चलित्र नियंत्रण केंद्र (Motor Control Centre, MCC)

वीज वितरण प्रणालीमध्ये चलित्र नियंत्रण केंद्राची भूमिका : चलित्र नियंत्रण केंद्र हे कारखान्यातील एका विभागातील चलित्र आरंभीचा (Combination Starters) भौतिक गट असतो. त्यामुळे चलित्रांचे नियंत्रण करणे सोपे जाते. 1950 च्या…

वसंत रणछोडदास गोवारीकर (Vasant Ranchhodadas Govariker)

गोवारीकर, वसंत रणछोडदास : (२५ मार्च १९३३ ते २ जानेवारी २०१५) वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कोल्हापूरमध्ये घेतले आणि पुढच्या शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठातून…

अद्वितीय सहस्रदल पद्मकमळ (An Unique Thousand Petal Lotus)

सहस्रदल पद्म हे पद्मकमळाचा एक कृषिप्रकार (कल्टीव्हर) आहे. याचा समावेश निलंबोनेसी या वनस्पती कुटुंबात होतो. निलंबो या प्रजातींमुळे या कुटुंबाला निलंबोनेसी हे नाव प्राप्त झाले. निलंबो या शब्दाची उत्पत्ती निलंबी…

बीटी कीटकनाशके (Bt Pesticides)

बीटी कीटकनाशके एकात्मिक कीड नियंत्रणातील (integrated pest management) महत्त्वाचे जैविक घटक आहेत. बॅसिलस थुरिंजेन्सिस (Bacillus thuringiensis; Bt) या जमिनीतील जीवाणूपासून मिळणारी कीटकनाशके अनेक प्रकारच्या किडींविरुद्ध काम करतात. या जीवाणूंचे नैसर्गिक…

कालेवाला (Kalevala)

कालेवाला : फिनिश लोकमहाकाव्य. फिनलंड या देशामध्ये त्यास राष्ट्रीय महाकाव्याचा दर्जा आहे. त्यास त्याचे आजचे स्वरूप एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाले. पेशाने वैद्यक असलेला एल्यास लनरॉट (१८०२-१८८४) हा या महाकाव्याचा संकलक…

अश्व अक्षांश (Horse Latitudes)

पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धातील उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याला उद्देशून ‘अश्व अक्षांश’ असे संबोधले जाते. दोन्ही गोलार्धांत ३०° ते ३५° या अक्षवृत्तांदरम्यान जास्त वायुभाराचे पट्टे निर्माण होत असतात. सूर्याचे भासमान भ्रमण…

प्रत्यावर्त (Anticyclone)

वातावरणात जेव्हा एखाद्या ठिकाणी निर्माण झालेल्या जास्त भाराच्या केंद्राकडून सभोवतालच्या कमी भाराच्या प्रदेशाकडे चक्राकार वारे वाहतात, तेव्हा त्या वातावरणीय आविष्काराला ‘प्रत्यावर्त’ किंवा ‘अपसारी चक्रवात’ या संज्ञा वापरल्या जातात. आवर्ताप्रमाणेच प्रत्यावर्त…

आवर्त (Cyclone)

वातावरणातील तीव्र कमी भाराच्या केंद्राभोवती सभोवतालच्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून मोठ्या प्रमाणावर चक्राकार वारे वाहतात, त्या आविष्काराला वातावरणविज्ञानात ‘आवर्त’ किंवा चक्रवात, अभिसारी चक्रवात, चक्री वादळ या संज्ञांनी संबोधले जाते. चक्रवाताचे दोन…

जे. एच. फ्राइडमन (J. H. Friedman) 

फ्राइडमन, जे. एच. :  (२९ डिसेंबर १९३९ - ) अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील यरेका येथे जेरोम फ्राइडमन यांचा जन्म झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. चिको राज्य महाविद्यालयात दोन वर्षे अध्ययन…

बॅक नदी (Back River)

कॅनडाच्या अगदी उत्तर भागातून वाहणारी नदी. तीला ग्रेट फिश नदी या नावानेही ओळखले जाते. या नदीची लांबी ९७५ किमी. असून पाणलोट क्षेत्र १,०६,००० चौ. किमी. आहे. या नदीचा उगम ग्रेट…

रॉबर्ट कॅम्बल (Robert Campbell)

कॅम्बल, रॉबर्ट (Campbell, Robert) : (२१ फेब्रुवारी १८०८ – ९ मे १८९४). कॅनडियन समन्वेषक, फरचा व्यापारी आणि शेतकरी. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लेन लायन/पर्थशर येथे झाला. त्यांना उत्तर अमेरिकेतील सरहद्द प्रदेशात…

जियानक्विन्ग फॅन (Jianquing Fan)

फॅन, जियानक्विन्ग : (१९६२ -) फॅन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून संख्याशास्त्रात पीएच्.डी. प्राप्त केली. १९८९ ते २००३ नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ, चॅपेल हिल (North Carolina University, Chapel Hill) येथे सहाय्यक, सह…

युंगफ्राऊ शिखर (Jungfrau Peak)

स्वित्झर्लंडमधील बर्नीज आल्प्स या निसर्गसुंदर पर्वतश्रेणीतील एक प्रसिद्ध शिखर. या शिखराची उंची ४,१५८ मी. आहे. या शिखराच्या उत्तरेस बर्न कँटन, तर दक्षिणेस व्हॅले (व्हालस) कँटन आहे. वायव्येकडील इंटरलाकन आणि आग्नेयीकडील…

गिरिपिंड (Massif)

गिरिपिंड हा भूकवचाचा एक भाग असून त्याच्या सुस्पष्ट सीमा विभंगांनी (तड्यांनी) निश्चित झालेल्या असतात. म्हणजे तो विभंगांनी सीमाबद्ध झालेला असतो. अशा प्रकारच्या संरचनेतून तयार झालेल्या पर्वर्तांच्या गटालाही गिरिपिंड म्हणतात. भूकवचाचा…

गरजते चाळीस (Roaring Forties)

गरजते चाळीस ही एक लोकप्रिय नाविक संज्ञा असून ती ४०° ते ५०° अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या वादळी सागरी प्रदेशांसाठी वापरतात. ही संज्ञा बहुदा दक्षिण गोलार्धाच्या संदर्भात वापरतात. या प्रदेशांत जवळजवळ पूर्णपणे…