विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग तिसरा पांगारा ते लाजाळू (सु. २५१ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलॅची उपवर्गातील हायपोट्रेमॅटा गणात रे माशांचा समावेश होतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळणाऱ्या डॅसिॲटिडी मत्स्य कुलातील एका रे माशाला ...
पाण्याच्या पृष्ठाबाहेर काही वेळ तरंगणारा एक सागरी मासा. अस्थिमत्स्य वर्गाच्या बेलॉनिफॉर्मिस गणाच्या एक्झॉसीटिडी कुलात त्याचा समावेश होतो. या कुलातील माशांना ...
पाडळ या पानझडी वृक्षाचा समावेश बिग्नोनिएसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव स्टेरिओस्पर्मम चेलोनॉइडिस आहे. बिग्नोनिया चेलोनॉइडिस, बिग्नोनिया सॉव्हिओलन्स, स्टेरिओस्पर्मम ...
एक पाणपक्षी. पाणकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पेलिकनीफॉर्मिस गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलात होतो. जगात या पक्ष्याच्या सु. ४० जाती आहेत. भारतीय उपखंडात लहान ...
मासे पकडणारा एक पाणपक्षी. पक्षिवर्गाच्या पेलिकॅनीफॉर्मिस गणाच्या पेलिकॅनिडी कुलात पाणकोळी या पक्ष्याचा समावेश होतो. जगात सर्वत्र त्याच्या ७८ जाती आहेत ...
पाणघोडा (हिप्पोपोटॅमस अँफिबियस) एक सस्तन प्राणी. पाणघोड्याचा समावेश समखुरी गणाच्या हिप्पोपोटॅमिडी कुलात करतात. हिप्पोपोटॅमस हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा ...
पानफुटी (ब्रायोफायलम पिनॅटम): पाने पानफुटी ही क्रॅसुलेसी कुलातील बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ब्रायोफायलम पिनॅटम आहे. ती कलांचो पिनॅटा ...