पर्जन्यजल साठवण (Rainwater harvesting)

जलसंधारणाची एक साधी व सोपी पद्धत. पावसाचे पाणी (पर्जन्यजल) जलप्रस्तरापर्यंत पोहोचण्याआधी शास्त्रीय पद्धतीने ते साठविणे म्हणजे पर्जन्यजल साठवण. अशा साठविलेल्या पाण्याचा उपयोग अन्य स्रोतांपासून मिळालेल्या पाण्याला पूरक म्हणून केला जातो.…

परिसंस्था (Ecosystem)

पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक…

परिमैत्रीपूर्ण (Ecofriendly)

परिमैत्रीपूर्ण ही संज्ञा परिसंस्थापूरक या अर्थाने मानवी वर्तनाला, कृतीला किंवा उत्पादनांना लावली जाते. या संज्ञेतून पृथ्वीवरील सजीवांना अपाय होणार नाही, परिसंस्थेतील कोणत्याही घटकावर दुष्परिणाम होणार नाही, असे मानवी वर्तन किंवा…

परिपर्यटन (Ecotourism)

निसर्गपर्यटनाचा पर्यावरणपूरक असा एक पर्यटन प्रकार. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्टया मानवी जीवनाशी अत्यंत संकीर्णपणे जोडलेला आणि सर्व प्रकारच्या सेवांवर आधारित पर्यटन हा आधुनिक उद्योग आहे. पर्यटनाचा हेतू, त्याचे…

नागवेली (Betal leaf)

नागवेली ही वनस्पती पायपरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पायपर बिटल आहे. तिला पानवेल, विड्याची पाने किंवा खाण्याची पाने असेही म्हणतात. मिरी ही वनस्पतीही याच कुलातील आहे. नागवेली वनस्पती भारत,…

नागरी परिसंस्था (Urban ecosystem)

मानवाने वसविलेली शहरे, नगरे आणि नागरी पट्ट्यातील पारिस्थितिकीय प्रणाली म्हणजे नागरी परिसंस्था होय. नगरांची उपनगरे व झालर क्षेत्रे तसेच नागरी पट्ट्यांलगतची कृषिक्षेत्रे आणि नैसर्गिक भूदृश्यांचाही समावेश नागरी परिसंस्थेत होतो. नागरी…

नागरमोथा (Cypriol)

नागरमोथा हे एकदलिकित क्षुप सायपरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सायपरस स्कॅरिओसस आहे. भारतात मध्य प्रदेशातील वनांत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. पाणथळ जागेत नागरमोथ्याचे झुडूप २–३ मी.…

नाग (Cobra)

सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील फणा असलेल्या विषारी सापांना सामान्यपणे नाग म्हणतात. आफ्रिका आणि दक्षिण व आग्नेय आशिया (फिलिपीन्ससह) या सर्व प्रदेशांत नाग आढळतात. ते वेगवेगळ्या अधिवासांत राहतात मात्र झाडांवर ते…

नाक (Nose)

नाक हे माणसाच्या चेहऱ्या वर मध्यभागी असलेले एक इंद्रिय आहे. गंधज्ञानासाठी आणि श्वासोच्छ्वासासाठी नाक उपयोगी असते. शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी नाक एक इंद्रिय असून श्वसनसंस्थेतील एक भाग आहे. प्राणिसृष्टीत नाक ही…

नाइटिंगेल (Nightingle)

शीळ घालणारा एक लहानसा पक्षी. पॅसेरीफॉर्मिस गणाच्या म्युसिकॅपिडी कुलात नाइटिंगेलचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव ल्युसीनिया मेगॅऱ्हिंकस आहे. सामान्यपणे उन्हाळ्यात तो यूरोप आणि पश्चिम आशियात दिसतो, तर हिवाळ्यात तो आफ्रिकेत…

नवलकोल (Kohlrabai)

दैनंदिन आहारातील एक भाजी. नवलकोल ही वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया प्रकार कॉलोरॅपा आहे. ती दिसायला कोबीसारखी दिसते. मात्र तिच्यावर कोबीप्रमाणे पाने नसतात. कोबीप्रमाणेच ही भाजी…

नर-वानर गण (Primates)

स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील एक गण. या गणात नर (माणूस), वानर, माकड, कपी इ. प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये उच्च दर्जाचे अनुकूलन घडून आलेले आहे.नर-वानर गणातील प्राण्यांमध्ये आदिम अपरास्तनी प्राण्यांचे,…

नरक्या (Ghanera)

नरक्या हा मध्यम आकाराचा वृक्ष आयकॅसिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव नोथॅपोडाईट्स निम्मोनियाना आहे. या वृक्षाचा वास अत्यंत घाणेरडा असल्याने त्याला घाणेरा असेही नाव आहे. तो मूळचा चीनमधील आहे. भारतात…

नदी परिसंस्था (River ecosystem)

गोड्या पाण्याची एक परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त व्यापक आहे. जल परिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था व खाऱ्या पाण्याची परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे…