(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

हाइन्‌ट्स व्हिल्हेल्म गूडेरिआन (Heinz Wilhelm Guderian)

हाइन्‌ट्स व्हिल्हेल्म गूडेरिआन

गूडेरिआन, हाइन्‌ट्स : (१७ जून १८८८‒१४ मे १९५४). जर्मन युद्धतंत्रज्ञ व सेनाधिकारी. चिलखती रणगाड्यांच्या युद्धतंत्रात तो निपुण होता. प्रशियात (सध्याचे पोलंड) केल्मनॉ ...
हानी प्रवणता/असुरक्षा (Vulnerability)

हानी प्रवणता/असुरक्षा

हानी प्रवणता/असुरक्षा त्याच्या स्वभावामध्ये बहु-आयामी आहे. इमारतींचे निकृष्ट अभिकल्प (Design) आणि बांधकाम, मालमत्तेचे अपुरे संरक्षण, सार्वजनिक माहिती आणि जागरूकता नसणे, ...
हिल्लीची लढाई (Battle of Hilli)

हिल्लीची लढाई

पार्श्वभूमी : हिल्ली हे बांगला देशमधील बोग्रा, गोराघाट, चारकाई वगैरे शहरांना जोडणारे महत्त्वाचे संपर्क केंद्र आहे. पद्मा नदीवरील हार्डिंग ब्रिजला ...
हृषीकेश मुळगावकर (Hrishikesh Mulgaonkar)

हृषीकेश मुळगावकर

मुळगावकर, हृषीकेश : (१४ ऑगस्ट १९२०–९ एप्रिल २०१५). भारताचे भूतपूर्व वायुसेनाध्यक्ष. जन्म मुंबई येथे. प्रख्यात शल्यतज्ञ शामराव हे त्यांचे वडील आणि ...
हेल्म्यूट योहानस मॉल्ट्के, धाकटा (Helmuth Johannes Moltke, Younger)

हेल्म्यूट योहानस मॉल्ट्के, धाकटा

मॉल्ट्के, हेल्म्यूट योहानस लूटव्हिख फोन (धाकटा) : (२५ मे १८४८–१८ जून १९१६). प्रसिद्ध जर्मन सेनाधिकारी व जर्मन जनरल स्टाफ प्रमुख ...
होरेशिओ हर्बर्ट किचेनर (Horatio Herbert Kichenar)

होरेशिओ हर्बर्ट किचेनर

किचेनर, फील्डमार्शल अर्ल होरेशिओ हर्बर्ट : (२४ जून १८५०‒५ जून १९१६). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी. जन्म दक्षिण आयर्लंडमधील लिस्टोएल गावाजवळ. वयाच्या ...
होशियार सिंग (Hoshiar Singh)

होशियार सिंग

सिंग, मेजर होशियार : (५ मे १९३६–६ डिसेंबर १९९८). भारतीय लष्करातील एक पराक्रमी सेनाधिकारी आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म लढाऊ परंपरा असलेल्या जाट ज्ञातितील ...
ॲटिला (Attila)

ॲटिला

ॲटिला : (४०६?—४५३). प्रसिद्ध हूण राजा. वडिलांचे नाव मुंदझुक व चुलत्याचे नाव रूआ. रूआनंतर ४३४ मध्ये ॲटिला आपला भाऊ ब्‍लीडासह ...
ॲल्फ्रेड थेअर माहॅन (Alfred Thayer Mahan)

ॲल्फ्रेड थेअर माहॅन

माहॅन, ॲल्फ्रेड थेअर : (२७ सप्टेंबर १८४० ‒ १ डिंसेंबर १९१४). अमेरिकी नौसेनेतील एक नौसेनापती (ॲड्‌मिरल). सागरी बळ आणि युद्धसज्ज नौसेना ...
ॲस्पी इंजिनियर (Aspy Engineer)

ॲस्पी इंजिनियर

इंजिनियर, ॲस्पी मेरवान : (१५ डिसेंबर १९१२—१ मे २००२). भारताचे माजी हवाई दलप्रमुख. उच्च शिक्षण कराची येथील दयाराम जेठमल सिंध ...