(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
सूजो शहर (Suzhou city)

सूजो शहर

वूशिएन, सूचाऊ. चीनच्या पूर्वमध्य भागातील जिआंगसू (किआंगसू) प्रांतातील एक प्रसिद्ध प्राचीन शहर. लोकसंख्या ७०,७०,००० (२०२० अंदाज). ताई जो सरोवराच्या पूर्व ...
सॅकालीन बेट (Sakhalin Island)

सॅकालीन बेट

ओखोट्स्क समुद्रातील (उत्तर पॅसिफिक महासागराचा भाग) रशियाचे एक मोठे बेट व देशाचा अतिपूर्वेकडील द्वीपप्रांत (ओब्लास्ट). ४५° ५३′ उ. ते ५४° ...
सॅम्युएल हर्न (Samuel Hearne)

सॅम्युएल हर्न

हर्न, सॅम्युएल (Hearne, Samuel) : (१७४५ – नोव्हेंबर १७९२). ब्रिटिश खलाशी, फरचा व्यापारी आणि समन्वेषक. त्यांचा जन्म लंडन येथे झाला ...
सॅल्वीन नदी (Salween River)

सॅल्वीन नदी

आग्नेय आशियातील एक प्रमुख, तर म्यानमार (बह्मदेश) मधील सर्वांत लांब व इरावतीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वपूर्ण नदी. एकूण लांबी सुमारे २,४०० ...
सेंट जॉन नदी (Saint John River)

सेंट जॉन नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यातून आणि कॅनडातील क्वीबेक व न्यू ब्रन्सविक प्रांतांतून वाहणारी नदी. लांबी सुमारे ६७३ किमी., एकूण पाणलोट ...
सेंट जॉन्स शहर (Saint John's City)

सेंट जॉन्स शहर

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील लीवर्ड बेटांपैकी अँटिग्वा व बारबूडा देशाची राजधानी आणि कॅरिबियन समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या २१,४७५ (२०११). हे अँटिग्वा ...
सेंट जॉर्जेस शहर (Saint Georges City)

सेंट जॉर्जेस शहर

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील विंडवर्ड बेटांपैकी ग्रेनेडा या द्वीपीय देशाची राजधानी, औद्योगिक शहर व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३३,७३४ (२०१२). हे ग्रेनेडा ...
सेंट बर्नार्ड खिंड (Saint Bernard Pass)

सेंट बर्नार्ड खिंड

आल्प्स पर्वतातील दोन खिंडी. स्वित्झर्लंड-इटली यांदरम्यानची ग्रेट (ग्रँड) सेंट बर्नार्ड, तर फ्रान्स-इटली यांना जोडणारी लिटल (पेटिट) सेंट बर्नार्ड या नावांनी ...
सेंट लॉरेन्स नदी (Saint Lawrence River)

सेंट लॉरेन्स नदी

उत्तर अमेरिका खंडातील एक महत्त्वाची तसेच कॅनडातील मॅकेंझीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. आँटॅरिओ सरोवर ते सेंट लॉरेन्स आखातातील अँटिकॉस्टी बेट ...
सेंदाई शहर (Sendai City)

सेंदाई शहर

जपानच्या होन्शू बेटावरील मीयागी प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर. यास सेंडाई शहर असेही म्हणतात. लोकसंख्या १०,९१,४०७ (२०२०). होन्शू बेटाच्या ...
सेन नदी (Seine River)

सेन नदी

फ्रान्समधील ल्वारनंतरची लांबीने दुसऱ्या क्रमांकाची तसेच ऐतिहासिक व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची नदी. तिची लांबी ७८० किमी. आणि जलवाहनक्षेत्र ७८,७०० चौ ...
सेनेगल नदी (Senegal River)

सेनेगल नदी

पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी. ती गिनी, माली या देशांतून तसेच सेनेगल-मॉरिटेनिया या देशांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पश्‍चिमेस अटलांटिक महासागराला मिळते ...
सोल शहर (Seoul City)

सोल शहर

सेऊल. दक्षिण कोरिया (कोरियन प्रजासत्ताक)ची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या सुमारे १,१२,४४,००० (२०१८). हे देशातील सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, ...
सोलापूर जिल्हा (Solapur District)

सोलापूर जिल्हा

महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय कोपऱ्यातील एक जिल्हा. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,८९५ चौ. किमी. असून ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४·८४% आहे. लोकसंख्या ४३,१५,५२७ ...
सोलापूर शहर (Solapur City)

सोलापूर शहर

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचे आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,५१,११८ (२०११). जिल्ह्याच्या पूर्व भागातील सीना नदीखोऱ्यात सस. पासून ...
स्टॅनोव्हॉय पर्वत (Stanovoy Mountain)

स्टॅनोव्हॉय पर्वत

रशियाच्या आग्नेय भागातील एक पर्वतश्रेणी. रशियातील याकूत (साखा) हे स्वायत्त प्रजासत्ताक व अमूर प्रांत यांच्या सरहद्दीदरम्यान पूर्व-पश्चिम अशी ही पर्वतश्रेणी ...
स्टोक ऑन ट्रेंट (Stoke-on-Trent)

स्टोक ऑन ट्रेंट

इंग्लंडमधील स्टॅफर्डशर परगण्यातील एक शहर आणि मृत्पात्री या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या २,६३,३९३ (२०१९ अंदाज). मध्य इंग्लंडमध्ये ट्रेंट नदीच्या ...
स्ट्राँबोली ज्वालामुखी (Stromboli Volcano)

स्ट्राँबोली ज्वालामुखी

इटलीलगतच्या टिरीनियन समुद्रातील स्ट्राँबोली या बेटावरील एक जागृत ज्वालामुखी. टिरीनियन हा भूमध्य समुद्राचा भाग आहे. इटलीच्या सिसिली बेटाच्या ईशान्येस असलेल्या ...
स्थलवर्णन (Topography)

स्थलवर्णन

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध प्रकारची नैसर्गिक भूमिस्वरूपे, तसेच मानवनिर्मित (कृत्रिम) वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांचे वर्णन व अभ्यास म्हणजे स्थलवर्णन होय. समुद्रतळावरील भूमिस्वरूपेही ...
स्नोई नदी (Snowy River)

स्नोई नदी

ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागातून वाहणारी एक प्रमुख नदी. तेथील न्यू साउथ वेल्स राज्याच्या आग्नेय भागाचे आणि व्हिक्टोरिया राज्याच्या पूर्व भागाचे या ...