत्या तसेच मानवी समाजातील अनेक व्यवहारांचा कलाव्यवहारावर तात्कालिक आणि दूरगामी परिणाम होत राहतो. उदाहरणार्थ धर्मश्रद्धा, धर्मप्रसार, व्यापार, आक्रमणे, युद्ध, प्रवाशांचे वृत्तांत अशा अनेक मार्गांनी विविध संस्कृतींचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित होत असतो. यातूनही विविध संस्कृतीतील कलांचा एकमेकांशी संबंध येतो आणि एकमेकांवर प्रभावही पडतो. दृश्यकला या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हे लक्षात घेऊन सदर ज्ञानमंडळाच्या या स्वतंत्र संकेतस्थळावर चित्रकला आणि शिल्पकलाविषयक नोंदी आहेत. सोयीसाठी या विषयाचे दहा विभाग करण्यात आले आहेत: १. कलाकृतींचे प्रकार आणि निकष यांवर आधारित वर्गीकरण २. भूखंडानुरूप वर्गीकरण ३. काळानुरूप वर्गीकरण ४. कलाकृती संच ५. कलाकृतींसंबधीच्या संकल्पना ६. दृश्यकला व इतर ज्ञानशाखांचा आंतरसंबंध ७. चित्रकार आणि शिल्पकार – चरित्र आणि योगदान ८. दृश्यकला शैली ९. दृश्यकला व्यवहार (Art-practice) १०. दृश्यकला आणि समाज.

वडार देव्हारा : चित्रकला

वडार देव्हाऱ्यावरील चित्रकला : गावगाड्याच्या परिघाबाहेर भटक्या जातिजमाती हजारो वर्षे समाजाकरिता विविध भूमिका बजावताना दिसतात. त्यांतील वडार ही एक कष्टकरी ...
वारली चित्रकला (Warali Painting)

वारली चित्रकला

महाराष्ट्रातील वारली आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला. या जमातीचे लोक त्यांच्या घरातील भिंतींना चित्रांनी सजवतात. या चित्रांना वारली चित्र म्हणून ओळखले जाते ...
विनायक पांडुरंग करमरकर (Vinayak Pandurang Karmarkar)

विनायक पांडुरंग करमरकर

करमरकर, विनायक पांडुरंग : (२ ऑक्टोबर १८९१ – १३ जून १९६७). वास्तववादी शैलीत दर्जेदार स्मारकशिल्पे घडविणारे आधुनिक काळातील एक ख्यातकीर्त ...
विनायक शिवराम मसोजी (Vinayak Shivram Masoji)

विनायक शिवराम मसोजी

मसोजी, विनायक शिवराम : (२४ जानेवारी १८९७ – २९ एप्रिल १९७७). विख्यात मराठी चित्रकार. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे एका ख्रिस्ती ...
शुष्क भित्तिलेपचित्रण (Secco-Fresco)

शुष्क भित्तिलेपचित्रण

मासे घेतलेल्या कोळ्याचे चित्र, अक्रोतिरी, मिनोअन संस्कृती. भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील एक पद्धती. हे मध्ययुगीन व आरंभिक प्रबोधनकाळातील चित्रणाचे माध्यम होते ...
शेखावती चित्रे (Shekhawati Painting)

शेखावती चित्रे

राजस्थानातील एक प्रसिद्ध चित्रशैली. शेखावती ह्या स्थानावरून ह्या चित्रशैलीला हे नाव मिळाले. शेखावती हे स्थान सांप्रतच्या राजस्थानातील सीकर आणि झुनझुनू ...
शोरापूर चित्रशैली (Shorapur paintings )

शोरापूर चित्रशैली

भारतीय लघुचित्रशैलींतील एक महत्त्वाची शैली. या शैलीस ‘सुरपूर लघुचित्रे’ (Surpur Miniature Arts) असेही म्हणतात. दख्खनमधील हैदराबाद येथे चित्रशैलीच्या दोन शाखा ...
संभाजी सोमाजी कदम (Sambhaji Somaji Kadam)

संभाजी सोमाजी कदम

कदम, संभाजी सोमाजी : (५ नोव्हेंबर १९३२–१५ मे १९९८). महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्तिचित्रकार, आदर्श शिक्षक, कवी, कलासमीक्षक, सौंदर्यमीमांसक व संगीताचे अभ्यासक ...
सार्द्र भित्तिलेपचित्रण (Buon Fresco)

सार्द्र भित्तिलेपचित्रण

धार्मिक विधीच्या देखाव्याचे भित्तिचित्र, पाँपेई, इटली भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील एक पद्धती. या पद्धतीला खरे (True) भित्तिलेपचित्रण अथवा सार्द्र भित्तिलेपचित्रण असेही ...
सैयद हैदर रझा (Sayed Haider "S. H." Raza)

सैयद हैदर रझा

रझा, सैयद हैदर : (२२ फेब्रुवारी १९२२ – २३ जुलै २०१६). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बाबरिया ...
Loading...