(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्था (Public Distribution Scheme)

सार्वजनिक वितरण व्यवस्था

ज्या सार्वजनिक व्यवस्थेमार्फत उपभोक्त्यांना उचित किमतीवर आवश्यक वस्तूंचा पूरवठा केला जातो, त्या सार्वजनिक व्यवस्थेस सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणतात. उदा., शासनमान्य ...
सार्वभौम रोखे (Sovereign Bonds)

सार्वभौम रोखे

एखाद्या व्यक्तीने काही रक्कम कर्ज घेतल्यावर त्या रकमेच्या परतफेडीची हमी म्हणून वचन देणारा एक अधिकृत दस्तऐवज. रोख धारक, कर्जाऊ रक्कम, ...
सांस्कृतिक अर्थशास्त्र (Cultural Economics)

सांस्कृतिक अर्थशास्त्र

नव्याने उदयास आलेले अर्थशास्राचे एक अभ्यासक्षेत्र. युनेस्कोच्या वर्ल्ड कल्चरल रिपोर्ट (२०००) अनुसार आता संस्कृतीची चर्चा आर्थिक संदर्भातही होऊ लागली आहे ...
सांस्कृतिक वस्तू (Cultural Goods)

सांस्कृतिक वस्तू

इतिहास, प्रागैतिहासिक, पुरातत्त्व, कला व साहित्य, विज्ञान इत्यादींसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच सांस्कृतिक वस्तू किंवा जिन्नस होय. तसेच ज्या ...
सिबील (CIBIL - Credit Information Bureau India Ltd.)

सिबील

कर्जदाराचे पतगुणांकन करणारी एक अभिकर्ता (एजन्सी). भारतामध्ये १९९१ नंतरच्या अभूतपूर्व आर्थिक व वित्तीय सुधारणांच्या पार्श्वभूमीवर १९९७ पासून बँकांनी कर्ज वाटपासाठी ...
सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर (Incremental Capital Output Ratio – ICOR)

सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर

विकसनशील देशांच्या संदर्भात विशेषत्वाने वापरली जाणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. भांडवल उत्पादन गुणोत्तर मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. एक सरासरी भांडवल उत्पादन ...
सूक्ष्म वित्त (Micro Finance)

सूक्ष्म वित्त

सूक्ष्म वित्त हा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी उत्क्रांत झालेला आर्थिक विकास दृष्टीकोन आहे. या अंतर्गत बचत व कर्ज या ...
सूर्योदयी उद्योग (Sunrise Industry)

सूर्योदयी उद्योग

नव्यानेच स्थापन झालेल्या आणि अल्पावधितच वेगाने विकसित होणार्‍या उद्योगांना सूर्योदयी उद्योग असे म्हणतात. सूर्योदयी उद्योग ही एक कालसापेक्ष संकल्पना असून ...
सेझ (SEZ)

सेझ

वस्तूंचे उत्पादन आणि सेवापुरवठा यांकरीता मुद्दाम निश्चित केलेले शुल्कविरहित प्रदेश म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zone – SEZ) होय ...
सेन्सेक्स (Sensex)

सेन्सेक्स

भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक लहान-मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यांपैकी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई – स्थापना इ. स. १८७५) आणि नॅशनल स्टॉक ...
सेबी (SEBI)

सेबी

गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणारी, सुरक्षित बाजाराच्या विकासाला चालना देणे व त्याचे नियमन करणारी आणि त्यासाठी त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबी ...
स्टॉकहोम संप्रदाय (Stockholm School)

स्टॉकहोम संप्रदाय

अर्थशास्त्राच्या इतिहासात संप्रदाय किंवा विचारधारा म्हणजे अर्थव्यवस्थांच्या कार्यपद्धतीवर समान दृष्टिकोन बाळगणाऱ्या विचारवंताचा गट होय. सर्वच अर्थतज्ज्ञ एखाद्या विशिष्ट विचारधारेत मोडतात ...
स्टॉलपर-सॅम्यूएल्सन प्रमेय (Stolper-Samuelson Theorem)

स्टॉलपर-सॅम्यूएल्सन प्रमेय

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात स्टॉलपर आणि सॅम्यूएल्सन यांनी मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत. उत्पादन घटकांची उपलब्धता यावर आधारित हेक्स्चर-ओहलिन सिद्धांताचा निष्कर्ष स्टॉलपर-सॅम्यूएल्सन ...
स्पर्धाक्षम बाजार (Contestable Market)

स्पर्धाक्षम बाजार

स्पर्धाक्षम बाजार हा पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारा आणि मक्तेदारी व इतर बाजार प्रकारांपेक्षा भिन्न आहे. या बाजारात प्रवेश व निर्गमनासाठी ...
स्वयंचलन (Automation)

स्वयंचलन

प्रणाली, पद्धत व तंत्र यांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी होऊन यंत्र आणि तंत्र यांचा वापर वाढत जातो, त्यास स्वयंचलन म्हणतात. म्हणजेच ...
स्वयंरोजगार (Self Employed)

स्वयंरोजगार

सरकारी अथवा खाजगी नोकरी न करता अर्थार्जनासाठी स्वत:ने स्वत:चा व्यवसाय सुरू करणे म्हणजे स्वयंरोजगार होय. जगातील अनेक व्यक्ती स्वत:च्या कार्यात, ...
स्वामिनाथन आयोग (Swaminathan Committee)

स्वामिनाथन आयोग

शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी स्थापना करण्यात आलेले एक आयोग. यास राष्ट्रीय शेतकरी आयोग (नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स (National ...
हरफिन्डाल निर्देशांक (Herfindahl Index)

हरफिन्डाल निर्देशांक

औद्योगिक संकेंद्रणाच्या अभ्यासात वापरला जाणारा निर्देशांक. अमेरिकन अर्थतज्ज्ञ ओरिस हरफिन्डाल यांनी १९५० च्या शकात या निर्देशंकाची मांडणी केली; परंतु प्रसिद्ध ...
हरित क्रांती (Green Revolution)

हरित क्रांती

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि नवीन संकरित बि-बियाणांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात जी क्रांती घडून आली, तिला हरित क्रांती असे म्हणतात ...
हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)

हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ

हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ : (२४ ऑगस्ट १९२७ – २२ जून २०२३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मार्कोव्हिट्झ ...