निवटी (Mudskipper)

एक आगळावेगळा सागरी अस्थिमासा. पर्सिफॉर्मिस गणातील गोबिडी कुलात निवटी (किंवा निवटा) या माशाचा समावेश होतो. जगभर निवटी माशांच्या दहा प्रजाती आढळतात. पेरिऑफ्‌थॅल्मस अर्जेंटिनीलिनिएटस असे शास्त्रीय नाव असलेली जाती बहुधा सर्वत्र…

निशिगंध (Tuberose)

सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. निशिगंध ही वनस्पती अगेव्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पॉलिअँथस ट्युबरोझा आहे. भारतात रजनीगंधा या नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची दक्षिण यूरोप आणि…

निसर्गोपचार (Naturopathy)

निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी व निसर्गानुकूल, औषधविरहित उपचार पद्धती अशीही निसर्गोपचाराची व्याख्या करतात. निसर्गोपचार पद्धती ही एक पर्यायी उपचार पद्धती आहे.…

नीलगाय (Nilgai)

नीलगाय गोकुलातील प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस आहे. प्रौढ नराचा रंग निळसर राखाडी (निळसर करडा) असल्यामुळे त्याला ‘नीलगाय’ नाव पडले आहे. त्याच्या नावात जरी ‘गाय’ असले, तरी हा…

निळा मोहर (Jacaranda)

सुंदर व निळ्या आकर्षक फुलांसाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. निळा मोहर हा वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव जॅकरंदा मिमोसिफोलिया आहे. तो मूळचा ब्राझील आणि अर्जेंटिना येथील आहे. भारतात…

नीळ (Indigo)

नीळ हा रंग ज्या झुडपापासून काढतात ती वनस्पतीही नीळ याच नावाने ओळखली जाते. नीळ वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इंडिगोफेरा टिंक्टोरिया आहे. ती मूळची आशियातील आहे, परंतु आफ्रिकेत…

नेपती (Bare caper)

एक लहानसे झुडूप किंवा वृक्ष. नेपती ही वनस्पती कॅपॅरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅपॅरिस डेसिड्युआ आहे. तिला कर्डा किंवा करीर अशीही नावे आहेत. आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशियाच्या शुष्क प्रदेशांत…

नैसर्गिक संसाधने (Natural resources)

मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे, खनिज तेल, वनस्पती यांचाही समावेश…

न्यूक्लिइक आम्ले (Nucleic acids)

सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणुभाराचे जैव रेणू. रासायनिक दृष्ट्या न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल (डीएनए) आणि रिबोन्यूक्लिइक आम्ल (आरएनए). १८६९ मध्ये फ्रेडरिक मिशर याने…

पंडा (Panda)

पंडा या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील आयल्युरिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव आयल्युरस फुलगेन्स आहे. त्याला तांबडा पंडक किंवा पँडा असेही म्हणतात. पंडा हा वृक्षवासी असून आयल्युरस प्रजातीतील…

पचन संस्था (Digestive System)

अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था. आदिजीव, छिद्री आणि आंतरदेहगुही या संघांत वेगळी पचन संस्था नसते. मात्र, या संघापेक्षा उच्च संघातील प्राण्यांच्या शरीरात पचन संस्था आढळून येते. पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ती अतिशय…

पटकी (Cholera)

मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यामुळे या रोगाचा फैलाव होतो. या रोगाला…

पॉल अर्लिक (Paul Ehrlich)

अर्लिक, पॉल : (१४ मार्च १८५४ – २० ऑगस्ट १९१५). जर्मन वैद्यक शास्त्रज्ञ. त्यांनी विशेषत: रक्तशास्त्र (Hematology), रोगप्रतिकारशास्त्र (Immunology),  रसायनोपचार (Chemotherapy) आणि उपदंशाच्या (syphilis) परिणामकारक चिकित्सेच्या शोधाबद्दल मूलभूत काम केले.…

समास (Compounding)

समास : संस्कृतव्याकरणात कृदन्त, तद्धितान्त, समास, एकशेष, सनाद्यन्त धातु या पाच वृत्ती सांगितल्या आहेत. अवयव-पदांच्या अर्थाहून भिन्न असा अर्थ प्रतिपादित करणारी ती वृत्ती होय. या वृत्तिंपैकी समास हा शब्द सम्…