(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

अर्थशास्त्र (Economics)

अर्थशास्त्र

मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र ...
अवपुंजन (Dumping)

अवपुंजन

अवपुंजन म्हणजे एखाद्या राष्ट्राने किंवा एखाद्या व्यापारीमंडळाने केलेली वस्तूची अशी निर्यात की, ज्या वस्तूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात त्या वस्तूच्या निर्माण ...
असंघटित क्षेत्र (Unorganised Sector)

असंघटित क्षेत्र

खाजगी किंवा अत्यल्प कर्मचारी असलेल्या घरगुती व्यवसायांचे एक क्षेत्र. हे व्यवसाय क्षेत्र अनौपचारिक क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. या क्षेत्रात लघु ...
असममित माहिती (Asymmetric Information)

असममित माहिती

जेव्हा आर्थिक व्यवहरातील काही व्यक्तींकडे इतर व्यक्तिंपेक्षा अधिक अथवा जास्त सुसंगत माहिती किंवा ज्ञान असते, तेव्हा असममित माहिती या संकल्पनेचा ...
अहलुवालिया, इशर जज (Ahluwalia, Isher Judge)

अहलुवालिया, इशर जज

इशर जज अहलुवालिया (Isher Judge Ahluwalia) : (१ ऑक्टोबर १९४५ – २६ सप्टेंबर २०२०). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आर्थिक सिद्धांत व ...
आडत (Factoring)

आडत

आडत हा वित्तपुरवठा करण्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये व्यवसाय आपले प्राप्य लेखे किंवा बीजके (Invoice) एका तिसऱ्या पक्षास विकून आपली ...
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (International Atomic Energy Agency - IAEA)

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था

अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्राचा लष्करी उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध घालणारी एक सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था. ही ...
आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटन (International Economic Association - IEA)

आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटन

एक बिगर शासकीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना (आयईए). या संघटनेची स्थापना व औपचारिक प्रक्रिया १९५० मध्ये युनेस्कोच्या सामाजिक विज्ञान विभागाच्या प्रेरणेतून ...
आंतरराष्ट्रीय तडजोडविषयक बँक (Bank For International Settlement)

आंतरराष्ट्रीय तडजोडविषयक बँक

जागतिक स्तरावर बँक व्यवसाय करणारी तसेच जगातील अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांची बँक म्हणून कार्यरत असलेली सर्वांत जुनी वित्तसंस्था. पहिल्या महायुद्धात ...
आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष (International Balance of Trade)

आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष

एका देशाने एका आर्थिक वर्षात इतर देशांशी केलेल्या व्यवहारांचा लेखाजोखा किंवा जमाखर्च म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारशेष होय. यास आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल असेही ...
आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक (African Development Bank)

आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक

आफ्रिका खंडातील देशांचा सर्वांगीण विकास व्हावा या मुख्य उद्देशाने स्थापित जागतिक स्तरावरील एक बहुद्देशीय वित्तीय संस्था. या बँकेची स्थापना १९६४ ...
आभास खंड (Quasi Rent)

आभास खंड

खंडनिभ. कोणत्याही घटकास तात्पुरता मिळणारा अतिरिक्त नफा म्हणजे त्याचा आभास खंड होय. तो खंडासारखा वाटतो; परंतु आर्थिक स्वरूपाचा नसतो. आभास ...
आभासी चलन (Virtual Currency)

आभासी चलन

अमूर्त स्वरूपातील एक चलन. विनिमयाचे माध्यम म्हणून चलनाचा इतिहास हा वस्तूविनिमयापासून ते संगणकयुगातील आभासी चलनापर्यंत अत्यंत रोचक असा आहे. चलन ...
आर. गांधी समिती (R. Gandhi Committee)

आर. गांधी समिती

मालेगाम समितीच्या शिफारशींची पडताळणी करणे आणि मान्यताप्राप्त व्यावसायिक रूपरेषा, व्यावसायिक आकार आणि आव्हानांची पडताळणी करून शिफारस करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ...
आर्थिक धोरण (Economic Policy)

आर्थिक धोरण

शासकीय पातळीवरील अर्थव्यवस्थेतील प्रस्तावित व्यवहार म्हणजे आर्थिक धोरण. यामध्ये प्रामुख्याने व्याजदर, अंदाजपत्रक, श्रमबाजार व कामगार कायदे, राष्ट्रीयीकरण, कररचना, पैशांचा पुरवठा ...
आर्थिक पर्यावरण (Economic Environment)

आर्थिक पर्यावरण

सभोवताली असलेल्या विविध आर्थिक घटकांमधील परस्परसंबंध म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास सभोवतालची आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक पर्यावरण ...
आर्थिक भूगोल (Economic Geography)

आर्थिक भूगोल

निसर्गातील साधन संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करण्यासंदर्भातला अभ्यास आर्थिक भूगोलात केला जातो. भूगोलशास्रात प्रामुख्याने निरीक्षण, प्रयोग आणि  विश्लेषण या क्रियांद्वारे ...
आर्थिक भूविज्ञान (Economic Geology)

आर्थिक भूविज्ञान

पृथ्वीवरील आर्थिक महत्त्व असणारे आणि औद्योगिक व इतर कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचा अभ्यास करणारे एक महत्त्वाचे शास्त्र. आर्थिक भूविज्ञान हा ...
आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (Organisation for Economic Co-Operation and Development)

आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना

आर्थिक विकास आणि जागतिक व्यापाराला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक आंतरप्रशासनिक आंतरराष्ट्रीय संघटना. या संघटनेची स्थापना १९६१ मध्ये झाली ...
आर्थिक साक्षरता (Financial Literacy)

आर्थिक साक्षरता

संपत्तीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, हे समजण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय. पैसा म्हणजे काय? पैशाच्या साहाय्याने आपण काय ...