(प्रस्तावना) पालकसंस्था : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे | समन्वयक : सुनीला गोंधळेकर | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
तमिळ, ग्रीक, लॅटिन, संस्कृत, हिब्रू, चायनीज, अरेबिक या जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त अभिजात भाषा होत. त्या भाषांमधील प्राचीन साहित्य हे अभिजात वाङ्मय आहे. अभिजात ही संकल्पना तशी नवीन आहे. ‘जुने ते सोने’ हे समजून आता आपण या भाषा आणि त्यातील साहित्याकडे एक मूल्यवान ठेव म्हणून पाहात आहोत.

कला आणि साहित्यासाठी ‘अभिजात’ ही संकल्पना युरोपीय खंडात पहिल्यांदा वापरली गेली. मध्ययुगात व यूरोपीय प्रबोधनकाळात अभ्यसनीय व अक्षर अशा साहित्यकृतींना व साहित्यिकांना अभिजात मानण्यात आले. ‘अभिजात’ या संज्ञेचा उपयोग, भाषा या शब्दाचे विशेषण म्हणून, ऑल्स जेलियस यांनी इ.स.च्या दुसऱ्या शतकात प्रथम केला. इ.स.पू. सु. ८५० ते ३ रे शतक या कालखंडातील होमर, हेसिअड, पिंडर इ. कवी, नाटककार, सॉक्रेटीस, प्लेटो, अॅंरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञ व साहित्यशास्त्रकार या सर्वांनी प्राचीन ग्रीक साहित्य संपन्न केले. अभिजाततावादाला अभिप्रेत असणारे आदर्शानुकरण व संकेतपालन हे विशेष प्रथम लॅटिन साहित्यात (इ.स.पू. २४० ते इ.स. ५००) दिसतात.

अभिजात शब्द अभिजन या संकल्पनेशी संबंधित आहे. भव्यता, उदात्त मूल्य, अभ्यासपूर्णता आणि नियमबद्धता अशी याची काही गुणवैशिष्टये. पण त्याच बरोबर आविष्कारातला संयम आणि औचित्य महत्वाचे. व्यंग्यार्थाने सुचवण्याचे कवीचे कौशल्य. यामुळे एकापेक्षा जास्त अन्वय लावता येण्याची, वेगवेगळे अर्थ लावता येण्याची शक्यता अभिजात कलाकृतीत असते. नियमबद्धता पाळूनही स्वतंत्र रचना आणि विविध अर्थ प्रसवणारी कलाकृती अभिजात असते. म्हणूनच ती कालातीतही असते. कलात्मक प्रमाणबद्धता, भव्योदात्त आशय व शाश्वत सत्यांचे प्रतिपादन या बाबतींत आढळते. आदर्श व अनुकरणीय ठरणारे जे साहित्य, ते अभिजाततावादी होय, हा प्रबोधनकाळाचा दृष्टिकोन होता. याउलट लोककलांमधे नियम झुगारून देणारी मुक्त अभिव्यक्ती, उत्तमाचा ध्यास न धरता सहजपणे अभिव्यक्त होणं आणि त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचणं ही स्वाभाविक वैशिष्टये दिसतात. तर अभिजाततेत सदभिरुची, प्रातिनिधिक स्वभावचित्रण, सामाजिक उद्बोधन व आशय-अभिव्यक्तीमधील सर्वांगीण औचित्यविचार यांचा प्राधान्याने विचार असतो.

याच आधारावर कालांतराने संस्कृत, चायनीज, जॅपनीज, अरेबिक या प्राचीन साहित्यालाही अभिजात साहित्याचा मान मिळाला. प्राचीन कालखंड, धार्मिक विचार, राजसत्तांचा साहित्यावर प्रभाव आणि पद्यातून अभिव्यक्ती हे या परंपरांचे वैशिष्टय आहे. हीच वैशिष्टये जगभरातील प्राचीन अभिजात वाङ्मयातून प्रगट होतात. अभिजातता कमी-अधिक फरकाने कला, स्थापत्य, भाषा, विज्ञान अशाप्रकारच्या मानवी जीवनाच्या सर्व अंगामध्ये एकाच वेळी अस्तित्वात येते.

संस्कृत या भारतातील प्राचीनतम भाषेचे उदाहरण या संदर्भात पाहणे युक्त ठरेल. ऋग्वेदापासून अथवा त्याच्याही आधीपासून संस्कृतात साहित्याची निर्मिती होऊ लागली. ऋग्वेदाची रचना ही साधे आणि शिथिल छंद आणि व्याकरण यांच्या अनुषंगाने झालेली दिसते. ऋग्वेदापासून उपनिषदांपर्यंतची रचना कमी-अधिक फरकाने याच प्रकारात मोडते. यानंतर निर्माण झालेल्या महाभारत आणि रामायण या ऋषिनिर्मित साहित्यात भाषा अधिक सुघटित झाली. तिच्यातील वैदिक स्वरांचा लोप झाला. या भाषारचनेला व्याकरणाने आणि छंदःशास्त्राने नियमबद्ध केले. त्यानंतर मात्र“जे पाणिनीला ज्ञात नाही ते व्याकरणदृष्ट्या अशुद्ध” असे समजले जाऊ लागले. शिथिल छंदांचेही रूपांतर बांधीव अशा अक्षररगणवृत्तांमध्ये झाले. वृत्तांची लांबी आणि संख्या वाढू लागली. अशाच प्रकारचे निश्चित निकष आणि नियम हे अलंकार, शैली, रस यांच्या संदर्भातही निर्माण झाले.

भारतीय प्राचीन अभिव्यक्तीमध्ये जैन आणि बौद्ध वाङ्मयाची परंपरा समृद्ध करणारे पाली आणि प्राकृत भाषेतील ग्रंथही मौलिक आहेत. त्या साहित्याने भारतीय समाजाला समृद्ध आणि विचारशील केलेच पण हे साहित्य आणि त्यातील विचारधन जगातील अनेक देशांमध्ये फार पूर्वीच स्वीकारले गेले. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म म्हणून स्वीकारला गेला. त्या त्या ठिकाणच्या भाषांमध्ये मूळ पाली व संस्कृत ग्रंथ भाषांतरित झाले. त्यातील अनेक ग्रंथांचे आजही वाचन होते. जैन संप्रदायाचे ग्रंथ संस्कृत, प्राकृत तसेच अपभ्रंश भाषांमध्ये आहेत. अनेक राजे, व्यापारी तसेच सामान्यजनांनी देखील या धर्मांचा व त्यातील साहित्याचा स्वीकार मोठया प्रमाणावर केला होता. त्यामुळे पाली, प्राकृत, अपभ्रंश, बौद्ध संकर संस्कृत वाङ्मयाचाही अभिजात साहित्यात समावेश करण्यात येतो.

अभिजात भाषा म्हणजे ‘मृत’ भाषा असे मानण्याची भाषाशास्त्राची रीत आहे. शास्त्रीय परिभाषा तयार करणे आणि धार्मिक कृत्ये या प्रयोजनांव्यतिरिक्त प्राचीन ग्रीक, लॅटिन इत्यादी भाषा आज वापरात नाहीत यामुळे ही कल्पना अस्तित्वात आलेली आहे. या भाषांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. भारतात मात्र अशी स्थिती नाही. वरील दोन प्रयोजनांव्यतिरिक्त संस्कृतादी प्राचीन भाषा आणि लिपी यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच भारत सरकारने अभिजात मानलेल्या तमिळ, कन्नड, तेलुगू, हिन्दी इत्यादी भाषांमध्ये लोकव्यवहार आजही सुरू आहे. त्यामुळे अभिजात भाषा म्हणजे सर्वस्वी मृत भाषा ही कल्पना भारतीय भाषांना पूर्णपणे लागू पडत नाही.

५ फेब्रुवारी २०१४ रोजी भारत सरकारने भारतीय भाषांच्या अभिजाततेसंबंधी पुढील नियम निश्चित केले. ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि जुने वाङ्मय त्या भाषेत असावे. त्या भाषेतील प्राचीन वाङ्मय मौल्यवान वारसा म्हणता यावे अशा स्वरूपाचे असावे. त्या भाषेला स्वतन्त्र आणि दुसर्‍या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असावी. जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे. या कसोटयांवर केन्द्र सरकारने १७ सप्टेंबर २००४ ह्या दिवशी तमिळ भाषा ‘अभिजात’ असल्याचे घोषित केले. २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड व तेलगू, २०१३ मध्ये मल्याळम् आणि २०१४ साली ओडिया या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला.

या ज्ञानमंडळातून भारतीय तसेच जागतिक अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

बालचरित (Balcharit)

बालचरित (Balcharit)

बालचरित : कृष्णाच्या बालजीवनावर आधारित भासाचे पाच अंकी नाटक.महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. कंसवध हा ह्या नाटकाचा मुख्य ...
बृहत्कल्पसूत्र (Brihatkalpasutra)

बृहत्कल्पसूत्र (Brihatkalpasutra)

बृहत्कल्पसूत्र : अर्धमागधी भाषेतील आगमेतर ग्रंथांमधील छेदसूत्रातील महत्त्वाचे सूत्र. याचे मूळनाव ‘कप्प’ असे आहे. परंतु दशाश्रुतस्कंधाच्या आठव्या अध्ययनात पर्युषणकल्पसूत्र आल्यामुळे ...
बृहद्देवता (Brihaddevta)

बृहद्देवता (Brihaddevta)

बृहद्देवता : वेदांगांव्यतिरिक्त वेदांचे गूढ होत चाललेले विषय उलगडून सांगणाऱ्या काही ग्रंथांपैकी एक महत्त्वाचा संस्कृत ग्रंथ म्हणजे बृहद्देवता. वेदांची सूक्ते ...
भगवती आराधना (Bhagwati Aradhana)

भगवती आराधना (Bhagwati Aradhana)

भगवती आराधना : आचार्य शिवार्य विरचित शौरसेनी प्राकृत भाषेतील जैनग्रंथ. जैनमुनींसाठी आवश्यक आचारसूत्रे आणि सल्लेखना या जैन धर्मातील जीवनविधीचे सांगोपांग ...
भाण (Bhan)

भाण (Bhan)

दशरूपकांपैकी नववा रूपकप्रकार. भरताने नाट्यशास्त्रात याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे आत्मानुभूतशंसीपरसंश्रयवर्णनाविशेषस्तु| विविधाश्रयोहिभाणोविज्ञेयस्त्वेकहार्यश्च|| (१८.९९) परवचनमात्मसंस्थंप्रतिवचनैरुत्तरित्तरग्रथितै:| आकाशपुरुषकथितैरङ्गविकारैराभिनयेत्तत्|| (१८.१००) धूर्तविटसंप्रयोज्योनानावस्थान्तरात्मकश्चैव| एकाङ्कोबहुचेष्टःसततंकार्योबुधैर्भाणः|| (१८.१०१) या ...
भास्करराय (Bhaskarrai)

भास्करराय (Bhaskarrai)

भास्करराय : (सु. इ. स. सतरावे ते अठरावे शतक). एक भाष्यकार आणि तंत्रशास्त्रातील श्रीविद्या-संप्रदायाचा अधिकारी व विद्वान. भास्कररायाचा उल्लेख स्वरराय, ...
मत्तविलास (Mattavilas)

मत्तविलास (Mattavilas)

मत्तविलास : संस्कृत नाटक. पल्लव वंशीय राजा महेन्द्रविक्रम वर्मा रचित मत्तविलास हे प्रहसन सर्वात प्राचीन समजले जाते. साधारणपणे महेन्द्रविक्रम वर्माचा ...
मधुराविजयम् (Madhuravijayam)

मधुराविजयम् (Madhuravijayam)

मधुराविजयम् : दक्षिण भारतातील विजयनगर घराण्याच्या ऐतिहासिक महाकाव्यांमधील एक महत्त्वाचे संस्कृत काव्य.गंगादेवी (गंगाम्बिका) या स्त्री कवयित्रीने हे काव्य रचले आहे.मधुरेवर ...
मध्यमव्यायोग (Madhyamvyayog)

मध्यमव्यायोग (Madhyamvyayog)

भासनाटकचक्रातील एक नाटक म्हणजे मध्यमव्यायोग. त्याची कथा अशी – एकदा कोणी एक वृद्ध ब्राह्मण आपल्या पत्नी व तीन मुलांसह हिडिंबा ...
मल्लिनाथ

मल्लिनाथ

मल्लिनाथ : (सु. १४-१५ वे शतक) प्रख्यात संस्कृत टीकाकार. पेड्डभट्ट या नावानेही ते तेलंगणात ओळखले जात. तेलंगण राज्यातील मेडक जिल्ह्याच्या ...
मुद्राराक्षस

मुद्राराक्षस

एक सात अंकी संस्कृत नाटक. राजकीय विषयावरील हे एकमेव संस्कृत नाटक असून त्याचा कर्ता विशाखादत्त आहे. नाटकाच्या प्रारंभकात विशाखादत्ताने स्वत:विषयी ...
मूलाचार (Mulachara)

मूलाचार (Mulachara)

मूलाचार : श्री वट्टकेराचार्य या जैन रचनाकारांनी शौरसेनी प्राकृत भाषेत रचलेला बोधप्रद ग्रंथ. १२ विभागात व १२४३ गाथांमध्ये छंदबद्ध असलेला ...
मृच्छकटिकम् (Mrichchakatikam)

मृच्छकटिकम् (Mrichchakatikam)

मृच्छकटिकम्  : शूद्रकलिखित दहा अंकी संस्कृत प्रकरणनाट्य. या प्रकरणाचे कतृत्त्व विद्वानांनी शूद्रकाला दिले नाही परंतु सर्वसामान्यपणे तोच कर्ता समजला जातो ...
मेघदूत

मेघदूत

महाकवी कालिदासलिखित संस्कृत खंडकाव्य. त्याची श्लोकसंख्या निरनिराळ्या प्रतीत १०० ते १२० दरम्यान आढळते; तथापि अधिकृत प्रतिप्रमाणे ती १११ आहे. दूतकाव्य ...
मॉरिझ विंटरनिट्‌स (Moriz Winternitz)

मॉरिझ विंटरनिट्‌स (Moriz Winternitz)

विंटरनिट्‌स, मॉरिझ : (२३ डिसेंबर १८६३ – ९ जानेवारी १९३७). थोर प्राच्यविद्याविशारद. हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर या ग्रंथाचे लेखक म्हणून ...
यशस्तिलक चम्पू (Yasastilaka Champu)

यशस्तिलक चम्पू (Yasastilaka Champu)

यशस्तिलक चम्पू : संस्कृतमधील एक जैन चम्पूग्रंथ. याचा काळ इ.स. ९५९. यातील कथेचा मूळ संदर्भ गुणभद्राच्या उत्तरपुराणात येतो. याचा कर्ता ...
यान खोंदा (Jan Gonda)

यान खोंदा (Jan Gonda)

खोंदा, यान :  (१४ एप्रिल १९०५ – २८ जुलै १९९१). डच वेदाभ्यासक व भारतविद्यावंत. साउथ हॉलंड (नेदर्लंड्स) मधील हौडा येथे ...
योहान जॉर्ज ब्यूह्लर (Johann Georg Bühler)

योहान जॉर्ज ब्यूह्लर (Johann Georg Bühler)

ब्यूह्लर, योहान जॉर्ज : (१९ जुलै १८३७, बोर्स्टेल,जर्मनी – ८ एप्रिल १८९८).भारतविद्येचे अग्रगण्य जर्मन अभ्यासक आणि संशोधक. भारतीय लिपिशास्त्रातील त्यांच्या ...
रघु वीरा (Raghu Vira)

रघु वीरा (Raghu Vira)

रघु वीरा  : (३० डिसेंबर १९०२- १४ मे १९६३) भारतातील प्रसिद्ध भाषावैज्ञानिक, कोशकार, संशोधक तसेच कुशल राजकारणपटु आणि संसदसदस्य. मुख्य ...
राम पाणिवाद (Ram Paniwad)

राम पाणिवाद (Ram Paniwad)

राम पाणिवाद : (१७०७-१७७५). संस्कृत व प्राकृत या भाषांमध्ये काव्य-नाटक रचियता केरळमधील प्रसिद्ध साहित्यिक. त्यांचा जन्म केरळमधील मलबार जिल्ह्यातील किल्लिक्कुरीच्ची ...
Close Menu
Skip to content