मोबील उपसागर (Mobile Bay)
अटलांटिक महासागरातील मेक्सिकोच्या आखाताचा एक फाटा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अॅलाबॅमा राज्यात या उपसागराचा विस्तार झालेला आहे. नैर्ऋत्य भागात उपसागराचा निर्गममार्ग असून त्याद्वारे हा उपसागर मेक्सिकोच्या आखाताशी जोडलेला आहे. या निर्गमद्वाराच्या…