भाष्य (Bhashya)

भाष्य : स्वाभाविकपणे एखाद्या विषयाचे विवरणपूर्वक वर्णन करणे, अर्थ विस्ताराने सांगणे म्हणजे भाष्य होय.संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून बरेच शास्त्रीय ग्रंथ लिहिले गेले.निरनिराळ्या शास्त्रांमधील हे ग्रंथ सूत्ररूपात म्हणजेच संक्षिप्त, सारगर्भ वाक्यांच्या…

प्रातिशाख्य ग्रंथ (Pratishakhya Granth)

प्रातिशाख्य ग्रंथ : वेदमंत्रांच्या उच्चारणशास्त्राशी संबंधित एका प्राचीन ग्रंथ प्रकाराचे नाव. या ग्रंथांमध्ये वेदांच्या प्रत्येक शाखेशी संबंधित उच्चारणाबद्दलचे निरनिराळे नियम एकत्रित केलेले आहेत. वेदांच्या संहिता तयार झाल्यावर त्या काळात संहितेचा…

उणादिसूत्रे (Unadisutre)

उणादिसूत्रे : संस्कृत भाषेमध्ये साधित शब्द दोन प्रकारे तयार होतात. धातूला  प्रत्यय लागून साधलेले शब्द व नामाला  प्रत्यय लागून साधलेले शब्द. हे ते दोन प्रकार होत.त्यातील धातूला प्रत्यय लावून साधलेल्या…

संधी (Sandhi)

संधी : संधी हे संस्कृत भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संधी याचा शब्दशः अर्थ 'जोड' असा होतो. दोन वर्ण एकमेकांना जोडून उच्चारले जाताना अनेकदा उच्चारण-सौकर्यासाठी त्यांच्यात काही बदल घडून येतात.…

संहिता (Sanhita)

संहिता : संहिता हा शब्द सम्-उपसर्गपूर्वक धा-धातूला क्त-प्रत्यय लागून बनलेला आहे. व्युत्पत्तीनुसार या शब्दाचा अर्थ 'एकत्र ठेवणे' असा होतो. व्याकरण-परंपरेमध्ये प्रस्तुत शब्द संज्ञा अर्थात् सांकेतिक अर्थाने वापरताना हा व्युत्पत्त्यर्थ स्वीकारलेलाच…

अशोक रामचंद्र केळकर (Ashok Ramchandra Kelkar)

केळकर,अशोक रामचंद्र  : (२२ एप्रिल १९२९ - २० सप्टेंबर २०१४). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञानाबरोबरच आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा या तिन्ही दृष्टीने साहित्याचा सखोल विचार त्यांनी त्यांच्या लेखन - संशोधनातून केला…

नारायण गोविंद कालेलकर (Narayan Govind Kalelkar)

कालेलकर, नारायण गोविंद : (११ डिसें. १९०९- ३ मार्च १९८९). प्रसिद्ध भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञान या नव्या विज्ञानशाखेचा परिचय सोप्या मराठीत करून देणाऱ्या नामवंत लेखकांपैकी एक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यात बांबुळी येथे. शिक्षण…

मधुराविजयम् (Madhuravijayam)

मधुराविजयम् : दक्षिण भारतातील विजयनगर घराण्याच्या ऐतिहासिक महाकाव्यांमधील एक महत्त्वाचे संस्कृत काव्य.गंगादेवी (गंगाम्बिका) या स्त्री कवयित्रीने हे काव्य रचले आहे.मधुरेवर अर्थात मदुरा नगरीवर आपल्या पराक्रमी नवऱ्याने मिळवलेल्या विजयाची कथा तिने…

अविमारकम् (Avimarakam)

अविमारकम् : भासलिखित संस्कृत नाटक. भासाची बहुतांश नाटके रामायण व महाभारत ह्या उपजीव्य महाकाव्यांमधील कथांवर आधारित आहेत.ह्या नाटकाची कथा मात्र वेगळी आहे. अविमारकम्ची मूळ कथा परंपरेने चालत आलेली आख्याने, पुराणकथा…

संदेश रासक (Sandesh Rasak)

संदेश रासक : अब्दुल रहमान या मुसलमान कवीने तेराव्या शतकात लिहिलेले दूतकाव्य. अपभ्रंश भाषेतील २२३ कडवकांचे हे काव्य तीन प्रक्रमांत (भाग) विभागलेले आहे. अपभ्रंश भाषेत प्रायः जैन मुनी आणि कवींनी…

विश्वगुणादर्शचम्पू (Visvagunadarsacampu)

विश्वगुणादर्शचम्पू : वेंकटाध्वरी यांनी लिहिलेली विश्वगुणादर्शचम्पू चम्पूवर्गातील एक संस्कृत कलाकृती.भौगोलिकदृष्टया हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. चम्पूरचनांप्रमाणेच याही रचनेत गद्य व पद्याचे मिश्रण दिसते. वेंकटाध्वरी हा आत्रेय गोत्राचा सर्वशास्त्रपारंगत विद्वान असून…

वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति (Vaidyanath Prasad Prashasti)

वैद्यनाथ प्रासाद प्रशस्ति : देवकुमारिका ह्या स्त्री कवयित्रीने रचलेले संस्कृत काव्य (रचनाकाळ इ.स. १७१६). १८ वे शतक हा कवयित्रीचा कालखंड. ती चित्तोड येथील राणा अमरसिंहांची पत्नी, राणा जयसिंहांची सून आणि…

हस्तलिखित संरक्षणशास्त्र (Manuscript protectionism)

हस्तलिखित संरक्षणशास्त्र : हस्तलिखित ग्रंथ हा सांस्कृतिक ठेवा असल्याने त्यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे.आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात त्यातील मजकुराच्या इलेक्ट्रॉनिक प्रती करणे सहज शक्य आहे, तरीही परंपरेच्या स्पर्शाची अनुभूती केवळ…

हस्तलिखितांची साधने (Tools Of Manuscripts)

हस्तलिखितांची साधने : आदिममानवाने भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी चित्र काढण्यास सुरवात केली. चित्रांची लिपी अपुरी पडल्यावर तो अक्षरलिपीकडे वळला. महत्त्वाच्या घटना दीर्घकालीन व्हाव्यात या अपेक्षेने लेखनाची टिकाऊ साधने माणसाने शोधली. आपण लिहिलेला…

कुमारपाल प्रतिबोध (Kumarpal Pratibodh)

कुमारपाल प्रतिबोध : (कुमारवाल पडिबोहो). महाराष्ट्री प्राकृत ग्रंथ. या ग्रंथाला जिनधर्म प्रतिबोध असेही म्हणतात. इ.स. १२ व्या शतकात जैन आचार्य सोमप्रभसूरी यांनी या ग्रंथाची रचना केली. आचार्य सोमप्रभसूरी हे संस्कृत…