चित्तप्रसादन (Chittaprasadana)

चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय. योगसाधनेमध्ये चित्ताची एकाग्रता साधत असताना जे घटक चित्ताला एकाग्रतेपासून विचलित…

प्रत्याहार (Pratyahara)

‘प्रत्याहार’  या  शब्दाची फोड प्रति + आ + हृ अशी आहे. ‘हृ’ या धातूचा अर्थ ‘हरण करणे’ असा आहे. प्रति आणि आ हे दोन उपसर्ग आहेत. प्रति म्हणजे ‘विरुद्ध’ तर…

सुदर्शन तलाव (Sudarshan Lake)

गुजरातमधील जुनागढ येथील गिरनारजवळील प्रसिद्ध प्राचीन तलाव. इ. स. पू. चौथ्या शतकापासून ते इ. स. पाचव्या शतकापर्यंत या जलाशयाची सातत्याने काळजी घेतली गेली, हे विशेष. अद्यापि अवशेष स्वरूपात हे स्थळ…

Read more about the article धारचा किल्ला (Dhar Fort)
दर्शनी तटबंदी,धारचा किल्ला.

धारचा किल्ला (Dhar Fort)

मध्य प्रदेश राज्यातील धार शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीवर बांधलेला इतिहासप्रसिद्ध किल्ला. इंदूरपासून सु. ७५ किमी. अंतरावर असलेले हे ठिकाण मध्ययुगीन कालखंडात ‘माळवा’ प्रांतात समाविष्ट होते. मध्ययुगीन कालखंडातील ९ व्या शतकाच्या…

Read more about the article कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग (Kanakdurg and Fattedurg)
कनकदुर्ग.

कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग (Kanakdurg and Fattedurg)

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले. कनकदुर्ग हा किल्ला हर्णे गावापासून १.५ किमी. अंतरावर असलेल्या हर्णे बंदराजवळ आहे. किल्ला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असून गडाची उंची समुद्रसपाटीपासून फक्त ७ मी. आहे.…

Read more about the article सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)
सुवर्णदुर्ग

सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला असून बंदर ते किल्ला हे अंतर एक किमी. आहे. मोटरबोटीने २५ मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. किल्ल्याचे क्षेत्रफळ ४.५…

Read more about the article बाणकोट (हिम्मतगड) (Bankot Fort)
दोन बुरुजांमधील मुख्य दरवाजा, बाणकोट.

बाणकोट (हिम्मतगड) (Bankot Fort)

महाराष्ट्रातील शिवपूर्वकालीन किल्ला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून ३५ किमी. अंतरावर हा किल्ला असून पश्चिम किनाऱ्यावरील सावित्री नदीच्या मुखावर एका उंच भूशिरावर तो वसलेला आहे. हिम्मतगड तसेच फोर्ट व्हिक्टोरिया…

योगीराज वाघमारे ( Yogiraj Waghamare )

वाघमारे, योगीराज : (१ ऑक्टोबर १९४३). योगीराज देवराव वाघमारे. ज्येष्ठ दलित कथाकार, कादंबरीकार, नाटककार, बालसाहित्यकार म्हणून सर्वपरिचित. जन्म येरमाळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण जन्मगावी अत्यंत…

माझा लढा (Mein Kampf / My Struggle)

जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व जर्मनीचा हुकूमशाह ॲडॉल्फ हिटलर (१८८९–१९४५) याचे आत्मचरित्र. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत निर्माण झालेल्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर या ग्रंथाचे लेखन झाले. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा नामुष्कीजनक पराभव झाला. त्यामुळे…

त्रिआनॉनचा तह (Treaty of Trianon)

पहिल्या महायुद्धातील (१९१४–१९१८) पराभवानंतर हंगेरीचा विजेत्या राष्ट्रांशी झालेला तह (४ जून १९२०). महायुद्धात इंग्लंडच्या नेतृत्वाखालील गटाचा विजय होऊन जर्मनीच्या गटाचा पराभव झाला. या युद्धातील विजेत्या राष्ट्रांनी युद्धोत्तर जगाची पुनर्रचना करण्यासाठी…

भूकंपरोधक इमारतींची गुणवत्ता (Quality of earthquake resistant buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना ३२ भूकंपादरम्यान इमारतींच्या सुरक्षिततेसाठी त्यांची गुणवत्ता अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामादरम्यान प्रत्येक बाबीच्या गुणनियंत्रणाकडे अतिशय बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. असे न केल्याने इमारतीमधील एखादी…

एरिक हॉब्सबॉम (Eric John Ernest Hobsbawm)

हॉब्सबॉम, एरिक : (९ जून १९१७ – १ ऑक्टोबर २०१२) सुप्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार आणि मार्क्सवादी विचारवंत. त्यांचा जन्म लिओपोल्ड पर्सी हॉब्सबॉम आणि नेली ह्या पोलिश यहुदी दांपत्यापोटी इजिप्त मधील अलेक्झांड्रिया…

फ्रिटझ फिशर (Fritz Fischer)

फिशर, फ्रिटझ : (५ मार्च १९०८ – १ डिसेंबर १९९९). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार. त्यांचा जन्म जर्मनीतील बव्हेरीया प्रांतातील लुडविगस्टॅड येथे मॅक्स आणि एमिली फिशर ह्या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील रेलरोड…

उत्क्रांतिवादी पुरातत्त्व (Evolutionary Archaeology)

पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्याची एक पद्धती. चार्ल्स डार्विन (१८०९—१८८२) या निसर्गशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने जीवविज्ञानाखेरीज सामाजिक विज्ञानाच्या अनेक ज्ञानशाखांवर मोठा प्रभाव टाकला. पुरातत्त्वविद्याही त्याला अपवाद नाही. मानवी संस्कृतीच्या अभ्यासात उत्क्रांतीच्या…

Read more about the article पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान (Archaeoparasitology)
आइया इरिनी येथील ट्रायचुरिस ट्रायचुरा सूत्रकृमीचे रोमन कालखंडातील दफनामधून मिळालेले अंडे.

पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान (Archaeoparasitology)

पुरातत्त्वीय पुराव्यांमध्ये मिळणाऱ्या परोपजीवींचा अभ्यास करण्याची पद्धती. मानव आणि मानवेतर प्राण्यांत अनेक प्रकारचे परोपजीवी आढळतात. इतर सजीवांचा वापर करून जे सजीव आपले अन्न मिळवतात त्यांना परोपजीवी (parasite) असे म्हणतात. त्यांचा…