(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
स्व्हेन आँडर्स हेडीन (Sven Anders Hedin) 

स्व्हेन आँडर्स हेडीन

हेडीन, स्व्हेन आँडर्स (Hedin, Sven Anders) : (१९ फेब्रुवारी १८६५ – २६ नोव्हेंबर १९५२). स्वीडिश समन्वेषक आणि भूगोलज्ञ. तसेच प्रदेश नकाशाकार, ...
हंटर नदी (Hunter River)

हंटर नदी

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी प्रमुख नदी. लांबी ४६२ किमी., जलवाहन क्षेत्र सुमारे २२,००० चौ. किमी. लिव्हरपूल ...
हडसन नदी (Hudson River)

हडसन नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्यातील सर्वांत लांब नदी. येथील ॲडिराँडॅक पर्वतश्रेणीत माऊंट मार्सी (उंची १,६२९ मीटर) हे न्यूयॉर्क राज्यातील सर्वोच्च ...
हडसन सामुद्रधुनी (Hudson Strait)

हडसन सामुद्रधुनी

कॅनडास्थित लॅब्रॅडॉर समुद्र आणि हडसन उपसागर यांना जोडणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीच्या पश्चिमेस हडसन उपसागर, पूर्वेस लॅब्रॅडॉर समुद्र, दक्षिणेस कॅनडाचा क्वीबेक प्रांत, ...
हंबोल्ट नदी (Humboldt River)

हंबोल्ट नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी नेव्हाडा राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. या नदीची लांबी सुमारे ४८० किमी. असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४३,६१५ ...
हमिल्को (Himilco)

हमिल्को

हमिल्को : (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक). कार्थेजिनीयन मार्गनिर्देशक व समन्वेषक. भूमध्य समुद्रापासून यूरोपच्या वायव्य किनाऱ्यापर्यंत जाणारे हमिल्को हे पहिले ...
हिंदी महासागर (Indian Ocean)

हिंदी महासागर

पॅसिफिक व अटलांटिक या महासागरांच्या खालोखाल जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर. इंडिया (भारत) या आपल्या देशाच्या नावावरूनच या महासागराला ‘इंडियन ...
हिंदी महासागराची तळरचना (Submarine Features in Inadian Ocean)

हिंदी महासागराची तळरचना

समुद्रसपाटीपासून वाढत्या खोलीनुसार महासागराचे स्थूलमानाने चार विभाग केले जातात : (१) सागरमग्न खंडभूमी – ० ते २०० मी. खोलीचा तळभाग, ...
हिंदी महासागराची निर्मिती व भूविज्ञान (Origin and Geology of Indian Ocean)

हिंदी महासागराची निर्मिती व भूविज्ञान

हिंदी महासागराची निर्मिती, भूविज्ञान आणि त्याच्या उत्क्रांतीचा इतिहास हा इतर महासागरांपेक्षा अधिक गुंतागुंतीचा आहे. ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक एडूआर्ट झ्यूस यांनी दक्षिण ...
हिंदी महासागराची प्राकृतिक रचना (Physiography of Indian Ocean)

हिंदी महासागराची प्राकृतिक रचना

भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार समुद्रतळावर दोन भूखंडांच्या मध्ये महासागरीय कटक वा पर्वतरांगा (रिज) असतात आणि त्यांना लंबरूप (आडवे छेदणारे) विभंग असतात ...
हिंदी महासागराचे आर्थिक महत्त्व (Economic Importance of Indian Ocean)

हिंदी महासागराचे आर्थिक महत्त्व

हिंदी महासागरातून आणि परिसरातून मिळणारी विविध प्रकारची खनिज व जैविक संसाधने, त्यामुळे वाढलेला व्यापार, वाहतूक, पर्यटन इत्यादींमुळे गेल्या काही दशकांपासून ...
हिंदी महासागराचे समन्वेषण आणि संशोधन (Exploration and Research of Indian Ocean)

हिंदी महासागराचे समन्वेषण आणि संशोधन

समन्वेषण : पूर्वीच्या काळी मानवाने पहिल्यांदा हिंदी महासागराचेच व्यापक समन्वेषण व मार्गनिर्देशन केले होते. प्राचीन काळापासून व्यापारी व प्रवासी मार्गांच्या ...
हिंदी महासागराचे सामरिक महत्त्व (Strategic Importance of Indian Ocean)

हिंदी महासागराचे सामरिक महत्त्व

एकेकाळी हिंदी महासागर हा दुर्लक्षित प्रदेश होता; परंतु अलीकडे औद्योगिक, व्यापारी व आर्थिक विकास, राजकीय स्थिरता, राजनैतिक तसेच भूराजनिती आणि ...
हिंदी महासागराच्या तळावरील निक्षेप (Bottom Deposits in Indian Ocean)

हिंदी महासागराच्या तळावरील निक्षेप

जगातील तीन प्रमुख महासागरांपैकी हिंदी महासागराला नद्यांद्वारे होणाऱ्या गाळाच्या पुरवठ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापैकी जवळजवळ निम्मा गाळ एकट्या भारतीय उपखंडातील ...
हिंदी महासागरातील पर्यटन (Tourism in Indian Ocean)

हिंदी महासागरातील पर्यटन

हिंदी महासागराच्या किनार्‍यालगतचा परिसर आणि महासागरातील असंख्य बेटे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची आहेत. हिंदी महासागरात असलेली अनेक लहानमोठी बेटे, त्या ...
हिंदी महासागरातील पर्यावरणावर मानवी व्यवसायांचा परिणाम (Impact of Human Activity on Environment of Indian Ocean)

हिंदी महासागरातील पर्यावरणावर मानवी व्यवसायांचा परिणाम

यूरोपीयन वसाहतकऱ्यांनी हिंदी महासागर प्रदेशातील संसाधनांची लूट केल्यामुळे भूभागावरील आणि महासागरावरील पर्यावरणाची अवनती झाल्याचे अनेक पुरावे मिळतात. वृक्षतोड, शेती व ...
हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान व लवणता (Temperature and Salinity of Indian Ocean Water)

हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान व लवणता

हिंदी महासागराच्या वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान आणि त्याची लवणता यांत तफावत आढळते. परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांनुसार पाण्याचे हे गुणधर्म ठरत ...
हिंदी महासागरातील प्रवाह (Currents in Indian Ocean)

हिंदी महासागरातील प्रवाह

पर्जन्य, वारा व सौरऊर्जा या वातावरणीय घटकांच्या सागरी पृष्ठभागाशी होणाऱ्या आंतरक्रिया, महासागरी पाण्याचे स्रोत आणि खोल सागरी अभिसरण प्रवाह यांच्या ...
हिंदी महासागरातील भरती-ओहोटी (Tides in Indian Ocean)

हिंदी महासागरातील भरती-ओहोटी

चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांमुळे पृथ्वीवरील महासागरासारख्या मोठ्या जलाशयातील पाण्याच्या पातळीत आवर्ती (ठराविक कालांतराने पुन:पुन्हा होणारे) चढउतार होतात, यांस ...
हिंदी महासागरातील व्यापार व वाहतूक (Trade and Transportation through Indian Ocean)

हिंदी महासागरातील व्यापार व वाहतूक

पूर्वीच्या काळी ब्रिटिश, डच व पोर्तुगीजांनी मसाल्याचे पदार्थ, रेशीम व इतर आशियाई उत्पादनांचा व्यापार विकसित केला. त्या दृष्टीने त्यांनी हिंदी ...