Read more about the article कुलशेखरपट्टणम (Kulasekharapattinam)
मनप्पाडू येथील दगडी नांगर.

कुलशेखरपट्टणम (Kulasekharapattinam)

तमिळनाडूतील एक मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे तमिळनाडूतील थुथूकुडी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर थिरूचेंदूरच्या दक्षिणेस १४ किमी. अंतरावर आहे. कुलशेखरपट्टणम हे प्राचीन बंदर असून ते करामनाइयार नदीच्या मुखापाशी उत्तर तीरावर आहे. कुलशेखरपट्टणम हे…

सामाजिक भूगोल (Social Geography)

मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. या शाखेत मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली नाही. त्याच प्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक भूगोलशास्त्रांचे स्वरूप आणि व्याप्ती…

बायबलची मराठी भाषांतरे (Marathi Translations of the Bible)

व्हॅटिकनच्या धर्मपीठाने जेज्वीट धर्मगुरूंना १६१५ साली बायबलचे देशी भाषांत अनुवाद करण्याची परवानगी दिली होती. यूरोपमधील जेज्वीट धर्मगुरूंनी तिचा लाभ घेतला नाही. मात्र इंग्लंडहून महाराष्ट्रात आलेले फादर थॉमस स्टीफन्स यांनी त्या…

सरहद्द (Frontier) 

एका देशाचा दुसऱ्या देशाच्या नजीकचा क्षेत्रविभाग किंवा दोन देशांचा एकमेकांशी भिडणारा प्रदेश म्हणजे सरहद्द होय. सरहद्दीला लांबी व रुंदी असते. सीमेइतकी सरहद्द निश्चित नसते. दोन देश किंवा प्रदेश यांच्या मर्यादा…

साऊँ पाउलू शहर (Sao Paulo City)

ब्राझीलमधील साऊँ पाउलू राज्याच्या राजधानीचे ठिकाण आणि देशातील अग्रेसर औद्योगिक केंद्र. ब्राझीलमधील तसेच दक्षिण अमेरिकेतील हे सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी हे एक आहे. ब्राझीलच्या आग्नेय…

तिसऱ्या / द्विपुटी (Bivalves)

मृदुकाय (Mollusca) संघातील शिंपाधारी (Bivalvia) वर्गात तिसऱ्याचा समावेश होतो. सर्व गोड्या व खाऱ्या पाण्यात असणाऱ्या शिंपल्यामधील मृदुकाय सजीवांना तिसरी किंवा तिसऱ्या असे नाव आहे. दोन समान किंवा समान आकाराच्या शिंपल्यामध्ये…

राफेल एरिझरी (Rafael Irizarry)

एरिझरी, राफेल : (१९७१ -) प्युरेतो रिको या देशात जन्मलेले, आणि आता अमेरिकन नागरिक असलेले गणितज्ञ एरिझरी हार्वर्ड येथील टी. एच. चान सार्वजनिक आरोग्य शाळेत जीवसंख्याशास्त्र आणि संगणितीय जीवशास्त्र विभागात,…

मध्य-अटलांटिक रिज (Mid-Atlantic Ridge)

अटलांटिक महासागराच्या जवळजवळ मध्यावर उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली जगातील सर्वाधिक लांबीची सागरी रिज (पर्वतरांग). अटलांटिक महासागरच्या सागरतळावर पसरलेली ही रिजप्रणाली पृथ्वीवरील सर्वांत मोठी भूशास्त्रीय रचना आहे. उत्तरेस ८७° उ. अक्षांशापासून (उत्तर…

मूलपेशी / मूळ पेशी (Stem cells)

बहुपेशीय सजीवांतील अविकसित अथवा अर्धविकसित मूलपेशींपासून (Stem cells) शरीरातील बहुतेक सर्व प्रकारच्या पेशी निर्माण होतात. पेशी वंशामधील त्या सर्वांत प्राचीन पेशी असल्याने त्यांना मूलपेशी असे नाव देण्यात आले आहे. यास मूळ पेशी…

क्षिप्रा नदी (Kshipra River)

भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी चंबळ नदीची एक उपनदी. ती शिप्रा या नावानेही ओळखली जाते. तिची लांबी सुमारे २४० किमी. आहे. तिच्या द्रुतगती प्रवाहामुळे तिला क्षिप्रा (जलद वाहणारी) असे म्हटले…

बायबलच्या अभ्यासपद्धती (Bible Studies)

बायबल हाती घेतले की, अभ्यासू वाचकांच्या नजरेसमोर दोन व्यक्तिमत्त्वे उभी राहतात; ती म्हणजे चार्ल्स डार्विन (१८०९–८२) आणि गॅलिली गॅलिलीओ (१५६४–१६४२). देवाने सहा दिवसांत विश्वाची निर्मिती केली, असे बायबलच्या ‘उत्पत्ती’ (Genesis)…

आरोह पर्जन्य (Convectional Rainfall)

वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे पडणाऱ्या पावसाला ‘आरोह पर्जन्य’ किंवा ‘अभिसरण पर्जन्य’ असे म्हणतात. सौर प्रारणामुळे भूपृष्ठ तप्त झाल्यास निकटवर्ती थरातील आर्द्र हवा गरम होऊन हलकी होते. त्यामुळे स्वाभाविकच वातावरणात अभिसरण…

पेशीद्रव्य (Cytoplasm)

पेशीद्रव्य (पेशीद्रव) हे एक पेशीअंगक आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांची शरीरे एक वा अनेक पेशींनी बनलेली आहेत. सर्व पेशींमध्ये जीवद्रव्य (Protoplasm) असते. दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये (Eukaryotic cells) केंद्रक आणि पेशीद्रव्य यांना मिळून…

रानभाज्या (Vegetables from the Wild)

शेतात लावल्या जाणाऱ्या वानसजाती बोटावर मोजण्याइतक्याच असल्याने अशा वेळी जंगलातून जमा केल्या जाणाऱ्या वनस्पती अन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत ठरतो. उन्हाळ्यात फळांची विविधता असते, तर पावसाळ्यात विपुल प्रमाणात मिळत असलेल्या अनेक रानभाज्या…

झाडाची साल (वल्क) (Bark of a Tree)

वनस्पतीचे खोड आणि मूळ यांच्या बाह्य आवरणाला साल म्हणतात. जून्या झाडाच्या सालीच्या आतील आवरणात जिवित ऊती असतात, मात्र बाह्य आवरणातील म्हणजेच खोडावरील ऊती मृत अवस्थेत असतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या झाडाला…