(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

शिकागो संप्रदाय (Chicago School)

शिकागो संप्रदाय

अर्थशास्त्रातील नव-अभिजातवादी विचारवंताचा एक समूह. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील अभ्यासकांच्या विचारप्रवाहातून हा संप्रदाय निर्माण झाला. हा केन्सविरोधी आर्थिक विचारवादी ...
शिक्षणाचे अर्थशास्त्र (Economics of Education)

शिक्षणाचे अर्थशास्त्र

विकासाच्या अर्थशास्त्राशी घनिष्ठ संबंध असलेली एक अर्थशास्त्रीय शाखा. प्राचीन काळापासून पौर्वात्य तसेच पाश्चिमात्य देशांतील विविध विचारवंतांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित ...
शेतकर्‍यांचा असूड (Shetkaryancha Asood)

शेतकर्‍यांचा असूड

भारतीय शेतकर्‍यांच्या समस्यांचा व त्यावरील उपायांचा विस्तृतपणे विश्लेषण करणारे एक महत्त्वपूर्ण पुस्तक. भारतीय शेतीवरील वैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेले हे पहिले पुस्तक ...
संख्यात्मक सुलभता (Quantitative Easing)

संख्यात्मक सुलभता

अर्थव्यवस्थेतील तरलता नियंत्रित करण्याचे एक अपारंपरिक मौद्रिक साधन. सामान्य परिस्थितीत मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात रोख्यांची खरेदीविक्री करून आंतर बँकीय व्याजाचे ...
समभाग भांडवल (Equity Capital)

समभाग भांडवल

भांडवल आणि गुंतवणूक या संदर्भात मालकी हक्क किंवा समानाधिकार देणारा भाग म्हणजे ‘समभाग’ होय. भारतीय कंपनी कायदा १९५६ अनुसार, जो ...
सरकारीया आयोग (Sarkaria Commission)

सरकारीया आयोग

केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील वर्तमान आर्थिक व सामाजिक स्थितीबाबतीतील कामकाज व्यवस्थेसंदर्भात समीक्षण करणे, त्यात यथोचित बदल करणे आणि ...
संरक्षण अर्थशास्त्र (Defence Economics)

संरक्षण अर्थशास्त्र

व्याख्या व स्वरूप : ‘संरक्षण अर्थशास्त्र’ ही तुलनेने अर्थशास्त्राची एक नव विकसित विद्याशाखा आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत, तत्त्वे व साधने यांच्या ...
संरक्षण नीती (Protectionism)

संरक्षण नीती

आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध आणल्या जाणाऱ्या सरकारच्या आर्थिक धोरणाला संरक्षणवाद असे संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध आणण्याच्या मुख्यतः दोन पद्धती आहेत ...
सरासरी खर्च किंमत निश्चिती (Average Cost Pricing)

सरासरी खर्च किंमत निश्चिती

आधुनिक व्यावसायिक संस्था वापरत असलेली किंमत निश्चितीची एक पद्धत. मागणीची लवचिकता ही संज्ञा अनेकदा सर्वसामान्य व्यावसायिकांना समजत नाही. अशा वेळी ...
सर्जनशील विनाश (Creative Destruction)

सर्जनशील विनाश

सर्जनशील विनाश म्हणजे सातत्याची, विनाअडथळा असलेली वस्तू व प्रक्रियेच्या नवप्रवर्तनाची यंत्रणा. अशा यंत्रणेच्या व्यवहार प्रक्रियेतून जुनी उत्पादन व्यवस्था अथवा पद्धती ...
सर्वाधिक पसंती राष्ट्र (Most Favoured Nation – MFN)

सर्वाधिक पसंती राष्ट्र

सर्वाधिक पसंती राष्ट्र ही संकल्पना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थकारण व राजकारण यांच्याशी संबंधित आहे. एखादे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर वस्तू व सेवा ...
संस्थात्मक गुंतवणूकदार (Institutional Investors)

संस्थात्मक गुंतवणूकदार

ठेवीदारांच्या अथवा आपल्या संस्थेतील सभासदांच्या वतीने वित्तीय बाजारात भागरोखे (शेअर्स), कर्जरोखे (डिवेंचर) खरेदी करणारी, तसेच नाणेबाजारातील साधनांमध्ये पैशांची मोठ्या प्रमाणात ...
सहकारी संघराज्यवाद (Co-Operative Federalism)

सहकारी संघराज्यवाद

कोणत्याही देशातील शासन किंवा सरकार हे सार्वभौम सत्ता, लोकांचे प्रतिनिधित्व करणारी आणि उच्च स्वरूपाचे निर्णय घेणारी यंत्रणा असते. ही शासनयंत्रणा ...
सहस्रक विकासाची ध्येये (Millenium Development Goals - MDG)

सहस्रक विकासाची ध्येये

सहस्रक विकासाची ध्येये ही आंतरराष्ट्रीय विकासाची आठ ध्येये आहे. या ध्येयांची निर्मिती सप्टेंबर २००० मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात ...
सागर (Security and Growth for All in the Region)

सागर

हिंदी महासागर संलग्न प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास. हिंदी महासागराच्या किनारी भागातील जवळपास ४० राष्ट्रांमध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या ४०% लोकसंख्या ...
सापेक्ष उत्पन्न गृहितक (Relative Income Hypothesis)

सापेक्ष उत्पन्न गृहितक

समाजाच्या उत्पन्नापेक्षा व्यक्तिगत उत्पन्नाशी व्यक्तीची उपभोग प्रवृत्ती निगडित असते, असे सापेक्ष उत्पन्न गृहीतकामध्ये प्रतिपादन केले आहे. जर समाजातील सर्वांचे उत्पन्न ...
सामाजिक अर्थशास्त्र (Social Economic)

सामाजिक अर्थशास्त्र

सामाजिक संकल्पना व वर्तन आणि अर्थशास्त्रीय सिद्धांत व तत्त्वे यांचा मेळ घालणारी अर्थशास्त्राची एक शाखा. यामध्ये सामाजिक मानदंड, सांस्कृतिक धारणा, ...
सायलेंट स्प्रिंग (Silent Spring)

सायलेंट स्प्रिंग

रासायनिक कीटकनाशके वापराचा दुष्परिणाम, पर्यावरण व निसर्गचक्रासंदर्भातील एक पुस्तक. सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक प्रख्यात सागरी जीवशास्त्रज्ञ, आधुनिक पर्यावरण संरक्षण मोहिमेच्या ...
सार्क – दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य परिषद (SAARC – South Asian Association for Regional Co-operation)

सार्क – दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य परिषद

दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एक संघटना. सार्कची निर्मिती ही लोकांच्या कल्याणामध्ये वाढ व्हावी आणि प्रदेशांमध्ये संपन्नता निर्माण ...
सार्वजनिक वस्तू (Public good)

सार्वजनिक वस्तू

सर्वांसाठी उपलब्ध असणारी वस्तू. सार्वजनिक वस्तू कोणा एकाची मक्तेदारी नसून ती सर्वांसाठी समप्रमाणात असते. एकाने वापरली म्हणून दुसऱ्याला वापरता येत ...