आधुनिक पुरातत्त्वविद्या : पायाभरणी

सतराव्या शतकापासून जवळजवळ दोन शतके पुराणवस्तू जमवण्याच्या छंदासाठी का असेना, अनेक धाडशी प्रवाशांनी, वसाहतवादी युरोपीय सत्तांनी, सैनिकी व मुलकी अधिकाऱ्यांनी जगभरातल्या सांस्कृतिक इतिहासात रस घेतला आणि त्यामधून पुरातत्त्वीय अभ्यासाला प्रारंभ…

आधुनिक पुरातत्त्वविद्या : प्रारंभिक वाटचाल

आधुनिक पुरातत्त्वविद्येची प्रारंभिक वाटचाल : (१८५०–१९५०). एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर आधुनिक पुरातत्त्वविद्येचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होत असताना प्रामुख्याने दोन घटना घडून आल्या: पहिली घटना म्हणजे जुझेप्पे फिओरेल्ली (१८२३–१८९६) या इटालियन पुरातत्त्वज्ञाने पोम्पेईचे…

आंतरराष्ट्रीय कायदा (International Law)

आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे “ढोबळमानाने आंतरराष्ट्रीय समुदायातील सभासदांच्या परस्परसंबंधांवर बंधनकारक ठरणारी काही तत्त्वे आणि काही विशिष्ट नियम यांचे संकलन होय”. सर हेन्री मेन यांच्या मते, “आंतरराष्ट्रीय कायदा ही अनेक घटकांनी बनलेली…

सिरॅमिक्स (Ceramics)

निसर्गात आढळणाऱ्या मातकट व अतिसूक्ष्मकणी द्रव्यांना सिरॅमिक म्हणजे मृत्तिका म्हणतात. मर्यादित प्रमाणात पाणी मिसळल्यास सिरॅमिक आकार्य (Plastic) होते म्हणजे त्याला हवा तो आकार देता येतो. त्याचे पुष्कळ गुणधर्म त्यांच्यातील कणांच्या…

लेपन (Coating)

एखाद्या वस्तूच्या किंवा घटकाच्या पृष्ठभागावर आच्छादलेल्या धातू, अधातू किंवा मिश्रधातूंच्या थरास लेपन किंवा आवरण (Coating) म्हणतात. हे थर वस्तूच्या पृष्ठभागावर प्रामुख्याने संरक्षण किंवा सजावटीच्या हेतूने आच्छादले जातात. काही ठिकाणी या…

Read more about the article तप्त संक्षारण (Hot Corrosion)
आ. : तप्त संक्षारण दरावरील तापमानाचा प्रभाव [१]

तप्त संक्षारण (Hot Corrosion)

तप्त संक्षारण ही क्रिया प्रामुख्याने  गॅस टरबाइन, डीझेल एंजिन, उष्णोपचार भट्टी किंवा दूषित उष्ण वायूंच्या संपर्कात येणाऱ्या उपकरणांमधे आढळून येते. उच्च तापमानास रासायनिक विक्रिया होऊन, इंधनात कधीकधी समाविष्ट असलेली व्हॅनेडियम…

ऑक्सिडीकरणाच्या वेगाचे नियम (Oxidation Rate Laws)

ऑक्सिडीकरण ही कोणत्याही उच्च किंवा सामान्य तापमानास घडणारी धातूंच्या गंजण्याची विक्रिया असून हिच्यात धातू व वातावरणातील ऑक्सिजन यांची रासायनिक विक्रिया होते. या रासायनिक विक्रियेतून वेगवेगळी ऑक्साइडे, सल्फाइडे आणि कार्बाइडे निर्माण…

Read more about the article जस्त : शोध आणि उत्पादन (Zinc : Invention and Production)
जस्ताच्या उत्पादनाची प्राचीन भारतीय पद्धत

जस्त : शोध आणि उत्पादन (Zinc : Invention and Production)

तांबे आणि जस्त यांचे मिश्रधातू  म्हणजे पितळ (Brass). इ. स. पू. १५०० च्या सुमारास वापरात असलेल्या पितळी वस्तू हडप्पा संस्कृतीतील लोथल येथे केलेल्या उत्खननात मिळालेल्या आहेत. या वस्तूंमधील जस्ताचे प्रमाण…

दिल्ली लोहस्तंभ (Delhi Iron Pillar)

नवी दिल्ली येथील कुतुब संकुलात अनेक स्मारके आहेत. त्यांपैकी ‘कुव्वतुल इस्लाम’ ही मशीद महत्त्वपूर्ण आहे. गेली सोळाशे वर्षे न गंजता उभा असलेला दिल्ली लोहस्तंभ म्हणजे प्राचीन काळात भारतीय कारागिरांनी धातुशास्त्रात…

बडीशेप (Fennel)

एक सुगंधी वनस्पती. बडीशेप ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फीनिक्युलम व्हल्गेर आहे. कोथिंबीर, ओवा आणि गाजर या वनस्पतीही एपिएसी कुलातील आहेत. बडीशेप मूळची भूमध्य समुद्राच्या प्रदेशातील असून…

बडिश मीन (Angler fish)

अस्थिमत्स्य वर्गाच्या लोफिइफॉर्मिस गणातील १८ कुलांमधील सागरी माशांना सामान्यपणे बडिश मीन म्हणतात. जगात सर्वत्र त्यांच्या सु. ३२० जाती आहेत. त्यांपैकी काही जाती समुद्रतळाशी, काही २-३ किमी. खोलीवर तर काही समुद्राच्या…

Read more about the article बटाटा (Potato)
Die Europäische Kommission hat Amflora, die gentechnisch optimierte Stärkekartoffel der BASF, für die kommerzielle Nutzung in Europa genehmigt. Damit kann die Kartoffel für die Erzeugung industrieller Stärke eingesetzt werden. Amflora, BASF's genetically optimized starch potato, has been approved by the European Commission for commercial application in Europe. The potato can now be used for the production of industrial starch.

बटाटा (Potato)

बटाटा ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम ट्यूबरोजम आहे. मिरची, वांगी व टोमॅटो या वनस्पतीही याच कुलात मोडतात. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारी बटाटा ही एक…

बगळा (Egret)

बगळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पेलिकॅनिफॉर्मिस (बक) गणाच्या आर्डीइडी कुलात केला जातो. जगात बगळ्यांच्या सु. ६४ जाती आढळतात. उष्ण प्रदेशात त्यांच्या जाती अधिक दिसून येतात. बगळ्याची मान, पाय आणि बोटे लांब व…

बकुळ (Bullet wood)

बकुळ हा सदाहरित वृक्ष सॅपोटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मिम्युसॉप्स एलेंगी आहे. चिकू व मोह हे वृक्षदेखील सॅपोटेसी कुलातील आहेत. दक्षिण आणि आग्नेय आशिया तसेच उत्तर ऑस्ट्रेलिया या खंडांतील…

पुराजीवविज्ञान (Paleontology)

प्राचीन काळातील म्हणजे होलोसीन कालखंडाच्या सुरुवातीपर्यंत (सु. ११,७०० वर्षांपूर्वी) अस्तित्वात असलेले प्राणी, वनस्पती आणि अन्य सजीवांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो, त्या शाखेला पुराजीवविज्ञान म्हणतात. या शाखेत पृथ्वीवर जीवन कसे…