भाग ३ : पांगारा ते लाजाळू
डॉ. हेमचंद्र प्रधान
प्रस्तावना

पांगारा ते लाजाळू

विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग तिसरा पांगारा ते लाजाळू (सु. २५१ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.

जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.

रोहिश गवत (Rosha grass)

रोहिश गवत

रोहिश गवत (सिंबोपोगॉन मार्टिनाय ) एक तैलयुक्त गवत. रोहिश वनस्पतीला रोजा गवत अथवा रोशा गवत असेही म्हणतात. पोएसी कुलातील या ...
रोहू (Rohu)

रोहू

गोड्या पाण्यातील एक मासा. रोहू माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव लबिओ रोहिटा आहे. सायप्रिनिडी ...
ऱ्‍होडोडेंड्रॉन (Rhododendron)

ऱ्‍होडोडेंड्रॉन

आवृतबीजी फुलझाडांच्या एरिकेसी कुलातील एक प्रजाती. या प्रजातीमध्ये सु. १००० जाती असून या वनस्पतींमध्ये उंची, आढळ, फुलांचे रंग आणि उपयोग ...
लवंग (Clove)

लवंग

लवंग ही वनस्पती मिर्टेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव यूजेनिया कॅरिओफायलाटा (सायझिजियम ॲरोमॅटिकम) आहे. ती मूळची इंडोनेशियातील मोलूकू बेटांवरील असून ...
लसीका संस्था (Lymphatic system)

लसीका संस्था

लसीका संस्था ही शरीरातील अभिसरण संस्थेचा एक भाग आहे. अभिसरण संस्थेचे दोन भाग मानले जातात; (१) हृद्‌संवहनी संस्थेद्वारे रक्ताचे अभिसरण ...
लसूण (Garlic)

लसूण

लसूण ही बहुवर्षायू वनस्पती ॲमारिलिडेसी कुलाच्या ॲलिऑयडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲलियम सटायव्हम आहे. कांदा, खोरट व चिनी कांदा ...
लाख कीटक (Lac insect)

लाख कीटक

लाख कीटकांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील हेमिप्टेरा गणाच्या केरिडी कुलात होतो. त्यांच्या स्रावापासून लाख हा पदार्थ मिळतो. याच कुलातील ...
लाख वनस्पती (Grass pea)

लाख वनस्पती

लाख वनस्पती (लॅथिरस सॅटिव्हस) : पाने व फुलांसहित वनस्पती लाख वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॅथिरस सॅटिव्हस आहे ...
लाजवंती (Loris)

लाजवंती

एकटा राहणारा, भित्रा आणि लाजाळू सस्तन प्राणी. लाजवंती प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील प्रोसिमिआय उपगणाच्या लोरिसिडी कुलात केला जातो ...
लाजाळू (Sensitive plant)

लाजाळू

एक परिचित स्पर्शसंवेदी झुडूप. लाजाळू वनस्पती फॅबेसी कुलाच्या मिमोझेसी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मिमोजा पुडिका आहे. मिमोजा प्रजातीत सु ...
लांडगा (Wolf)

लांडगा

लांडगा (कॅनिस ल्युपस) एक सस्तन प्राणी. लांडग्याचा समावेश स्तनी वर्गाच्या कॅनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस आहे ...